Print
Hits: 9950
Heart Blood Circulation हृदयाचे रक्क्ताभिसरण

जगातील आणि भारतातील या पुस्तकात हृदयविकाराच्या कोणत्या प्रकारचा विचार केला आहे. हृदय, हृदयविकार, हृदयविकाराचा झटका, हृदय शस्त्रकिया हे आहेत. ‘हार्ट अटॅक’ (Heart Attack), हा शब्द तर मराठीच वाटावा इतका आपल्या भाषेत रूळला आहे.

टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांमधल्या बातम्यांकडे हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावलेल्या एखाद्या प्रसिध्द व्यक्तीसंबधीची बातमी अधीनमधून असतेच. आपले नातेवाईक, आपले परिचित यांच्यातही एखाद्याला हृदयविकाराचा झटका येण्याची, तर कधी त्यामुळे एखाद्याला मृत्यूसुध्दा येण्याची घटना अधूनमधून घडत असते.

एकंदरीत ‘हृदयविकार’ या रोगाला आपण टरकून असतो. आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला कधीही हृदयविकार होऊ नये अशी आपली मनोमन इछा असते. कारण हृदयविकार झाला तर अचानक झटक्यानं किंवा थोड्याच काळात म्रुत्यू ओढवणार अशी भीती आपल्या मनात असते. हृदयविकार म्हणजे आकस्मिक मृत्यू, आज नाहीतर थोड्याच दिवसात, अशी सर्वसाधारणपणे या रोगाबाबतची समजूत आहे अन्‌ ती फारशी चूकीची आहे असंही नाही. दरवर्षी जगभरात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये हृदयविकारानं मरणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. कॅन्सर आणि एडस्‌ या दोन रोगांची सध्या खूप चर्चा आहे आणि त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. या संशोधनावर अफाट पैसाही खर्च होतो आहे.

अजूनही त्यांच्यावर म्हणण्यासारखे उपाय सापडलेले नाहीत. असं असलं तरी वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे कॅन्सर, एडस्‌, संसर्गजन्य रोग, अपघात, खून (यात युध्दात मारले जाणारे अंतर्भूत नाहीत) यासरख्या सर्व कारणांनी मरणाऱ्या लोकांपेक्षा हृदयविकारानं मरणाऱ्यांची संख्या अधिक असते.

भारतातील प्रमाण
जगभरात एकून मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे हे खरं. पण भारतातही हीच स्थिती आहे का?

हृदयविकाराच्या दृष्टीनं आज आपल्या देशाची काय स्थिती आहे? भारतात हे दुखणं किती प्रमाणात आहे? हे प्रमाण वाढतं आहे की घटत आहे? हे प्रश्न या संदर्भात कोणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. आपल्या देशातही हृदयविकार होणाऱ्यांची आणि त्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दक्षिण आशियातील सर्वच देशांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण जगातील इतर देशांपेक्षा अधिक आहे आणि ते वाढतं आहे.

भारतात तर या विकाराची घोडदौद चालू आहे असं म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. त्यातही शहरी भागात हे दुखणं फार झपाट्यानं वाढतं आहे. १९६० पासून १९९० पर्यंतच्या काळात शहरी भागात हृदयविकाराचं प्रमाण ९ पटींनी वाढलं आहे. इंडियन हार्ट जर्नल या नियतकालीकाच्या मे-जून ९६ च्या अंकात डॉ. राजीव गुप्ता आणि डॉ. व्ही. पी. गुप्ता यांनी प्रसिध्द केलेल्या ‘मेटॅ-ऍनानिसिस ऑफ कोरोनरी हार्ट डिसीज प्रिव्हॅलन्स इन इंडिया’ (Meta-analysis of coronary. Heart Disease Praevalence in India.) या लेखात ही माहीती आणि आकडेवारी दिलेली आहे. देशभरात ठिकठिकाणी झालेल्या अभ्यासांमध्ये गोळा झालेल्या आकडेवारीची चिकित्सा त्यांनी केली आहे. १९६० साली शहरी लोकसंख्येचा १.०५ टक्‍के इतकं असलेलं (आग्रा, १९६०) हे प्रमाण १९९५ साली ९.५९ टक्‍के इतकं झालेलं आहे. (जयपूर - ७.५९ टक्‍के, मोरादाबाद - ८.५५ टक्‍के, तिरूवानंतपुरम्‌ - १२.६५ टक्‍के, सरासरी ९.५९ टक्‍के) दिल्लीमध्ये हेच प्रमाण ९ पटींनी वाढलं आहे असं म्हणता येतं.

ग्रामीण भागातली परिस्थिती यापेक्षा बरी आहे. १९७४ साली २.०६ टक्‍के असलेलं हृदयविकाराचं प्रमाण (हरीयाना - २.०६ टक्‍के) १९९५ साली ३.०९ टक्‍के (उत्तर प्रदेश - ३.०९ टक्‍के) झालेलं होतं.

१९९४ मधील पंजाब आणि राजस्थान या प्रांता मधले आकडेही साधारण याच प्रमाणात होते. (पंजाब - ३.०९ टक्‍के, राजस्थान - ३.५३ टक्‍के). पण केरळमध्ये १९९३ साली झालेल्या एका अभ्यासात तिथे मात्र हे प्रमाण ७.४३ टक्‍के पर्यंत वाढलेलं आढळलं होतं. हृदयविकाराचं प्रमाण ठरविण्यासाठी केलेले हे अभ्यास देशातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये केले गेलेले नव्हते. तसचं सर्व ग्रामीण भागामध्येही ते केले गेलेले नाहीत. शिवाय एकाच ठिकाणचे वेगवेगळ्या वर्षांमधले आकडेही उपलब्ध झालेले दिसत नाहीत. म्हणजे १९६० साली असलेलं हृदयविकाराचं १.०५ टक्‍के हे प्रमाण जयपूर इथल्या पाहणी अभ्यासात आढळून आलेलं आहे. तर १९९५ सालचं १२.६५ टक्‍के हे प्रमाण तिरूव‍अनंतपुरम्‌ इथलं आहे. या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊनसुध्दा असं निश्‍चितणे म्हणता येतं की भारतात हृदयविकाराचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे.

परदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांमध्येही हृदयविकाराचं प्रमाण मोठं आहे. आणि विशेष काळजीची गोष्ट म्हणजे तरुणांमध्येही हृदयविकाराचं प्रमाण वाढतं आहे. हृदयविकार हा मध्यम वयीन आणि वृध्द व्यक्तींना होणारा आजार आहे असं साधारणपणे समजलं जातं पण आता तरूणामध्येही हा आजार लक्षणीय प्रमाणात असल्याचं आढळून येत आहे. १९९५ मध्ये जयपूर इथे पार पाडलेल्या एका अभ्यासात २० ते २९ वयाच्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण ३.४२ टक्‍के इतकं असल्याचं दिसून आलं आहे.

भारतीयांमध्ये हा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात का आहे? आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे? ‘मेटॅऍनालिसिस..’ मध्ये डॉ. गुप्ता आणि डॉ. गुप्ता यांनी असं नमूद केलं आहे की ज्यांच्यावर कॉरोनरी अँजिओग्राफी केली जाते त्यांच्यापैकी ३५-४० टक्‍के रूग्णांना हा विकार असल्याचं कारण निश्‍चितपणे सांगता येत नाही. उच्च रक्तदाब, मधूमेह, कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, धूम्रपान, आनुवंशिकता या गोष्टी म्हणजे हृदयाच्या दृष्टीनं धोक्याचे घटक आहेत. पण ३५-४० टक्‍के रूग्णांमध्ये हे घटक फारसे नसतानासुध्दा त्यांना हृदयविकार झालेला आढळून येतो. शहरीकरण आणि त्यामुळे निर्माण होणारे ताण-तणाव, जीवनशैलीत करावे लागलेले बदल या गोष्टींचाही हृदयविकार होण्यात वाटा असावा, हेही धोक्याचे घटक असावेत असं यावरून दिसून येतं असं डॉ. गुप्तांनी म्हटलं आहे.

हृदयविकाराचं शहरी लोकवस्तीतील प्रमाण (भाग वर्ष प्रमाण टक्‍के)

भाग वर्ष प्रमाण टक्‍के
आग्रा १९६० १.०५
दिल्ली १९६२ १.०४
चंदीगढ १९६८ ६.६०
रोहटक १९७५ ३.६३
दिल्ली १९९० ९.६७
जयपूर १९९५ ७.५९
मोरादाबाद १९९५ ८.५५
तिरूव‍अनंतपुरम्‌ १९९५ १२.६५


हृदयविकाराचं ग्रामीण भागातील प्रमाण (भाग वर्ष प्रमाण टक्‍के)

भाग वर्ष प्रमाण टक्‍के
हरीयाना १९७४ २.०६
विदर्भ १९८८ १.६९
केरळ १९९३ ७.४३
पंजाब १९९४ ३.०९
राजस्थान १९९४ ३.५३
उत्तर प्रदेश १९९५ ३.०९

या आकडेवारीवरून एक गोष्ट ठळकपणे नजरेत भरते, ती म्हणजे बाकी राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये असलेलं हृदयविकाराचं मोठं प्रमाण. हे प्रमाण शहरी भागात (तिरूव‍अनंतपुरम्‌) १२.६५ टक्‍के तर ग्रामीण भागात ७.४३ टक्के इतकं आहे.

केरळमध्ये रोजचा स्वयंपाक आणि बहूतेक सर्व खाद्यपदार्थ खोबरेल तेलात बनवले जातात आणि पैसे कमावण्यासाठी त्या भागातून बरेच लोक मध्यपूर्वेत जातात या दोन गोष्टी सर्वश्रुत आहेत.

आप्तस्वकीय दूर राहील्यामुळे निर्माण होणारा मानसिक ताण आणि खोबरेल तेलाचा वापर या दोन गोष्टींचा आणि त्या राज्यात हृदयविकार मोठ्या प्रमाणात असण्याचा काही संबध आहे का हे तपासणारा एखादा अभ्यास व्हायला हवा आहे. (कदाचीत तसा तो झालाही असेल.) सकृतदर्शनी तरी या गोष्टींचा थेट संबंध असल्यासारखं वाटतं. अर्थात हे एका अ-तज्ज्ञ व्यक्तीचं मत आहे.बायपास
पुण्यात ५००
महाराष्ट्रात २०००
भारतात १००००
प्रत्यक्ष शस्त्रक्रिया आणि आधीच्या व नंतरच्या तपासण्यांचा मिळून एकूण खर्च १,२५०००/- ते १,५००००/- रूपये येतो.

बलून/स्टेन्ट ऍंजिओप्लास्टी
पुण्यात ३५०
महाराष्ट्रात १०००
भारतात ६०००
ही शस्त्रक्रिया आणि आधीच्या व नंतरच्या तपासण्यांचा मिळून एकूण खर्च साधारण वरीलप्रमाणेच येतो. आपल्या देशात हृदयविकार झपाट्याने वाढतो आहे आणि हृदयशस्त्रक्रियेचा खर्च सामान्यांना परवडणारा नाही या दोन गोष्टी यावरून ठळकपणे लक्षात येतात.

या पुस्तकात हृदयविकाराच्या कोणत्या प्रकारचा विचार केला आहे?
हृदयविकार या संज्ञेमध्ये हृदयाच्या अनेक प्रकारच्या दुखण्यांचा समावेश होतो. ऍनजायना पेक्टोरिस (Angina pectoris -हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत, पाठीत, मानेत, हातात किंवा यापैकी एखाद्या ठिकाणी वेदना होणे), आर्टिरिओ स्क्लेरॉसिस Areterio sclerosis - शुध्द रक्तवाहिन्यांची/धमन्यांची लवचिकता कमी जाऊन त्या कडक होत जाणे), कार्डिऍक अरेस्ट (Cardiac arrest - हृदयक्रिया बंद पडणे), कॉरोनरी हार्ट डिसाज्‌ (Coronary heart disease - हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येणे किंव्या त्या चिंचोळ्या होणे), व्हॉल्व्यूलर हार्ट डिसीज्‌ (Valvular heart disease - हृदयातील झडपेचा आजार) ही आणि हृदयाशी संबंधित इतरही अनेक दुखणी हार्ट डिसीज्‌ (Heart disease म्हणजे हृदयविकार किंवा हृद्रोग या मथळ्याखाली येतात.

यापैकी कॉरानरी हार्ट डिसीज्‌ म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांच्या आजारामुळे, त्या चिंचोळ्या झाल्यामुळे किंवा त्यांच्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे होणाऱ्या हृदयविकाराचा आणि त्याच्या परिणामांचा, तसंच त्याच्यावरील उपायांचा विचार आपण इथे करणार आहोत.

हृदयविकार हे फक्त शारीरिक किंवा कायिक दुखणं नसून ते मनो - कायिक म्हणजे शरीराचं आणि मनाचं एकत्रित दुखणं आहे. शरीराइतकाच हृदयाचाही हे दुखणं होण्याशी संबंध असतो. म्हणजे हृदयातील भावनांचा, मनातील भावनांचा दुखणं होण्यात खूप मोठावाटा असतो, असा डीन ऑर्निश यांना विश्वास वातत असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी इतर गोष्टींबरोबरच हृदय मोकळं करण्यावर म्हणजे मन मोकळं करण्यावर भर दिलेला आहे. त्यांच्या कार्यक्रमाचा मोठा भाग हा ‘Opening your heart' programme (ज्याला मराठीत ‘तुमचं मन मोकळं करण्याचा कार्यक्रम असं म्हणता येईल) या नावानंच राबवला गेला होता. माणसाला बहुतेक सर्व दुखणी मनोकायिक स्वरूपाचे असतात या मताला हल्ली दिवसेंदिवस अधिकाधिक पुष्टी मिळू लागली आहे. रोग होण्यात आणि तो बरा होण्यात, कोणतंही दुखणं निर्माण होण्यात आणि ते नष्ट होण्यात, दोन्हींमध्ये शरीराइतकाच आपल्या मनाचाही वाटा असतो.

ऑर्निश यांच्या कार्यक्रमात या दोन्हींची हाताळणी अपारंपारिक पध्दतीनं करून हृदयविकार कमी होऊ शकतो, त्याचा परतावा होऊ शकतो, त्याची पिछेहाट करता येते, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या रूग्णांना या कार्यक्रमामुळे बरं तर वाटू लागलंच पण त्यांच्या हृदय धमन्यांमध्ये तयार झालेले अडथळे प्रत्यक्ष मोजता येण्याइतक्या प्रमाणात कमी झालेले आढळून आले.

या कार्यक्रमावर आधारित अशा डॉ. हिरेमठांच्या कार्यक्रमातही हीच गोष्ट आढळून आलेली आहे. रूग्णांपैकी काही रूग्णांचा हृदयविकार थोड्या प्रमाणात तर काही रूग्णांचा विशेष प्रमाणात कमी झाल्याचं प्रत्यक्ष चाचण्यांमध्ये आढळून आलं आहे. शिवाय, Feeling of well-being म्हणजे बरं वाटणं असं ज्याला म्हणतात ते तर जवळ जवळ सर्वच रूग्णांच्या बाबतीत प्रत्ययास आलेलं आहे. असं ‘बरं वाटणं’ हे या कार्यक्रमाचं मोठं यश म्हणाता येईल. हृदयविकार कमी होऊ लागला, त्याचा परतावा हो‍उ लागला तरी कधी ना कधी मृत्यू हा येणारच असतो, हृदयविकार नसणारी व्यक्तीसुध्दा केव्हा ना केव्हा मृत्यूप्रत जाणारच असते. जन्माला आलेला जीव हा मरणार असतोच. मात्र जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ जास्त्तीत जास्त निरोगी आणि सुखी व्हावा असा आपला प्रयत्न असतो.

हृदयविकार झाल्यानंतरसुध्दा आयुष्य चांगलं जावं अशीच प्रत्येकाची इच्छा असते. या इच्छेप्रमाणे चांगल जीवन जगता येईल, सतत मृत्यूच्या भीतीखाली न राहता मोकळेपणानं जीवनाचा आनंद लुटता येईल. मात्र त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी लागेल. आपल्या सवयीच्या झालेल्या काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील. तर काही नवीन गोष्टींची सवय लावून घ्यावी लागेल. पण हृदयविकारांच्या झटक्याची धास्ती सतत मन020;हे ठरवणं आणि तसा प्रयत्न करणं हे मात्र आपल्या हातात असतं.

आपलं हृदय हे साधारणपणे आपल्या वळलेल्या मुठीएवढं असतं. हे एवढंसं हृदय जन्मल्यापासून मरेपर्यंत अखंड काम करत असतं, अजिबात न थांब&#ात बाळगून जगण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करून निर्वेधपणे आणि आनंदानं आयुष्य जगणं हे केव्हाही अधिक चांगलं नाही का? जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसला तरी आयुष्य कसं जगायचं.ता. (ते काही क्षणांसाठी जरी थांबलं तरी सर्वांच्या तोंडचं पाणी पळतं आणि ते परत चालू व्हावं म्हणून तज्ज्ञांची धावपळ सुरू होते.)