Print
Hits: 12252

हृदयरोग कोणकोणत्या रूपाने प्रकट होऊ शकतो?

त्यामुळे चालतांना किंवा श्रम करतांना हृदयाच्या आसपास वेदना उठतात (छातीत, डाव्या हातात, दोन्ही हातांत, मानेत, जबड्यात, हनुवटीत) आराम केल्यावर काही मिनिटांनी वेदना थांबते.

हृदयरोगासाठी तपासण्या

तपासण्या क्षमता किंमत (रू)
ट्रेडमिल टेस्ट - फिरत्या पट्‍ट्यावर चालवून ५५ ते ७५ टक्‍के ६००
इको कार्डिओग्राफी - आरामात व चालवून ८५ टक्‍के १ ते २ हजार
स्ट्रेस थॅलियम टेस्ट - सायकल फिरवून - -
थॅलियम इंजेक्शन ८० टक्‍के ५ ते ८ हजार
कोरोनरी ऍजिओग्राफी - हृदयात नळी घालून १०० टक्‍के १५,०००/-


रक्तवाहिन्यांचे फोटो. रक्तवाहिन्यांची रोग शोधण्याची संवेदनक्षमता १०० ऽ मानली जाते, पण हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे तात्कालिक आकुंचन (कोरोनरी स्पाजम) व हृदयाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा रोग हे हृदयरोग असूनही कोरोनरी अँजिओग्राफी नॉर्मल येते.

डॉ. अभय बंग ह्यांच्या ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’ ह्या पुस्तकात लिहिले आहे,
“माझ्या हृदयरोगाच्या निदानाने मला बरेच दिवस चकवलं होतं. याबद्दल मला फार विषाद व अपराधी भावना होती. एक दिवस ‘लासेन्ट’ या जगप्रसिध्द वैद्यकीय जर्नलचा वार्षिक विशेषांक हृदयरोगावर आला. या अंकाचे अतिथी संपादक हे हृदयरोगावरचे जागतिक तज्ञ मानले जातात. त्यांनी लिहिलं होतं, ‘गेल्या वर्षी मला जेव्हा हार्ट अटॅक आला, तेव्हा छातीत दुखत असूनही वैद्यकीय निदान करून मदत घ्यायला मी ७२ तास उशिर केला.

माझ्या या मूर्खपणामुळे मला फार अपराधी वाटत होतं. म्हणून मी गेल्या काही वर्षात हार्ट अटॅक आलेल्या जगातील प्रमुख १० हृदयरोग तज्ज्ञांना त्यांचा अनुभव विचारला. दहा पैकी दहाही तज्ज्ञांनी स्वतःचं वैद्यकीय निदान चुकवलं होतं, टाळलं होतं व उपचारात दिरंगाई केली होती’.”