Print
Hits: 9124

हृदयक्रिया बंद पडणे किंवा त्यात बिघाड होणे म्हणजे काय?

हृदयाचे स्नायू खराब होण/बिघडणे म्हणजे हृदयक्रिया बंद पडणे/झटका येणे. हृदय रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होतात, त्यामुळे रक्ताभिसरण थांबून हृदयाचा रक्तपुरवठा थांबतो, त्यामुळे हृदयक्रिया बंद पडते.

जर हे रक्तभिसरण ६ तासांपेक्षा जास्त वेळ बंद असेल तर हृदयाच्य त्या भागातले स्नायू मरतात. किंवा कायमचे खराब होतात. याला हार्ट ऍटक/हृदयक्रिया बंद पडणे असे म्हणतात. हृदयस्नायूंमध्ये रक्ताची गुठळी होणे (Myocardial Infraction) किंवा रक्तातील गुठळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद होणे असेही म्हणतात. यात जर हृदयाच्या थोड्या भागावर परिणाम झाला असेल तर त्याला छोट्या प्रमाणातील हार्ट ऍटक आणि जास्त भागावर परिणाम झाला असेल तर त्याला हृदयाचा तीव्र झटका असे म्हणतात.

रोहिणीमध्ये/रक्तवाहिन्यांमध्ये कशामुळे गुठळीतयार होते किंवा त्या कशामुळे बंद होतात?

ज्या रोगामुळे रक्तवाहिन्यांचे तोंड बंद होते त्याला धमन्यांच्या आवरणास ग्रासणार रोग Atherosclerosis असे म्हणतात. कोलेस्टेरॉल-रक्त आणि पित्तामध्ये आढळणारा पांढऱ्या रंगाचा वासरहित स्निग्ध पदार्थ रक्तवाहिनीच्या भिंतीमध्ये वर्षभरात ह्ळुहळू साठत जातो, आणि नंतर तो इतका साठतो की त्यामुळे रक्तवाहिनीची पोकळी कमी हो‍उन रक्तवाहिनी चे तोंड बंद होते. या परिस्थितीत कधी कधी लक्षणे दिसून येतात तर कधी नाही दिसत. एखाद्या दिवशी कोलेस्टेरॉल च्या वर रक्ताची गुठळी तयार होऊन रक्तवाहिनीचे तोंड १००ऽ बंद होते.

  1. हळुहळु कोलेस्टेरॉल साठत जाणे आणि,
  2. तीव्र गतीने रक्ताची गुठळी तयार होणे.

या अनुक्रमाने रक्तवाहिनीचे तोंड बंद होते.

अशाप्रकार फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होतात का?

धमन्यांच्या आवरणास ग्रासणारा रोग हा सामान्य असून तो शरीरातील कोणत्याही भागातील रक्तवाहिनी वर परिणाम करू शकतो. साधारणपणे प्रथम २.५ ते ४mm डायमिटर च्या दरम्यान असलेल्या रक्तवाहिनी वर परिणाम होतो. मेंदूत असणाऱ्या रक्तवाहिन्या बंद झाल्यास अर्धांगवायू किंवा मेंदूला झटका बसतो. हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद झाल्यास हृदयाचा झटका येतो. मूत्रपिंडातील रक्तवाहिनी चे तोंड बंद झाल्यास मूत्रपिंडात बिघाड होऊ शकतो. पायातील रक्तवाहिनी बंद झाल्यास पायाला गॅंगरीन होऊ शकते. अशाप्रकारे शरीरात कोठेही रक्तवाहिनी चे तोंड बंद होऊन त्या विशिष्ठ अवयवावर परिणाम होऊन त्याचा रक्तपुरवठा बंद होतो. साधारणपणे हृदयाच्या रक्तवाहिनी चे तोंड बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे, त्याखालोखाल मेंदूतील रक्तवाहिन्या आणि नंतर पायातील रक्तवाहिन्या.


हृदयाचा झटका येण्याची लक्षणे कोणती?

हृदयाच झटका येणाऱ्या बहुतांशी लोकांना छातीच्या मध्यभागी अतिवेदनाकारक वेदना होतात, या वेदना अचानक/तीव्र स्वरूपाच्या असतात. या वेदना संपूर्ण छातीत पसरतात, नंतर त्या जबड्यापर्यंत जाऊन पोहचतात किंवा दोन्ही हातांमध्ये किंवा फक्त एका हातात पसरतात. साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध असणाऱ्या स्नायूंच्या पडद्याखाली - श्वासपटलाखाली जात नाहीत. या प्रकारच्या वेदना तीव्र असतात, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि अस्वस्थपणा बेचैनी जाणवते, खूप घाम येतो आणि उलट्याही होतात. अन्य काही रूग्णांमध्ये वर दिलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ही कळ अगदी सूक्ष्म असते, यात घसा बंद होतो किंवा छातीत जळजळते किंवादयाचा झटका येऊ शकतो.

हृदयाचा झटका येण्यापूर्वी रक्तवाहिनीचे तोंड बंद झाल्याचे निदान करता येते का?

रक्तवाहिनी १००ऽ बंद होण्यापूर्वी त्या व्यक्तीस घशाचा दाह जाणवतो. थोडे श्रम केल्याने छातीत जडपण जाणवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत धडधडणे या प्रकारची लक्षणे जाणवतात.

विशेषत: चाळीशीनंतर थोडे श्रम झाल्यानंतर या प्रकारची लक्षणे दिसून आली तर लगेच आपल्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्यावे, या स्थितीत हृदयाची हालचाल नोंदवल्यास - कार्डियोग्राम काढल्यास किंवा Treadmill stress चाचणी घेतात. जर ट्रेडमील स्ट्रेस चाचणी सामान्य आढळली नाही तर याचा अर्थ हृदया तील रक्त वाहिन्या १००ऽ जरी नाही तरी काही प्रमाणात बंद झाल्या आहेत.

रक्तवाहिनी मधे अडथळे का निर्माण होतात?

धमन्यांच्या आवरणास ग्रासणाऱ्या रोगाची १२ वेगवेगळी कारणे आहेत. या कारणांना ‘घातक घटक’ (रिस्क फॅक्टर) असे म्हणतात. या १२ कारणांपैकी ४ कारणे अशी न बदलणारी आहे. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा फेरफार करू शकत नाही. वय, लिंग, शहरी संस्कृती आणि अनवंशिकता हे ती चार कारणे होत. वाढत्या वया बरोबर हा रोग होण्याची शक्यता वाढीस लागते. पुरूषांमध्ये सामान्यत: या रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. शहरी जीवनात हृदयाच्या झटक्याचे प्रमाण जास्त दिसून येते. अगदी जवळच्या नातेवाइकास वयाची ५५ वर्षे पूर्ण होण्याआधी झटक्याचा त्रास झाला असेल किंवा एन्जिओप्लास्टी झाली असेल किंवा बायपास सर्जरी झाली असेल तर आनुवंशिकता हे त्याचे कारण असते. तुलनात्मकरित्या ज्या व्यक्तीच्या कुटुंबाचा असा इतिहास नाही त्यांच्यापेक्षा अशी अनुवंशिकता असणाऱ्या व्यक्तिला जास्त धोका असतो, इतर आठ कारणांमधे थोडाफार बदल होऊ शकतो. याचा अर्थ जर योग्य रीतीने या कारणांकडे लक्ष दिले गेले तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान किंवा दुसऱ्या कोणत्याही स्वरूपात निकोटीने घेणे, जुनाट मानसिक तणाव, अ प्रकारचे किंवा उ प्रकारचे व्यक्तिमत्व, बैठी जीवनपध्दती आणि रक्तातील स्निग्ध पदार्थांचे जास्त प्रमाण.

हृदयाच्या झटक्यावर कोणते प्रथमोपचार आहेत?

एखाद्याला जर शंका आली की त्याच्या नातेवाइकाला. शेजाऱ्याला किंवा मित्राला हृदयाच झटका आला आहे तर त्याने प्रथम ऍम्ब्यूलन्स बोलवावी. झटका आलेल्या व्यक्तीला आरामात पडून राहता येईल अशी व्यवस्था करावी, अंगावरचे कपडे सैल करावेत. त्याला किंवा तिला धीर द्यावा आणि मदत चालू असल्याचा विश्वास निर्माण करावा. ऍस्पिरीन एक गोळी एक ग्लासभर पाण्यात विरघळवावी आणि ते पाणी रूग्णास पिण्यास द्यावे. शक्य तितक्या लवकर रूग्णास अशा रूग्णालयात भरती करावे जेथे इंटेन्सिव्ह केअर युनिट (icu) ची सोय उपलब्ध आहे.


रूग्णालयात यासाठी कोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध असतात?

जर रूग्णाला लवकरात लवकर रूग्णालयात आणले असेल तर त्याला चांगल्या प्रकारचे उपचार त्वरित मिळू शकतात. जितक्या लवकर उपचार केले जातील तितक्या चांगल्या प्रमाणात त्याचे चांगले निकाल मिळतील. आता रक्ताच्या गुठळ्या विरघळवतील अशाप्रकारची औषधे उपलब्ध आहेत. अशा गुठळ्या निर्माण होण्याला थ्रॅम्बोलायसिस म्हणतात. आणि ही औषधे हृदयाच्या रक्तवाहिनी मध्ये अडथळा आणणाऱ्या या गुठळ्यांना विरघळवतात. यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू होऊन हृदयाच्या स्नायूंचा बचाव होतो.

झटका आल्याच्या पहिल्या काही तासांमध्ये हृदयक्रिया बंद पडणे किंवा डोक्यांच्या गतीत अडथळे निर्माण होणे अशाप्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. परंतु औषधांद्वारे यावर चांगला उपचार होऊ शकतो. काही विशेष केंद्रांमध्ये रक्तवाहिनी यांत्रिकरित्या उघडण्यासाठी बलून ऍंजियोप्लास्टी केली जाते.

हृदयाचा झटका युण्यापूर्वी रक्तवाहिनीचे तोंड बंद झाल्याचे निदान करता येते का?

रक्तवाहिनी १०० टक्के बंद होण्यापूर्वी त्या व्यक्तीस घशाचा दाह (angina) जाणवतो. थोडे श्रम केल्याने छातीत जडपण जाणवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत धडधडणे या प्रकारची लक्षणे जाणवातात.

रक्तवाहिनी बंद असल्याचे निदान करण्यासाठी कोणत्या परीक्षा उपलब्ध आहेत?

विद्युत यंत्राच्या सहाय्याने हृदयाच्या ठोक्यांचे केले जाणारे रेखाचित्रण-विद्युत ह्रदलेखा ही पहिली आणि साधी परीक्षा आहे. यामुळे झटका येऊन गेला आहे किंवा नाही ते समजते, Treadmill stress test ने झटका यायच्या आधी रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे का याचे निदान करत येते. यात रूग्णाला Treadmill वर चालावयास लावतात, आणि त्या व्यक्तीच्या वयासाठी ठोक्यांची जी गती निश्‍चित केली असेल तिचा विद्युतह्रद्‌लेख (ECG) काढला जातो. जर उच्च दाबात सुध्दा कार्डियोग्राम सामान्य असेल तर याचा अर्थ रक्तवाहिन्यांमधे कोणताही अडथळा नाही. Thallium stress test आणि posittron emission topography या प्रकारच्या परीक्षासुध्दा काही विशिष्ठ केंद्रामध्ये केल्या जातात.

हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी coronaryAngiography ही प्रमाणित पध्दत आहे. एन्जियो म्हणजे रक्तवाहिनी आणि ग्राफ म्हणजे त्याचे चित्रण करणे. या परीक्षेत आयोडिनयुक्त द्रावण बनविले जाते जे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये सोडले जाते. जेव्हा हे द्रावण रक्ताबरोबर वाहत असते तेव्हा क्ष-किरणांद्वारे त्यांचे चित्रण करून त्यांचा अभ्यास केला जातो. आणि अडथळ्यांचे निदान केले जाते.

हृदयाच्या रक्तवाहिनी चे चित्रण (angiography) कसे केले जाते?

हृदयाच्या रक्तवाहिन्या हृदयात स्नायूंना रक्तपुरवठा करतात. या रक्तवाहिन्या शरीरातील सर्वात मोठ्या रोहिणीतून निघालेल्या असतात. या रक्तवाहिन्यांच्या मुळापर्यंत पोहचण्यासाठी पोट व मांडी यांच्यामधील खोलगट भागात म्हणजे जांघे जवळ जी रल्तवाहिनी असते तेथे स्थानिक भूल देऊन छोटे छिद्रे पाडले जाते, या छोट्या छिद्रातून एक नळी (catheter) महारोहिणीतून हृदयाजवळील रोहिणीत घातली हाते. या नळ्यांना विशिष्ठ आकार दिलेला असल्यामुळे त्या निवडक रक्तवाहिनी च्या मुळापर्यंत जाऊन पोहचतात. एकदा या नळ्या तेथपर्यंत पोहचल्या की हृदयाजवळील रक्तवाहिन्यांमध्ये आयोडिनयुक्त द्रावणाचे इंजेक्शन दिले जाते, आणि क्ष-किरणांच्या मदतीने केलेल्या हृदयाजवळील रक्तवाहिनीच्या चित्रणाचा अभ्यास केला जातो. नंतर ३५mm फिल्म किंवा व्हिडियो फिल्म किंवा सीडी बनवून याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. या पध्दतीच्या परीक्षेला साधारण १५ मिनिटे लागतात. स्थानिक भूलेचे इंजेक्शन देतांना ज्या वेदना होतात त्या सोडल्यास ही वेदनारहित पध्दती आहे. या पध्दतीत १०,००० तील एखाद्याच्या बाबतीत गुंतागुंत निर्माण होऊ शकते.


बलून ऍंजियोप्लास्टी म्हणजे काय?

धमन्यांच्या आवरणास ग्रासणाऱ्या रोगात बदल करता येत नाहे. असे मानले जाते. एकदा गुठळी निर्माण झाली की ती विरघळवण्यासाठी औषध नाही. जर हा अडथळा आधीच नाजूक स्थितीत असे तर तो यांत्रिकीरित्या काढून टाकण्याची दाबून टाकण्याची गरज असते. जेथे अडथळा निर्माण झाला आहे तेथे एक छोटा फुगा घातला जातो. नंतर विशिष्ट दाबाखाली हा प्लास्टिकचा फुगा फुगवला जातो. यामुळे रक्तवाहिनी ताणली जाऊन त्यातील अडथळा पुढे ढकलला जातो. जेव्हा फुगा काढला जातो तेव्हा रक्तवाहिनीतील पोकळ भाग अडथळारहित बनून यातून रक्तप्रवाह सुरळीत सुरू होतो.

स्थानिक भूल देऊन बलून ऍंजियोप्लास्टी केली जाते आणि हृदयाच्या रक्तवाहिनी च्या चित्रणपध्दतीपेक्षा ही पध्दती दोन पायया पुढे आहे असे मानले जाते. या पध्दतीत यश मिळण्याचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा जास्त आहे तर अपयश येण्याचे किंवा गुंतागुंत निर्माण होण्याचे प्रमाण ५ टक्के पेक्षा कमी आहे. एकदा रक्तवाहिनी ताणल्या गेल्यानंतर आणि फुगा काढून घेतल्यानंतर त्याच जागी ६ महिन्यात पुन्हा अडथळा निर्माण होण्याचे शक्यता फक्त ३० टक्के असते.

रक्तवाहिनी बंद असल्याचे निदान करण्यासठी कोणत्या परीक्षा उपलब्ध आहेत?

विद्युत यंत्राच्या सहाय्याने हृदयाच्या ठोक्यांचे केले जाणारे रेखाचित्रण-विद्युत हृदयलेखा ही पहिली आणि साधी परीक्षा आहे. यामुळे झटका येऊन गेला आहे किंवा नाही ते समजते.

Treadmill stress test ने झटका यायच्या आधी रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे का याचे निदान करता येते. यात रूग्णाला treadmill वर चालावयास लावतात, आणि त्या व्यक्तीच्या वयासाठी ठोक्यांची जी गती निश्‍चित केली असेल तिचा विद्युतह्रद्‌लेख (ECG) काढला जातो. जर उच्च दाबात सुध्दा कार्डियोग्राम सामान्य असेल तर याचा अर्थ रक्तवाहिन्यांमधे कोणताही अडथळा नाही. Thallium stress test आणि Posittron emission topography या प्रकारच्या परीक्षासुध्दा काही विशिष्ठ केंद्रामध्ये केल्या जातात.

हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी Coronary, Angiography ही प्रमाणित पध्दत आहे. एन्जियो म्हणजे रक्तवाहिनी आणि ग्राफ म्हणजे त्याचे चित्रण करणे. या परीक्षेत आयोडिनयुक्त द्रावण बनविले जाते जे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये सोडले जाते. जेव्हा हे द्रावण रक्ताबरोबर वाहत असते तेव्हा क्ष-किरणांद्वारे त्यांचे चित्रण करून त्यांचा अभ्यास केला जातो. आणि अडथळ्यांचे निदान केले जाते.

हृदयाच्या रक्तवाहिनीचे चित्रण (angiography) क्से केले जाते?

हृदयाच्या रक्तवाहिन्या हृदयात स्नायूंना रक्तपुरवठा करतात. या रक्तवाहिन्या शरीरातील सर्वात मोठ्या रोहिणीतून निघालेल्या असतात. या रक्तवाहिन्यांच्या मुळापर्यंत पोहचण्यासाठी पोट व मांडी यांच्यामधील खोलगट भागात म्हणजे जांघे जवळ जी रक्तवाहिनी असते. तेथे स्थानिक भूल देऊन छोटे छिद्र पाडले जाते. या छोट्या छिद्रातून एक नळी (Catheter) महारोहिणीतून हृदयाजवळील रोहिणीत घातली जाते. या नळ्यांना विशिष्ठ आकार दिलेला असल्यामुळे त्या निवडक रक्तवाहिनी च्या मुळापर्यंत जाऊन पोहचतात.

एकदा या नळ्या तेथपर्यंत पोहचल्या की हृदयाजवळील रक्तवाहिन्यांमध्ये आयोडिनयुक्त द्रावणाचे इंजेक्शन दिले जाते, आणि क्ष-किरणांच्या मदतीने केलेल्या हृदयाजवळील रक्तवाहिनी च्या चित्रणाचा अभ्यास केला जातो. नंतर ३५mm फिल्म किंवा व्हिडियो फिल्म किंवा सीडी बनवून याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. या पध्दतीच्या परीक्षेला साधारण १५ मिनिटे लागतात. स्थानिक भूलेचे इंजेक्शन देतांना ज्या वेदना होतात त्या सोडल्यास ही वेदनारहित पध्दती आहे. या पध्दतीत १०,००० तील एखाद्याच्या बाबतीत गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

बलून ऍंजियोप्लास्टी म्हणजे काय?

धमन्यांच्या आवरणास ग्रासणाऱ्या रोगात बदल करता येत नाही. असे मानले जाते. एकदा गुठळी निर्माण झाली की ती विरघळवण्यासाठी औषध नाही. जर हा अडथळा आधीच नाजूक स्थितीत असेल तर तो यांत्रिकीरित्या काढून टाकण्याची दाबून टाकण्याची गरज असते. जेथे अडथळा निर्मान झाला आहे तेथे एक छोटा फुगा घातला जातो. नंतर विशिष्ट दाबाखाली हा प्लास्टिकचा फुगा फुगवला जातो. यामुळे रक्तवाहिनी ताणली जाऊन त्यातील अडथळा पुढे ढकलला जातो. जेव्हा फुगा काढला जातो तेव्हा रक्तवाहिनीतील पोकळ भाग अडथळारहित बनून यातून रक्तप्रवाह सुरळीत सुरू होतो.

स्थानिक भूल देऊन बलून ऍंजियोप्लास्टी केली जाते आणि हृदयाच्या रक्तवाहिनी च्या चित्रणपध्दतीपिक्षा ही पध्दती दोन पायऱ्या पुढे आहे असे मानले जाते. या पध्दतीत यश मिळण्याचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा जास्त आहे तर अपयश येण्याचे किंवा गुंतागुंत निर्माण होण्याचे प्रमाण ५ टक्के पेक्षा कमी आहे. एकदा रक्तवाहिनी ताणल्या गेल्यानंतर आणि फुगा काढून घेतल्यानंतर त्याच जागी ६ महिन्यात पुन्हा अडथळा निर्माण होण्याची शक्यता फक्त ३० टक्के असते.

स्टेन्ट म्हणजे काय? त्याची भूमिका कोणती?

विद्युत यंत्राच्या सहाय्याने हृदयाच्या ठोक्यांचे केले जाणारे रेखाचित्रण-विद्युत हृदयलेखा ही पहिली आणि साधी परीक्षा आहे. यामुळे झटका येऊन गेला आहे किंवा नाही ते समजते.

बलून ऍंजियोप्लास्टी केल्यानंतर पहिल्या ६ महिन्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता फक्त ३० टक्के असते हे आपण पाहिले. हे ३० टक्के प्रमाण देखील कमी व्हावे म्हणून रक्तवाहिनीमध्ये स्टेनलेस स्टीलची नळी घातली जाते. नंतर फुग्याच्या सहाय्याने ती वाढवली जाते, आणि रक्तवाहिनी च्या भितींमध्ये पुरून टाकली जाते. या स्टेनलेस स्टीलच्या नळीमुळे रक्तवाहिनीला आतून बळकटी प्राप्त होते आणि जेथे बलून ऍंजियोप्लास्टी केली आहे, तेथे पुन्हा अडथळा निर्माण होण्यास प्रतिबंध करते. साध्या फुग्यामुळे जर रक्तवाहिनीला काही इजा पोहचली असेल तर स्टेन्ट मध्ये त्याची काळजी घेतली जाते. स्टेन्टेमुळे ऍंजियोप्लास्टीच्या पध्दतीत सुरक्षेतता आणि कार्यक्षमता निर्माण होते. या पध्दतीत यश मिळण्याचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा जास्त आणि गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता २ टक्के पेक्षा कमी असते. स्टेन्टमुळे पहिल्या ६ महिन्यात पुन्हा अडथळा निर्माण होण्याची शक्यता १० टक्के असते. जर पहिल्या ६ महिन्यात अडथळा निर्माण झाला नाही तर त्या जागी पुन्हा अडथळा निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते.

हृदयार ‘ड्रील’ वापरणे याचा अर्थ काय?

ड्रील म्हणजे चक्राकार गतीने फिरणे. जेव्हा कॅल्शियममुळे रक्ताची गुठळी टणक बनली असेल आणि फुग्यामुळे ताणली जात नसेल तेव्हा याचा उपयोग केला जातो. प्रत्येक मिनिटाला हे ड्रील एक लाख वेळा चक्राकार गतीने फिरते आणि गुठळीचे बारीक-बारीक तुकडे करते. एकदा ड्रीलने रक्तवाहिनीची पोकळी मोकळी केल्यानंतर स्टेन्ट घातले जाते.

हृदयरोगांच्या उपचारासाठी लेसरचा कसा उपचार केला जातो?

हृदयरोगांमध्ये लेसरद्वारे फार कमी प्रमाणात उपचार दिला जातो. TMR (trans myocardial laser revascularisation) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पध्दतीत लेसरने हृदयाच्या स्नायूंमध्ये छिद्र केले जाते. यामुळे तेथे नवीन रक्तवाहिन्या निर्माण होतात. यामुळे हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात वाढ होते ही पध्दत अंतिम स्थितीतील रूग्णांसाठी वापरली जाते कारण त्यांच्या वर इतर कोणत्याही उपचारंचा प्रभाव पडत नाही.


हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे काय?

हृदय हे बॅंकेतील कॅशियरसारखे काम करीत असते. कॅशियर पैसे देतो पण ते काम करण्यासाठी तो स्वतंत्र पगार घेतो. त्याचप्रमाणे हृदय शरीराकडून रक्त स्वीकारते आणि तेच शरीराला पुरविते. हे कार्य करण्यासाठी हृदयाला मिळणाऱ्या रक्तपुरवठ्यातून स्वतंत्रपणे शक्ती मिळणे आवश्यक असते. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना हृदयातील रक्तवाहिन्या असे म्हणतात. उजव्या आणि डाव्या बाजूच्या रक्तवाहिन्या महारोहिणीतून निघालेल्या असतात आणि त्या नलिकांद्वारे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करतात. घशाचा दाह झाल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या काही भागात अडथळा निर्माण होऊ शकतो. संपूर्ण अडथळा निर्माण झाल्यास हृदयाचा झटका येऊ शकतो.

हृदय पंप आहे?

तुमचे हृदय सशक्त ज्यात पोकळ स्नायू आहेत. जे रोज रक्त घेतात आणि बाहेर टाकतात आणि फक्त दोन ठोक्यांमधील वेळात विश्रांती घेते. रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजनयुक्त शुध्द रक्त असते जे संपूर्ण शरीराला पुरविले जाते. हृदयाला रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्यांना हृदयाला रक्तापुरवठा रक्तवाहिन्या असे म्हटले जाते.

चार झडपा आहेत ज्यातून हृदयाद्वरे रक्तप्रवाह सुरू असतो. या झडपा उघडतात आणि बंद होतात. ज्यामुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित होते. हृदयाच्या उजव्य़ा बाजूस असणाऱ्या झडपां Tricuspid आणि Pulmonary झडपा असत्त. डाव्या बाजूच्या झडपा Mitral आणि Aortic झडपा असतात. हृदयाचे ठोके म्हणजे या झडपांचा उघडण्याचा आणि बंद होण्याचा आवाज असतो.

कार्डिओलॉजी म्हणजे काय?

हृदयावर आणि रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणाऱ्या रोगांचे निदान आणि त्यांचे व्यवस्थापन म्हणजे कार्डिओलॉजी. हृदयरोगतज्ञ तपासणी करून रूग्णाला हृदयाच्या विविध रोगांना तोंड देण्यास मदत करतात. या रोगांमध्ये अनियमित ठोके, रक्तवाहिन्याम्मध्ये अडथळा निर्माण होणे, घशाचा दाह, हृदयाचा झटका, हृदयक्रिया बंद पडणे आणि हृदयातील झडपेविषयीचे रोग यांचाही समावेश असतो. नियमितपणे शरीराची तपासणी करून घेतल्यास अनियमितता लक्षात येईल. छातीत धडधडणे किंवा हृदयाचे ठिके जोराने व वेगाने पडणे ही प्रथम लक्षणे होत, जी कालजी करण्यासारखी असतात, त्यामुळे रूग्ण हृदयरोगतज्ञाकडे जातात.

साधारणत: हृदयाचे मूल्यमापन संपूर्ण इतिहास आणि शारीरिक तपासणीवरून केले जाते. विद्युत ह्रद्‌लेख (ECG) छातीची क्ष-किरण चिकित्सा आणि रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. २४ तास चल निरीक्षण, व्यायामामुळे येणाऱ्या तणावाची परीक्षा, न्यूक्लिअर अभ्यास, इकोकार्डिओग्राफी आणि हृदयात नळ्या घालणे या पध्दती सुचविल्या जातात. एकदा हृदयरोगाचे निदान झाल्यानंतर हृदयरोगतज्ञ आहार आणि कार्यात बदल, औषधोपचार सुचवितात तर काही केसेसमधे बलून ऍंजियोप्लास्टी किंवा हृदय शस्त्रक्रिया करण्याचे सुचवितात. हृदयरोग असणाऱ्या प्रत्येक रूग्णाने व्यवस्थित follow-up ठेवण्यात आणि रूग्णाच्या आरोग्याविषयी काळजी घेण्यात महत्त्वाची भूमिका असते.