हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे काय?
हृदय हे बॅंकेतील कॅशियरसारखे काम करीत असते. कॅशियर पैसे देतो पण ते काम करण्यासाठी तो स्वतंत्र पगार घेतो. त्याचप्रमाणे हृदय शरीराकडून रक्त स्वीकारते आणि तेच शरीराला पुरविते. हे कार्य करण्यासाठी हृदयाला मिळणाऱ्या रक्तपुरवठ्यातून स्वतंत्रपणे शक्ती मिळणे आवश्यक असते. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना हृदयातील रक्तवाहिन्या असे म्हणतात. उजव्या आणि डाव्या बाजूच्या रक्तवाहिन्या महारोहिणीतून निघालेल्या असतात आणि त्या नलिकांद्वारे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करतात. घशाचा दाह झाल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या काही भागात अडथळा निर्माण होऊ शकतो. संपूर्ण अडथळा निर्माण झाल्यास हृदयाचा झटका येऊ शकतो.
हृदय पंप आहे?
तुमचे हृदय सशक्त ज्यात पोकळ स्नायू आहेत. जे रोज रक्त घेतात आणि बाहेर टाकतात आणि फक्त दोन ठोक्यांमधील वेळात विश्रांती घेते. रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजनयुक्त शुध्द रक्त असते जे संपूर्ण शरीराला पुरविले जाते. हृदयाला रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्यांना हृदयाला रक्तापुरवठा रक्तवाहिन्या असे म्हटले जाते.
चार झडपा आहेत ज्यातून हृदयाद्वरे रक्तप्रवाह सुरू असतो. या झडपा उघडतात आणि बंद होतात. ज्यामुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित होते. हृदयाच्या उजव्य़ा बाजूस असणाऱ्या झडपां Tricuspid आणि Pulmonary झडपा असत्त. डाव्या बाजूच्या झडपा Mitral आणि Aortic झडपा असतात. हृदयाचे ठोके म्हणजे या झडपांचा उघडण्याचा आणि बंद होण्याचा आवाज असतो.
कार्डिओलॉजी म्हणजे काय?
हृदयावर आणि रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणाऱ्या रोगांचे निदान आणि त्यांचे व्यवस्थापन म्हणजे कार्डिओलॉजी. हृदयरोगतज्ञ तपासणी करून रूग्णाला हृदयाच्या विविध रोगांना तोंड देण्यास मदत करतात. या रोगांमध्ये अनियमित ठोके, रक्तवाहिन्याम्मध्ये अडथळा निर्माण होणे, घशाचा दाह, हृदयाचा झटका, हृदयक्रिया बंद पडणे आणि हृदयातील झडपेविषयीचे रोग यांचाही समावेश असतो. नियमितपणे शरीराची तपासणी करून घेतल्यास अनियमितता लक्षात येईल. छातीत धडधडणे किंवा हृदयाचे ठिके जोराने व वेगाने पडणे ही प्रथम लक्षणे होत, जी कालजी करण्यासारखी असतात, त्यामुळे रूग्ण हृदयरोगतज्ञाकडे जातात.
साधारणत: हृदयाचे मूल्यमापन संपूर्ण इतिहास आणि शारीरिक तपासणीवरून केले जाते. विद्युत ह्रद्लेख (ECG) छातीची क्ष-किरण चिकित्सा आणि रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. २४ तास चल निरीक्षण, व्यायामामुळे येणाऱ्या तणावाची परीक्षा, न्यूक्लिअर अभ्यास, इकोकार्डिओग्राफी आणि हृदयात नळ्या घालणे या पध्दती सुचविल्या जातात. एकदा हृदयरोगाचे निदान झाल्यानंतर हृदयरोगतज्ञ आहार आणि कार्यात बदल, औषधोपचार सुचवितात तर काही केसेसमधे बलून ऍंजियोप्लास्टी किंवा हृदय शस्त्रक्रिया करण्याचे सुचवितात. हृदयरोग असणाऱ्या प्रत्येक रूग्णाने व्यवस्थित follow-up ठेवण्यात आणि रूग्णाच्या आरोग्याविषयी काळजी घेण्यात महत्त्वाची भूमिका असते.