हृदयाचा झटका येण्याची लक्षणे कोणती?
हृदयाच झटका येणाऱ्या बहुतांशी लोकांना छातीच्या मध्यभागी अतिवेदनाकारक वेदना होतात, या वेदना अचानक/तीव्र स्वरूपाच्या असतात. या वेदना संपूर्ण छातीत पसरतात, नंतर त्या जबड्यापर्यंत जाऊन पोहचतात किंवा दोन्ही हातांमध्ये किंवा फक्त एका हातात पसरतात. साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध असणाऱ्या स्नायूंच्या पडद्याखाली - श्वासपटलाखाली जात नाहीत. या प्रकारच्या वेदना तीव्र असतात, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि अस्वस्थपणा बेचैनी जाणवते, खूप घाम येतो आणि उलट्याही होतात. अन्य काही रूग्णांमध्ये वर दिलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ही कळ अगदी सूक्ष्म असते, यात घसा बंद होतो किंवा छातीत जळजळते किंवादयाचा झटका येऊ शकतो.
हृदयाचा झटका येण्यापूर्वी रक्तवाहिनीचे तोंड बंद झाल्याचे निदान करता येते का?
रक्तवाहिनी १००ऽ बंद होण्यापूर्वी त्या व्यक्तीस घशाचा दाह जाणवतो. थोडे श्रम केल्याने छातीत जडपण जाणवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत धडधडणे या प्रकारची लक्षणे जाणवतात.
विशेषत: चाळीशीनंतर थोडे श्रम झाल्यानंतर या प्रकारची लक्षणे दिसून आली तर लगेच आपल्या डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्यावे, या स्थितीत हृदयाची हालचाल नोंदवल्यास - कार्डियोग्राम काढल्यास किंवा Treadmill stress चाचणी घेतात. जर ट्रेडमील स्ट्रेस चाचणी सामान्य आढळली नाही तर याचा अर्थ हृदया तील रक्त वाहिन्या १००ऽ जरी नाही तरी काही प्रमाणात बंद झाल्या आहेत.
रक्तवाहिनी मधे अडथळे का निर्माण होतात?
धमन्यांच्या आवरणास ग्रासणाऱ्या रोगाची १२ वेगवेगळी कारणे आहेत. या कारणांना ‘घातक घटक’ (रिस्क फॅक्टर) असे म्हणतात. या १२ कारणांपैकी ४ कारणे अशी न बदलणारी आहे. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा फेरफार करू शकत नाही. वय, लिंग, शहरी संस्कृती आणि अनवंशिकता हे ती चार कारणे होत. वाढत्या वया बरोबर हा रोग होण्याची शक्यता वाढीस लागते. पुरूषांमध्ये सामान्यत: या रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. शहरी जीवनात हृदयाच्या झटक्याचे प्रमाण जास्त दिसून येते. अगदी जवळच्या नातेवाइकास वयाची ५५ वर्षे पूर्ण होण्याआधी झटक्याचा त्रास झाला असेल किंवा एन्जिओप्लास्टी झाली असेल किंवा बायपास सर्जरी झाली असेल तर आनुवंशिकता हे त्याचे कारण असते. तुलनात्मकरित्या ज्या व्यक्तीच्या कुटुंबाचा असा इतिहास नाही त्यांच्यापेक्षा अशी अनुवंशिकता असणाऱ्या व्यक्तिला जास्त धोका असतो, इतर आठ कारणांमधे थोडाफार बदल होऊ शकतो. याचा अर्थ जर योग्य रीतीने या कारणांकडे लक्ष दिले गेले तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान किंवा दुसऱ्या कोणत्याही स्वरूपात निकोटीने घेणे, जुनाट मानसिक तणाव, अ प्रकारचे किंवा उ प्रकारचे व्यक्तिमत्व, बैठी जीवनपध्दती आणि रक्तातील स्निग्ध पदार्थांचे जास्त प्रमाण.
हृदयाच्या झटक्यावर कोणते प्रथमोपचार आहेत?
एखाद्याला जर शंका आली की त्याच्या नातेवाइकाला. शेजाऱ्याला किंवा मित्राला हृदयाच झटका आला आहे तर त्याने प्रथम ऍम्ब्यूलन्स बोलवावी. झटका आलेल्या व्यक्तीला आरामात पडून राहता येईल अशी व्यवस्था करावी, अंगावरचे कपडे सैल करावेत. त्याला किंवा तिला धीर द्यावा आणि मदत चालू असल्याचा विश्वास निर्माण करावा. ऍस्पिरीन एक गोळी एक ग्लासभर पाण्यात विरघळवावी आणि ते पाणी रूग्णास पिण्यास द्यावे. शक्य तितक्या लवकर रूग्णास अशा रूग्णालयात भरती करावे जेथे इंटेन्सिव्ह केअर युनिट (icu) ची सोय उपलब्ध आहे.