आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • आजार आणि रोग
  • विशिष्ट आजार
  • हृदयविकार
  • धोक्याचे घटक

धोक्याचे घटक - मानसिक एकटेपणा

  • Print
  • Email
Details
Hits: 25131
Page 3 of 3


मानसिक एकटेपणा
या सर्व घटकांप्रमाणेच मानसिक एकटेपणा, एकाकीपण हाही हृदयविकार होण्यास, तो वाढण्यास आणि तो कमी न होण्यास कारणीभूत ठरत असावा असं लक्षात येऊ लागलं आहे.

डॉ. डीन आर्निश यांच्या म्हण्याप्रमाणे तर हृदयविकार होण्यात मानसिक एकटेपणा हा इतर घटकांइतकाच किंबहुना इतर घटकांपेक्षाही अधिक महत्त्वाचा आहे. कारण या नेहमीच्या, वैद्यकीय क्षेत्रात धोक्याचे घटक म्हणून ओळखल्या गेलेल्या बाबींमुळे फक्त ५० टक्के रूग्णांच्या हृदयविकारामागचं कारण कळू शकतं. उरलेल्या सुमारे ५० टक्के रूग्णांना हृदयविकार का झाला असावा ते नक्की सांगता येत नाही. कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब यांसारख्या गोष्टी हृदयविकाराच्या संदर्भात महत्त्वाच्या आहेतच पण इतरही काही घटक त्यादृष्टीने महत्त्वाचं आहेत. मानसिक ताण हा महत्त्वाचा घटक असल्याचं आता मान्य होऊ लागलेलं आहे. त्याच्या जोडीला मानसिक एकटेपणा यागोष्टीलाही फार महत्त्व आहे असं ऑर्निश याचं प्रतिपादन आहे.

हृदयविकाराचं मूळ कारण शोधण्याच्या प्रयत्‍नाला ते जेव्हा लागले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जी माणसं मनानं एकटी असतात, त्यांची इतरांशी फारशी जवळीक नसते त्यांच्यात हृदयरोगाचं प्रमाण जास्त असतं. मानसिक एकटेपणामुळे मनावर सतत सौम्य ताण राहतो. आणि असा सतत ताण हे हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकतं. याउलट दुस-याशी जवळीक साधण्यानं, संपर्क वाढण्यानं हा ताण हलका होतो आणि परिणामस्वरूप आजारही कमी होऊ लागतो. एकटी राहणारी किंवा एकांडी माणसं थोडी चमत्कारिक वागतात, तुसडी असतात, हेकट असतात असे किंवा अशाच प्रकारचे उद्‍गार आपल्याला पुष्कळदा ऐकू येतात. मनानं निरोगी राहण्यासाठी माणसांमध्ये मिळून मिसळून राहणं, मैत्री करणं, कुणाशी तरी जवळीक असणं आवश्यक असतं हे सर्वसाधारणपणे सर्वांना मान्य असतं. अशी जवळीक, मिळून मिसळून राहणं हे केवळ मानसिकच नव्हे तर शरिरीक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे असं आता लक्षात येऊ लागलं आहे. अनेक संशोधन अभ्यासांमध्ये तसं आढळून आलं आहे.

१. ‘ऍलामेडा कांउटी स्टडी’ या नावानं प्रसिध्द असणाऱ्या एका संशोधन प्रकल्पात सॅन फ्रान्सिस्कोच्या आसपास राहणा-या ६९२८ स्त्री-पुरूषांचा तर ‘नॉर्थ कॅरेलिया स्टडी’ मध्ये पूर्व फिनलंडमध्ये राहणाऱ्या १३३०१ स्त्री-पुरूषांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासांचा कालावधी ५ ते ९ वर्षाचा होता. या प्रकल्पांमधून मिळालेल्या आकडेवारीचा अभ्यासं केल्यानंतर असं दिसून आलं की समाजात मिळून मिसळून राहणा-या आणि इतरांशी जवळीक असणा-या व्यक्तींपेक्षा एकांडेपणानं जीवन व्यतीत करणाऱ्या आणि कोणाशी फारशी जवळीक नसणा-या व्यक्तींमध्ये हृदयविकारानं आणि इतरही दुखाण्यामुळे अकाली मृत्यु येण्याची शक्यता दोन ते तीन पट अधिक असते.

२. सामाजिक किंवा मानसिक आधारामुळे, एवढचं नव्हे तर इतर सजीव प्राण्यांशी होणा-या व्यवहारामुळे, सरमिसळीमुळे, प्राण्यांमध्येही दुखणं होण्याचं प्रमाण कमी होतं असा एक आश्‍चर्यजनक निष्कर्ष ह्यूस्टन विद्यापीठात डॉ. रॉबर्ट नेरेम यांनी केलेल्या संशोधनातून पुढे आलेला आहे. या संशोधनात धमन्या तुंबण्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून काही सशांना भरपूर कोलेस्टेरॉलयुक्त आहार देण्यात येत होता. हे ससे पिंजर-यासाठी ठेवलेले होते आणि या पिंज-यांची जमिनीपासून छतापर्यंत थप्पी लावलेली होती. संशोधन कालावधी संपल्यावर सर्व सशांची तपासणी केली असता खालच्या पिंज-यामध्ये ठेवलेल्या सशांपेक्षा वरच्या पिंज-यामध्ये असलेल्या सशांच्या धमन्या अधिक तुंबलेल्या आढळल्या त्यांच्यात जास्त अडथळे निर्माण झालेले होते. हे असं का झालं असावं ते संशोधकांच्या प्रथम लक्षात येईना.

पण सर्व गोष्टींचा सखोल विचार केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की बाकी सर्व गोष्टी सखोल असल्या तरी एका बाबतीत मात्र खालच्या आणि वरच्या सशांमध्ये फरक होता. सशांना ठरलेल्या वेळी त्यांचं खाद्य देण्यासाठी जी तंत्रज्ञ महिला रोज येत असे ती खालच्या पिंज-यामधील सशांशी त्या वेळी खेळत असे, बोलत असे. पण वरच्या पिंज-यामधील सशांशी मात्र ती खेळू शकत नसे कारण ती ठेंगणी होती वरच्या पिंज-यामध्ये अन्न ठेवण्याचं कर्तव्य तवढं ती पार पाडत असे. पण त्यांच्याशी खेळू-बोलू शकत नसे. या वरवर पाहता लहान वाटणा-या गोष्टींमुळे सशांना होणाऱ्या धमनीविकारात फरक पडला होता.

सर्व सशांना सारखंच अन्न देण्यात येत असूनसुध्दा आणि इतर बाबींमध्येही त्यांच्यात सारखेपणा असतानासुध्दा वरच्या पिंजऱ्यांमधल्या सशांना कमी प्रमाणात धमनीविकार झाला होता. या संशोधनातून मिळालेल्या या अनपेक्षित निष्कर्षाची खात्री करून घेण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा असाच प्रयोग करण्यात आला. या नवीन प्रयोगातल्या सशांच्या एका गटातील सशांना गोंजारणे, त्यांच्याशी बोलणे, खेळणे या गोष्टी प्रयोगाचा एक भाग म्हणून नियमितपणे करण्यात येत होत्या तर दुस-या गटाला नियमितपणे फक्त खाऊ घालण्यात येत होतं.

प्रयोगाचा कालावधी संपल्यावर असं आढळून आलं की दुस-या गटातल्या सशांमधल्या कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि हृदयस्पंदनाचा वेग या गोष्टी तुलनीय असूनसुध्दा एवढा मोठा फरक पडला होता.

३. कुटुंबात राहणा-या किंवा एकत्र राहणा-या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचं प्रमाण, एकटं राहणा-या व्यक्तींमध्ये असलेल्या हृदयविकाराच्या प्रमाणापेक्षा कमी असतं. एवढंच नव्हे तर एकटं राहणा-या व्यक्तीनं एखादा प्राणी, पक्षी किंवा मासे पाळले तरीसुध्दा हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. अशा पाळीव प्राण्यांमुळेही एकटेपणा आणि हृदयविकार कमी होतो.

४. इतरांशी असणारी जवळीक आणि त्यातून मिळणारा मानसिक आधार या गोष्टींची गुणवत्ता त्याच्या बाहुल्यापेक्षा महत्वाची असते. म्हणजे खूप लोकांशी परिचय असण्यापेक्षा थोड्याच लोकांशी दाट मैत्री असणे, खरी जवळीक असणं अधिक महत्वाचं आहे. याचा अर्थ अनेकांशी परिचय असू नये असा नाही. असा परिचय असणंही चांगलंच आहे. पण ज्यांच्याशी आपलं मन मोकळं करून बोलता येईल, ज्यांच्याशी खरी आंतरिक जवळीक असेल असे मित्र, आप्त सुहृद असणं आणि त्यांच्याशी आपलं मन मोकळं करणं, आपले विचार, आपल्या भावना व्यक्त करणं हे फार महत्वाचं आहे.

५. येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधल्या एका संशोधन प्रकल्पात ११९ पुरूष आणि ४० स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला. या सर्वांची अँजियोग्राफी केली असता असं आढळून आलं की ज्या व्यक्तींना आपल्या प्रेमाची, मायेची, आपली काळजी करणारी माणसं आहेत असं वाटत होतं त्याच्यात हृदयधमनी विकाराचं प्रमाण इतरांपेक्षा कमी होतं. विशेष म्हणजे वय, लिंग, उत्पन्न, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, आनुवंशिकता, एवढंच नव्हे तर चिडचिडपणा, रागीट वृत्ती या धोक्याच्या घटकांच्या पातळीशी या कमी प्रमाणाचा काही संबंध नव्हता.

६. ओहायओ स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनमधल्या शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की जे लोक फार एकटे, एकाकी असतात त्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी असते.

७. ‘सायन्स’ या प्रसिध्द आणि प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे समाजात राहूनही अलिप्त, वेगळं राहणं, एकटेपणा वाटणं ही गोष्ट मृत्युसंख्येच्या प्रमाणाच्या दृष्टीनं धूम्रपान, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलची उच्च पातळी, लठ्ठपणा, शारीरिक व्यायाम व श्रम यांची कमतरता यांसारख्या घटकांइतकीच महत्वाची आहे. किंबहुना वयामुळे पडणारा फरक लक्षात घेतल्यावर असं म्हणता येतं कि एकटेपणा हा धूम्रपानाइतका किंवा त्याहूनही अधिक धोक्याचा घटक आहे. डॉ. डीन ऑर्निश यांच्या प्रयोगात भाग घेणारे रूग्ण समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधून आणि वेगवेगळ्या व्यावसायीक क्षेत्रांमधून आलेले होते.

या प्रयोगात त्यांनी भाग घेतला नसता तर त्यांचा एकमेकांशी फारसा संबंधही आला नसता. त्यांच्यापैकी प्रत्येकाला हृदयविकार झालेला होता एवढी एकच गोष्ट त्या सर्वांच्यात समान होती. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसं डीन ऑर्निश यांच्या असं लक्षात येऊ लागलं की त्या सर्व रूग्णांमध्ये आणखी एक अतिशय महत्वाची अशी समान गोष्ट होती आणि ती म्हणजे त्यांची स्वतःकडे व जगाकडे बघण्याची दृष्टी. इतर अनेक गोष्टींमध्ये त्यांच्यात फरक असला तरी प्रत्येकजण मानसिक दृष्ट्या एकटा होता, एकाकी होता.

‘मी अगदी एकटा/एकटी आहे आणि मला हे एकटेपण नको आहे. मला इतरांशी मैत्री हवी आहे. मला अशी जवळीक हवी आहे. मला अशी जवळीक साधता येत नाही त्या अर्थी माझ्यात काहितरी उणीव आहे, कमतरता आहे. ती मला भरून काढायला हवी. विशेष काहीतरी करून दाखवायला हवं, खास कोणीतरी बनायला हवं म्हणजे मला इतरांकडून प्रेम मिळेल’. अशी साधारणपणे त्या प्रत्येकाची भावना होती. आपल्यात काहीतरी उणीव आहे अशी भावना एकदा झाली की ती तथाकथित उणीव भरून काढण्याचा प्रयत्‍न सुरू होतो. अधिक पैसा, अधिक यश, अधिक सत्ता यासाठी आणि यांसारख्या गोष्टींसाठी धडपड सुरू होते. त्या मिळाल्या की आपलं महत्व प्रस्थापित होईल, इतरांचं प्रेम आपल्याला मिळेल, आणि आपण सुखी होऊ असं वाटू लागतं. यातली हवी ती गोष्ट मिळाली नाही की आणखी धडपड, आणखी ताण सुरू होतो. आपल्याला हवी असलेली गोष्ट न मिळता ती दुसऱ्याला मिळाली तर ईर्षा, असूया या भावनांमुळे ताणात भर पडते. आणि हवी ती गोष्ट मिळाली, यश मिळालं तरी थोड्याच काळात असं लक्षात येतं की त्यामुळे काही आपण फार काळ सुखी होणार नाही आहोत. दुसऱ्याचं प्रेमही त्यामुळे मिळणार नाही. मिळवलेल्या गोष्टीचं सुख फार थोडा काळ टिकणार आहे. म्हणजे अजूनही काहीतरी कमी आहे. आणखी प्रयत्‍न करायला हवेत म्हणजे हवं ते मिळेल. सुख मिळेल. लोकांचं प्रेम मिळेल. मग आणखी धडपड सुरू होते आणि अशी व्यक्ती आणखी एकटी पडत जाते. स्वकेंद्रित वृत्ती, चिडचिडा आणि सगळ्या जगावर राग काढणारा किंवा राग दडपणारा स्वभाव, कडवटपणा हे स्वभाव विशेष व्यक्तीचा हृदयविकाराकडे झुकणारा कल दर्शवतात पण या साऱ्यांच्या मुळाशी असतो तो एकटेपणा, एकाकीपणा. आणि हा एकटेपणा धोक्याच्या इतर घटकांपेक्षाही अधिक धोकादायक असतो असा ऑर्निश यांचा दावा आहे.

या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कार्यक्रमात भाग घेणा-या एका रूग्णाचं उदाहरण दिलं आहे. या रुग्णाला त्यांनी सॅम हे नाव दिलं आहे. त्याचं खरं नाव वेगळं आहे. तो एक जागतीक दर्जाचा धावपटू आणि सायकलपटू होता.

ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पूर्वी भाग घेतल्याचं त्यानं कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच सांगितलं होतं. तो अतिशय इर्षेनं सर्व स्पर्धामध्ये भाग घेत असे. एखाद्या शर्यतीत जर तो जिंकला तर तो पुढच्या शर्यतीपर्यंतचाच जेता आहे असं त्याला वाटत असे. आणि तो दुसरा आला तर तो पराभूत झाल्यामुळे पुढच्या शर्यतीत त्यानं जिंकायलाच हवं अशी त्याची मनोधारणा होत असे. म्हणजे तो पहिला किंवा दुसरा आला तरी त्याच्या मनातली ईर्षा संपत नसे आणि ताण कमी होत नसे. परिणामी तो मनानं एकटा पडत असे.

सॅम ४९ वर्षाचा असताना एका शर्यतीत धावताना त्याच्या छातीत खूप दुखू लागलं. त्यानं ती शर्यत तरीही पुरी केली आणि अँजिओग्राम काढला. त्याच्या मोठ्या हृदयधमन्यांपैकी अनेक धमन्या पुष्कळ प्रमाणात तुंबल्याचं आढळून आल्यामुळे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर छातीतल्या वेदना थांबल्या आणि त्यानं परत शर्यतीमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली. सहा आठवड्यांनी एका शर्यतीत धावताना त्याच्या छातीत परत वेदना होऊ लागल्या आणि तो परत रूग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर परत अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांचा विचार होता. पण त्याच्या प्रमुख हृदयधमन्यांपैकी एक धमनी पूर्ण तुंबली असल्याचं लक्षात आल्यामुळे शस्त्रक्रियेचा विचार सोडून द्यावा लागला. त्यानंतर तो ऑर्निश यांच्या कार्यक्रमात दाखल झाला. कार्यक्रमात दाखल झाल्यावर सॅमनं त्याच्या जिवनशैलीत बदल करायला सुरूवात केली. कार्यक्रमात सुचवलेला आहार तो घेऊ लागला, धूम्रपान करेनासा झाला आणि मानसिक ताणाच्या हाताळणीसाठी सुचवलेल्या गोष्टीही तो केवळ यांत्रिकपणे करू लागला. पण सहा आठवड्यांनी त्यानं ताणाच्या हाताळणीसाठी आवश्यक त्या तंत्राचा सराव करण्याचं थांबवलं. कार्यक्रमात सुचवलेल्या मर्यादेत कितीही व्यायाम करायला हरकत नाही, मात्र व्यायाम करताना घड्याळ लावून चुरशीनं व्यायाम करायचा नाही असं डॉ. ऑर्निश यांनी त्याला सांगितलं होतं. कारण इतर कोणी नसलं तर सॅम स्वतःशीच स्पर्धा करतो आणि त्यातून ताण निर्माण होतो असं ऑर्निश यांच्या लक्षात आलं होतं. शर्यतीच्या यशापयशावर तो स्वतःची योग्यता ठरवत असे.

जीवनशैली बदलाच्या कार्यक्रमात सुचवल्याप्रमाणे आहार आणि व्यायाम यागोष्टी सॅम जरी पाळत असला तरी ग्रुप डीस्कशनमध्ये भाग घ्यायला आणि स्वतःच्या भावना उघड करायला, चर्चा कराला मात्र तो नकार देत असे. पहिल्या पहिल्यांदा जेव्हा तो थोडा बोलत असे, तेव्हा त्याच्या बहूतेक सगळ्या समस्यांसाठी तो त्याच्या मैत्रिणीला दोष देत असे. पुढे मग तो काही न बोलता गप्प बसून राहू लागला. या कार्यक्रमातले एक मानसतज्ञ डॉ. बिलिंग्ज यांना भेटायला तर त्यानं नकारच दिला.

आहाराचं पथ्य सॅम अतिशय काटेकोरपणे पाळत असल्यामुळे त्याच्या कोलेस्टेरॉलची पातळी २४९ वरून १२१ पर्यंत खाली आली. त्यामुळे त्याच्या छातीत दुखण्याचं प्रमाण खूप कमी झालं. कार्यक्रमात सामील होण्यापूर्वी नुसत्या चालण्यानंही त्याच्या छातीत दुखू लागायचं. नऊ महिन्यांमध्ये त्याच्या प्रकृतीत इतकी सुधारणा झाली की तो एका आठवडाभराच्या काळात शंभर मैल धावणं आणि सायकल चालवणं या दोन गोष्टी करू लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या व्यायामानं सुध्दा त्याच्या छातीत दुखेनासं झालं.

पण हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकणाऱ्या अधिक मूलभूत अशा बाबींकडे मात्र त्यानं दुर्लक्ष केलेलं होतं. ऑलिंम्पिक खेळाडू होण्याचं त्याचं स्वप्‍न होतं आणि ते साध्य करण्यासाठी तो अतिशय कष्टही करत असे. तरीसुध्दा तो ऑलिंम्पिक पर्यंत कधीच पोचू शकला नव्हता. ज्यामुळे आपलं मोठेपण, आपली विशेषता सिध्द होईल असं त्याला वाटत होतं ती गोष्ट साध्य करणात तो अपयशी ठरला होता. ते झाकण्यासाठी तो आपण ऑलिंम्पिकमध्ये भाग घेतल्याचं खोटचं सांगत असे. स्वतःची एक खोटीच प्रतिमा त्यानं निर्माण केली होती. स्वतःचा उनेपणा झाकण्यासाठी, प्रेम आणि आदर या गोष्टींना आपण पात्र आहोत असं दर्शवण्यासाठीचा त्याचा हा प्रयत्‍न होता. एकटेपणातून त्याचा हा खोटेपणा निर्माण झाला होता.

आपणच निर्माण केलेली ही प्रतिमा कायम राहावी म्हणून सॅमला सतत दक्ष राहावं लागे आणि त्यामुळे तो सतत सौम्य ताणाखाली वावरत असे. अर्थात या सगळ्या गोष्टी डॉ. ऑर्निश यांना पुष्कळ उशीरानं कळल्या. सॅमला कार्यक्रमात सामील करून घेताना ऑर्निश यांनी त्याला तो कार्यक्रमात असेपर्यंत कुठल्याही स्पर्धेत भाग घेऊ नये असे सांगितलं होतं. सुरूवातीला त्यानं ही अट पाळलीही होती पण काही काळानंतर त्यानं कुणाच्या नकळत सायकलिंगच्या आणि चालण्याच्या शर्यतीमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. ग्रुप डिस्कशनमध्ये तो सहसा सामिल होतच नसे. क्वचित एखादे वेळी तो हजर राही. अशाच एका डिस्कशनला तो हजर असताना त्या गटाच्या शिक्षकांनी रूग्णांना आपापल्या हृदयाचं चित्र-प्रत्येकाच्या कल्पनेत असलेलं काढायला सांगितलं. हृदयाचं दुखणं बरं करण्याच्या प्रयत्‍नात कल्पनाचित्रांचा वापर करण्याचा तो एक भाग होता. सॅमनं त्याच्या हृदयाचं जे चित्र काढलं त्यात हृदयाभोवती एक काळी भिंत काढली होती.

काळ्या भिंतीच्या आत बंदिस्त चित्राविषयी, स्वतःच्या एकटेपणाविषयी काही बोलायला किंवा चर्चा करायला मात्र तो तयार झाला नाही. त्यानंतर त्यानं परत कधी ग्रुप डिस्कशनमध्ये भागही घेतला नाही. सॅमनं कार्यक्रमात भाग घ्यायला सुरूवात केल्यानंतर दहा महिन्यांनी त्याला मृत्यू आला. तो मरण पावला त्यावेळी तो एका व्यायामशाळेत वल्हवण्याच्या यंत्रावर व्यायाम करत होता. पण तो नुसता व्यायाम नव्हता तर एका व्हिडिओ गेममधल्या वल्हवायच्या नौकांबरोबर त्याची स्पर्धा चालू होती. त्याच वेग जसा कमीजास्त होत असे तसा व्हिडिओमधल्या त्याच्या नौकेचा वेगही कमीजास्त होई. एक तासभर अशी स्पर्धा खेळल्यानंतर त्यानं १५० व्हिडिओ नौकांना शर्यतीत मागे टाकल्याचं त्यानं अभिमानानं सागिंतलं. मग तो व्यायामशाळेत विश्रांती कक्षात गेला आणि तिथे कोसळला. त्यावेळी तिथे एक हृदयतज्ञ उपस्थित होते. पण त्यांच्या उपचारांचा काहीही उपयोग न होता सॅमला मृत्यु आला.

सॅमच्या देहाची जेव्हा उत्तरीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्याच्या एका हृदयधमनीमध्ये मोठी रक्तगाठ असल्याचं आणि दुसऱ्या एका हृदयधमनीला पेटका आल्याचं आढळून आलं. या पेटक्यामुळे धमनीच्या अस्तराला दुखापत होऊन किटणातून रक्तस्त्राव झाला होता. या गोष्टी तीव्र मानसिक ताणामुळे झाल्या असण्याची खूप शक्यता होती. व्यायामशाळेत सॅम जो व्यायाम करत होता तो इतक्या इर्षेनं, स्पर्धेच्या भावनेनं करत होता की, जणू काही व्हिडिओगेममधल्या त्याच्या जयापजयावर त्याचं जीवन-मरण अवलंबून होतं. दुर्दैवानं त्याच्यासाठी तो खरोखरच जीवनमरणाचा खेळ ठरला.

डॉ. ऑर्निश यांच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर हृदयविकारानं मृत्यू येणारा सॅम हा एकटाच रूग्ण होता. त्याच्या बाबतीत असा अकाली मृत्यू येण्याचं कारण डॉ. ऑर्निश जेव्हा खोलात जाऊन शोधू लागले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या सुचनांप्रमाणे आहारात आणि शारीरिक व्यायामात सॅमनं बदल केला होता. पण मोकळेपणानं तो कुणाशी कधी बोलला नव्हता की स्वतःची स्पर्धावृत्ती त्यानं सोडली नव्हती. कोणताही व्यायाम तो इर्षेनंच करत असे आणि आपण ऑलिंम्पिकपर्यंत पोचल्याचं त्यानं खोटचं सांगितलं होतं. म्हणजे खेळातल्या नैपुण्यावर आपली लायकी अवलंबून आहे असं त्याला मनोमन वाटत होतं. आपली लायकी, आपली योग्यता ही एखाद्या बाह्य गोष्टीवर, ती गोष्ट घडण्या न घडण्यावर किंवा एखाद्या व्यक्तीवर, त्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या प्रेमावर अवलंबून असली की ती गोष्ट, ती घटना, ती व्यक्ती यांना आपल्या आयुष्यात प्रचंड महत्वाचं स्थान मिळतं आणि आपलं सुखदुःख, आपली आशा-निराशा या गोष्टी त्या घटनेवर किंवा त्या व्यक्तीवर अवलंबून राहतात. आपली स्वतःची योग्यायोग्यता आपण तिच्या मापानं मोजू लागतो आणि मग आपली योग्यता टिकवून ठेवण्यासाठी धडपड, स्पर्धा, ईर्षा आणि सततचा मानसिक ताण सुरू होतो. सॅमच्या बाबतीत असचं घडलं होतं.

एखाद्या स्पर्धेमधल्या जयापजयावर सतत स्वतःची योग्यता ठरवणं हे त्या यशाला आपल्या आयुष्यात प्रचंड महत्व देणं आहे. त्याच्यावर आपलं सुखदुःख अवलंबून ठेवणं आहे. असं केलं की त्या एकाच गोष्टीभोवती आयुष्य फिरत राहतं. तेचं आपलं जीवनसर्वस्व बनतं. ही चूक आहे आणि ती आपण करता कामा नये असं लक्षात आलं तर इर्षेच्या या पकडीतून माणूस बाहेर पडू शकतो. अणिक आनंदी होऊ शकतो. एवढचं नव्हे तर त्याची कार्यक्षमताही वाढू शकते. डीन ऑर्निश यांनी उध्दृत केलेलं माईक रीड या गोल्फरचं उदाहरण त्या दृष्टीनं उद्‍बोधक आहे.

माईक रीड हा प्रसिध्द अमेरिकन गोल्फमधलं नैपुण्य वाखाणण्याजोगं होतं. असं असूनही तो स्पर्धेत कधीच विजयी होत नसे. एखादी स्पर्धा तो हरला की त्याची मित्रमडंळी गमतीनं त्याला चिडवत. काही परिचित आणि अपरिचितही त्याला सहानुभुतीच्या तारा पाठवत. कारण त्याचा खेळ फार चांगला होता हे सर्वांना मान्य होतं. मित्रांच्या आणि इतरांच्याही सहानुभुतीमुळं माईक आणखी सराव करत असे आणि अधिक ईर्षेनं पुढच्या स्पर्धेत भाग घेत असे. आणि त्या स्पर्धेतही हरत असे. असं वर्षानुवर्ष चालू होतं. त्याचं सगळं आयुष्य गोल्फभोवती फिरत होतं. पण त्याला हवं होतं ते यश काही मिळत नव्हतं. हळुहळू माईकचं स्पर्धेतलं अपयश हा चेष्टेचा विषय राहिला नाही. तो स्पर्धा हरल्यानंतर गमतीनं काही बोलण्याऐवजी त्याचे मित्र संकोचानं त्याची नजर चुकवू लागले. आपल्या बाबतीत असं का होतं हे माईकला कळत नव्हतं. त्यानं आणि त्याच्या पत्‍नीनं बराच विचार केला. पण त्यांना काही कारण सापडेना. शेवटी स्पर्धेतलं अपयश त्यांनी मनोमन स्वीकारून टाकलं. त्यासाठी मानसिक त्रास करून घ्यायचा नाही असं ठरवलं. आणि लगेचच पुढची गोल्फ टूर्नामेंट त्यानं जिंकली!

मानसिक ताण हलका करण्यासाठी दुसऱ्याजवळ बोलणं, आपलं मन मोकळं करणं, चर्चा-संवादामध्ये भाग घेणं असे उपाय करता येतात. पण कित्येकदा या गोष्टी करायला रूग्णांची मनापासून तयारी नसते.

स्वतःच्या भावना दडपून ठेवणं, अगदी जवळच्या माणासांपाशीही आपलं मन मोकळं न करणं या गोष्टींची त्यांना वर्षानुवर्षाची सवय झालेली असते. स्वतःच्या भावनाभोवती म्हणजेच स्वतःच्या हृदयाभोवती त्यांनी जणू काही एखादी संरक्षक भिंत उभारलेली असते. अशी भिंत उभी करण्यासाठी पुर्वायुष्यात काही कारणंही घडलेली असू शकतात. भावना व्यक्त केल्यावर त्या भावनांचा अव्हेर झालेला असतो, कधी कुचेष्टा झालेली असते, तर कधी एखाद्याला दुसऱ्याचा रागही ओढवून घ्यावा लागलेला असतो. अशा प्रकारचा प्रतिसाद दुखःद असतो आणि तो परत परत अनुभवाला येऊ लागला की आपल्या भावना मनात झाकून ठेवायला ती व्यक्ती शिकते. हळुहळू एक संरक्षक भिंतच आपल्या हृदयाभोवती ती बांधत जाते. त्यामुळे दुःखकारक अनुभवापासून, तिचं रक्षण होतं. पण त्याचबरोबर मनातल्या भावना मनातच कोंडून राहतात.

कित्येकदा तर आपल्या मनात काय भावना आहेत हेही त्या व्यक्तीला जाणवेनासं झालेलं असतं. केवळ इतरांपासून नव्हे तर स्वतःपासून, स्वतःच्या भावनांपासूनही ती व्यक्ती तुटलेली असते. एकटी पडलेली असते. हा एकटेपणा तीन पातळ्यांवरच्या तुटलेपणामुळे असतो.

  1. स्वतःपासून (स्वतःच्या भावनांपासून) तुटलेपणा
  2. इतरांपासून तुटलेपणा
  3. परम स्वत्वापासून (स्वतःच्या परम स्वरूपापासून, यालाच ईश्वर, शक्ती, अल्ला, गॉड असं म्हटलं जातं असावं) तुटलेपणा. हृदयविकाराच्या दृष्टीनं एकटेपणा, तुटलेपणा फार धोकादायक ठरू शकतो.

शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्यांच्या भिंती उलगडून सपाट केल्या, (एखादी रबरी नळी उभी चिरून तिचं रबर सपाट केल्याप्रमाणे) तर या भिंती ६०,००० ते ७०,००० चौ. फूट जागा व्यापतील आणि एका फुटबॉल मैदानाला त्यांचं आच्छादन होऊ शकेल.

  • 1
  • 2
  • 3

9

हृदयविकार

  • प्रश्‍नोत्तरे
  • डॉ. डीन ऑर्निश यांचा कार्यक्रम
  • इलेक्ट्रोफिजियॉलॉजी
  • धोक्याचे घटक
  • पाळायची पथ्ये
  • हृदयाला उपकारक पाककृती
  • हृदयविकाराची सद्यःस्थिती
  • हृदयरोगाचे निदान

हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?

हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का? जगभरात एकूण मृत्यूंपैकी जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयविकारानं होतात आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे. पुढे वाचा…

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.