एम.टी.पी म्हणजे वैद्यकशास्त्राच्या मदतीने गर्भ पाडणे, याला गर्भपात असेही म्हणतात. हा नको असलेल्या गरोदरपणातून सुटका करून घ्यायचा वैद्यकीय मार्ग आहे.
कोणताही उच्चशिक्षित स्त्रीरोगजज्ञ (MD/DGO) एम.टी.पी करू शकतो. कोणताही MBBS डॉक्टर ज्याने एम.टी.पी चे प्रशिक्षण घेतले आहे तो ही पध्दत अमलात आणू शकतो. सरकारने प्राधिकृत केलेल्या केंद्रावरच एम.टी.पी करून घ्यावी.
खालील परिस्थितीत एम.टी.पी करण्यास परवानगी आहे.
- गर्भनिरोधक गोळ्याचा उपयोग न झाल्यास
- मातेच्या शारीरिक/मानसिक आरोग्यावर परिणाम होणार असल्य़ास
- बलात्काराने गर्भ राहिल्यास
- गर्भाचे आरोग्य व्यवस्थित नसेल तर
गर्भधारणा झाल्यापासून २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची कायदेशीर परवानगी आहे. गर्भारपणाच्या पहिल्या काळात गर्भपात केल्यास तो सुरक्षित असतो, नंतर केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकतो.
गर्भाचे लिंग समजल्यानंतर जर गर्भपात केला तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. कारण महाराष्ट्र सरकारने लिंग परीक्षा करण्यावर बंधन घातले आहे काही राज्यांमध्ये बेकायदा रीतीने गर्भाचे लिंग समजू शकते.
औषधांनी केला जाणारा गर्भपात - Mifepristore या औषधाने गर्भपात होतो. हे भारतात सहजगत्या उपलब्ध होत नाही. वैद्यकीय निरीक्षणाखाली या औषधाचा वापर करावा. कारण त्याचे अनुषंगिक परिणाम होतात आणि त्रासदायक गुंतागुंत निर्माण होते.
एम.टी.पी मुळे निर्माण होणारी गुंतागुंत - ही क्रिया भूल देऊन केली जाते आणि त्यामुळे या पध्दतीतील धोके वाढतात. रूग्णास ही क्रिया चालू असताना आणि नंतर खूप रक्तस्त्राव होतो. पुन्हापुन्हा गर्भपात होण्याची शक्यता वाढते. जर संसर्ग झाला तर काही दुर्मिळ केसेसमध्ये पुन्हा गर्भाधारणा होत नाही.
पांढरा अगर पिवळसर अगर हिरवट श्लेष्मल स्त्राव योनीमार्गे बाहेर पडणे
योनीमार्गे पांढरा स्त्राव बाहेर पडणे ही क्रिया शरीरक्रियाशास्त्र किंवा विकृतीविज्ञानाची असू शकते. हे सामान्य लक्षण आहे जे रूग्णांमध्ये दिसून येते.
शरीरक्रिया शास्त्राच्या दृष्टीने श्वेतप्रदर - मासिकपाळी आधि किंवा मासिक पाळीनंतर स्त्रियांना जास्त प्रमाणात श्लेष्मल स्त्राव बाहेर पडल्याचा अनुभव येतो, जे सामान्य आहे. हे लक्षण कुमारिकांमध्ये आणि लैंगिक उत्तेजन झाल्यास दिसून येते.