Print
Hits: 10330

पांढरा अगर पिवळसर अगर हिरवट श्लेष्मल स्त्राव योनीमार्गे बाहेर पडणे. योनीमार्गे पांढरा स्त्राव बाहेर पडणे ही क्रिया शरीरक्रियाशास्त्र किंवा विकृतीविज्ञानाची असू शकते. हे सामान्य लक्षण आहे जे रूग्णांमध्ये दिसून येते.

शरीरक्रियाशास्त्राच्या दृष्टीने श्वेतप्रदर
मासिकपाळी आधि किंवा मासिक पाळीनंतर स्त्रियांना जास्त प्रमाणात श्लेष्मल स्त्राव बाहेर पडल्याचा अनुभव येतो, जे सामान्य आहे. हे लक्षण कुमारिकांमध्ये आणि लैंगिक उत्तेजन झाल्यास दिसून येते.

विकृत विज्ञानाच्या दृष्टीने श्वेतप्रदर - श्वेतप्रदराची सामान्य कारणे

  1. योनी मार्गातील संसर्ग - याचे प्रकार खालील प्रमाणे
    • बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग, क्षय, गुप्तरोग
    • परंजीवी गुल्म - Cancliclial, Trichenunal
    • विशेष नाही - परकीय शरीर, वृध्दावस्था इ.
  2. गर्भाशयाच्या मानेच्या पेशी नष्ट होणे, गर्भाशयाच्या मानेचा दाह.
  3. गर्भाशयात निर्माण होणारी मऊ गाठ.