Print
Hits: 14991

१९९० सालापासून पुण्यात सायटोकेम लॅबोरेटरी ही विकृती विज्ञानाची अद्ययावत प्रयोगशाळा कार्यरत आहे.
१९९२ मध्ये सायटोकेन लॅबोरेटोरी ने वीर्य बँक सुरू केली, त्यांच्यापैकी कायम वाढत्या प्रमाणात वीर्याच्या नमुन्याची कृत्रिम गर्भधारणेसाठी मागण्या येउ लागल्या

AID किंवा कृत्रिमरित्या योनीत दात्याचे वीर्य घालणे ही एक साधी पध्दत आहे. ज्या स्त्रिच्या नवर्‍याच्या वीर्यात शुक्राणू/शुक्रजंतु नसतात किंवा फलीत होणारे शुक्रजंतु नसतात त्यांच्यात ही पध्दत वापरली जाते.

स्त्रीरोग विज्ञान
रोगनिदान शास्त्राची एक शाखा आहे आणि स्त्रीच्या पुनरूत्पादन संस्थेविषयी यात विशिष अभ्यास केला जातो.

आधुनिक स्त्रीरोग विज्ञानात मासिक पाळीतील बिघाड रजोनिवृत्ती, प्रजननाच्या अवयवात बिघाड होते किंवा अवास्तव वाढ होणे, संप्रेरक आणि जननशक्तीत प्रश्न निर्माण होणे आणि गर्भट निरोधके.

प्रसूतिविज्ञान
चिकित्सा शास्त्राची संबंधित ही शाखा आहे, यात गरोदरपणात आणि बाळंतपणात स्त्रिची काळजी घेणे आणि उपचार करणे यावर विशेष अभ्यास केला जातो. स्पष्ट केले की, भारतातील १०ऽ ते १५ऽ जोडपी गर्भधारणा न होण्याच्या प्रश्नाला तोंड देत असतात. आणि बर्‍याचशा केसेसमध्ये नवर्‍यांच्या वीर्यात शुक्रजंतूची कमी हे कारण असते अशा परिस्थितीत या जोडप्यांपुढे दोन पर्याय असतात.
१. मूल दत्तक घेणे आणि
२. कृत्रिमरित्या वीर्य घेणे

कृत्रिमरित्या वीर्य देण्याची प्रक्रिया अगदी साधी आहे. ज्या स्त्रिच्या नवर्‍याच्या वीर्यात शुक्रजंतु नसतात किंवा फलित होणारे शुक्रजंतु नसतात. त्यांच्यात सामान्य वैशिष्ट्ये असलेले वीर्य घातले जाते, तरीदेखील अजून या पध्दतीबद्दल देशात निषेध व्यक्त केला जातो, परंतु आता बरीच जोडपी ही पध्दत अवलंबिण्यास तयार होत आहेत.

पुण्यातील स्त्रीरोग तज्ञांनी आणि वांझ जोडप्यांनी या कल्पनेला चांगला प्रतिसाद दिला. मुंबईहून वीर्यांचे नमुने मागविणे खर्चिक होते कारण विशिष्ट सिलेंडरमध्ये ठेवून आणावे लागत असत. डॉ. मिराशींनी सांगितले की एकदा वीर्याचा नमुना फ्रीजमधून बाहेर काढला की त्याची गुणवत्ता टिकविण्यासाठी तो एका तासाच्या आत वापरात आणला गेला पाहिजे. चारशे रूपयात तुमच्या घराजवळ तुम्हांला चांगले नमुने मिळणे हा जणू जोडप्यांसाठी चमत्कारच ठरला.

‘गुणवत्तयुक्त नमुन्यांशिवाय वेळ हा देखील या केसेसमध्ये एक महत्वाचा घटक ठरतो.’ असे डॉ. ठकार यांनी नमूद केले. ज्या स्त्रिला कृत्रिमरित्या योनीमार्गे वीर्य देण्याचे उपचार दिले जात असतील, तर हे उपचार मासिक चक्राच्या १४ व्या दिवशी किंवा बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होण्याच्या २४ तासाच्या आत दिले गेले पाहिजे. अन्यथा तिचा संपूर्ण महिना वाया जाईल आणि पुन्हा पुढल्या महिन्यापर्यंत थांबावे लागेल. हा उपचार रूग्णासाठी तसा रूग्णासाठी तसा खर्चिक असतो. कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही महिन्यात वीर्य मिळणे हे अतिशय महत्वाचे असते. आणि ही गरज सायटोकेन पूर्ण करते.

डॉ. ठकारांनी वीर्याचे नमुने कसे गोठवायचे याची पध्दत स्पष्ट केली. तीन दिवसांच्या उपासानंतर दात्याला निर्जंतुक केलेल्या भांड्यात वीर्याचा नमुना देण्यास सांगतात. त्यानमुन्याचे द्रवात रूपांतर करून त्याचा एक थेंब नेहेमीच्या तपासण्यांसाठी काचेवर घेतला जातो. उरलेला नमुना रसायनात आणि Butters मध्ये मिसळला जातो. ०.५ मिली च्या काचेच्या बाटलीत भरला जातो आणि नायट्रोजन सिलेंडरमध्ये १९६ डिग्री सेंटीग्रेड तापमानात गोठवला जातो. दात्याची संपूर्ण तपासणी केली जात. त्याचा कौटुंबिक इतिहास पाहिला जातो आणि त्यांना पूर्वी काही आजार होता का यासंबंधी प्रश्न विचारले जातात. यामुळे काही अनुवंशिक रोग असतील तर त्यांच्या स्नानांतरणास प्रतिबंध करता येतो. शारीरिक वैशिष्टे आणि रक्तगटाची नोंद ठेवली जाते म्हणजे ते वीर्य घेण्यार्‍या जोडप्याशी जुळते की नाही ते पाहता येते. एच आय, व्ही, व्ही डी आर एल आणि हेपाटायटीस बी ची तपासणी केली जाते आणि पुन्हा तीन महिन्यांनी ही तपासणी केली जाते आणि सगळ्या रोगांपासून विशेषत: AIDs पासून हा नमुना मुक्त आहे ते पाहिले जाते.

याची निवड कडक कसोटीवर केली जाते आणि व्यक्तीला दाता म्हणून समाविष्ट केले जाते. शैक्षणिक पात्रता, कौटुंबिक पार्श्वभूमी, वैद्यकीय इतिहास आणि कोणत्याही आनुवंशिक आजाराची तपासणी करून या सगळ्यांची नोंद केली जाते. शारीरिक वैशिष्टे आणि रक्त गटाची नोंद ठेवली जाते ते व्ही. डी. आर एल आणि हेपाटायटीस बी साठी रक्ताची तपासणी केली जाते, आणि तीन महिन्यांनी पुन्हा केली जाते. कडक गोपनियता बाळगली जाते. घेणार्‍याला आणि देणार्‍याला दोघांना ‘होकाराचा’ फॉर्म भरून द्यावा लागतो. सगळ्या नोंदी संगणकावर केल्या जातात आणि गोपनियता पाळण्यासाठी त्या विशिष्ट संकेत भाषेत बंदिस्त केल्या जातात.

दाता इच्छुक व्यक्तींनी सायटोकेम लॅबोरेटीरीशी संपर्क साधून डॉ. मिराशी किंवा डॉ. ठकार यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ४४७५५८० वर बोलावे किंवा लिहावे.

दात्याच्या वीर्याच्या नमुन्याशिवाय सायटोकेम लॅबोरेटोरीच्या वीर्य बँकेत जे रूग्ण वांझपणा अगर नपुसकत्वासाठी उपचार घेत असतील त्यांच्यासाठी तसेच जे नवरे घर सोडून बरेच दिवसांसाठी बाहेरागावी जातात किंवा असे रूग्ण ज्यांना त्यांचे शुक्रजंतु शस्त्रक्रिया केमोथेरपी, रेडिओथेरपी करण्यासाठी सांभाळून ठेवायचे असतात, अशांसाठी नमुने उपलब्ध असतात.