एस्ट्रोजन कमी होणे, प्रौढात्वाकडे जाणे आणि तणाव निर्माण होणे ही लक्षणे संप्रेरकाच्या बदलामुळे स्त्रियाच्या वयाच्या ४५ व ५५ व्या वर्षी दिसून येतात. यानंतर स्त्रिची मासिक पाळी पूर्णपणे थांबते. पुररूत्पादनाची क्रिया संपल्याचे हे लक्षण असते.
रजोनिवृत्तीमुळे जे भावनिक बदल होतात ते खालील प्रमाणे
- राग येणे.
- सारखी मन:स्थिती बदलणे.
- एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे.
- तणाव, अस्वस्थता, खिन्नता वाढणे.
- निद्रानाश
रजोनिवृत्तीशी संबंधित शारीरिक बदल/लक्षणे
कमरेतून किंवा छातीतून गरम वाफा सुरू होतात त्या मान आणि चेहर्यापर्यंत जातात आणि काही वेळा संपूर्ण शरीरात पसरतात. याबरोबर काही वेळा हृदयाचे ठोके जलद पडतात. अनियमित मासिक पाळी, यात पुढील गोष्टींचा समावेश होतो:
- मासिक पाळी काही महिने थांबते आणि पुन्हा सुरू होते, जी जास्त दिवस चालते. काही वेळा खूप रक्तस्त्राव आणि/किंवा रक्ताच्या गुठळ्या पडतात (यामुळे रक्त कमी होऊन अशक्तपणा येतो).
- मूत्राशयाचे स्थितीस्थापकत्व कमी होणे, त्यामुळे स्त्राव अगर उत्सर्जनावर नियंत्रण ठेवता येत नाही (उदा. जेव्हा तुम्हाला खोकला येतो, शिंका येतात तेव्हा थोड्या प्रमाणात मूत्रोत्सर्जन होते).
- डोकेदुखी, चक्कर येणे.
- चेहर्यावरील केसांची वाढ होते.
- स्तन संवेदनशील होणे.
- स्नायूंची स्थितीस्थापकत्व आणि शक्ती कमी होणे.
- पोटाच्या वरच्या भागात सूज येणे.
- हाडे ठिसूळ होतात, त्यामुळे हाड मोडण्याची शक्यता वाढून त्याच्या टोकाशी कडक पदार्थ तयार होण्याचा संभव असतो.
- ऍस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यामुळे हृदयाचा झटका येण्याचा धोका संभवतो.
- खिन्नता आणि/किंवा अस्वस्थतापणा दूर करण्यासाठी काही स्त्रियांना औषधे घेण्याने फायदा होतो.
- गरम वाफा येण्याच्या स्थितीत काही उपशामक औषधांचा उपयोग होतो.