Print
Hits: 183187

पुनरूत्पादनाच्या - प्रजननाच्या काळात म्हणजे मासिक पाळीची सुरू होण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंतचा काळ यात दर महिन्याला योनीमार्गे रक्तस्त्राव होतो. यात रक्त गर्भाशयातील श्लेष्मा, गर्भाशयातील आवरणाचे तुकडे, योनीमार्गातील अस्तरधातू यांचा समावेश असतो.

स्त्रीच्या शरीरात दोन बीजकोश असतात यात बीजांडे असतात. प्रत्येक बीजकोशात हजारो बीजांडे असतात. एक अंडे टाचणीच्या टोकाएवढे असते. मासिक पाळीच्या चक्रात बीजांड, एका बीजकोशाच्या बाहेर टाकण्या ची क्रिया प्रथम घडते. नंतर ते बीजांड बीजकोशातून फॉलोपिन ट्यूब मार्गे गर्भाशयात जाते. गर्भाशयात या अंड्याचे रूपांतर गर्भात होते.

अंड जेव्हा गर्भाशयाकडे जात असते तेव्हा गर्भाशय सशक्त पेशी आणि रक्त यांचे अस्तर तयार करीत असते. जर हे अंड गर्भाशयात जाऊन फलित झाले तर तेथेच राहाते आणि नंतर बाळ होते. रक्त आणि पेशी यांचे अस्तर बाळाला निरोगी आणि आरामात ठेवण्यासाठी उपयोगी पडते. पण बर्‍याच वेळा अंड गर्भाशयास फक्त भेट देते आणी निघून जाते. जर हे अंड गर्भाशयात राहिले नाही तर रक्त आणि पेशी यांच्या अस्तराची गरज नसते आणि म्हणून ते योनीमार्गे बाहेर टाकले जाते. ते खूप रक्त असल्यासारखे वाटते. पण तसे नसते. संपूर्ण मासिक पाळीत फक्त अर्ध्या कपापेक्षा देखील कमी रक्त जाते.

दोन आठवड्यानंतर पुन्हा नवीन अंडे बाहेर पडते आणि संपूर्ण चक्र पुन्हा सुरू होते हे चक्र पूर्ण व्हायला साधारणपणे एक महिना लागतो.

अनियमित मासिक पाळी
मासिक पाळीची सुरूवात झाल्यावर आणि रजोनिवृत्तीच्या काळात मासिक पाळी अनियमित असते अन्यथा ती नियमित येते.

मासिक पाळी सुरू असताना वेदना होणे
वेदनामय मासिक पाळी म्हणजे सपीडार्तव आणि ओटीपोट कंबर दुखणे ही लक्षणे साधारणपणे दिसून येतात. अर्थात हे सामान्य लक्षण आहे जे प्रोजेस्ट्रोन स्त्राव निर्माण झाल्यामुळे दिसून येते. काहीवेळा मासिक पाळीत स्त्राव पूर्णपणे बाहेर न पडता त्याचा लहानशा अंश गर्भाशयाच्या आजूबाजूस राहणे, ओटीपोटाचा दाह होने इत्यादी बिघाडामुळे वेदना होऊ शकतात.

मासिक पाळीच्या वेळी स्तन जड आणि संवेदनाशील होणे.
काही स्त्रियांमध्ये हे लक्षण मासिक पाळीच्या वेळी दिसून येते तर काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आधी हे जर सौम्य असेल तर मासिक पाळी संपल्यानंतर ते आपोआप नाहीसे होते.

मासिक पाळीच्या वेळी संभोग करू शकतो काय?
मासिक पाळीच्या वेळी संभोग करणे सुरक्षित असते, कारण त्यावेळी गर्भधारणेचा धोका नसतो. अर्थात ते आरोग्यासाठी चांगले नाही.

व्यायाम, खेळ आणि पोहणे या शारेरिक क्रिया मासिक पाळीच्या सुरू ठेवाव्यात का?
जास्त ताकद लागणारे व्यायम/क्रिया करू नयेत, पण नेहेमीच्या क्रिया सुरू ठेवाव्यात.