गर्भ राहिल्याचे निदान डॉक्टर कसे करतात.
मासिक पाळी चुकल्यानंतर चार दिवसात तपासणी करून गर्भधारणा झाली आहे किंवा नाही याचे निदान होऊ शकते, अर्थात मासिक पाळीच्या तारखेनंतर दहा दिवसांनी जर तपासणी केली तर ती एकदम बरोबर असू शकते. साधारणपणे लघवीची तपासणी केली जाते पण रक्त तपासणी जास्त योग्य आहे. रक्त तपासणीने गर्भाचे वय देखील समजू शकते, कारण काही वेळा गर्भधारणेच्या काळाबद्दल शंका असते. जर तुमची मासिक पाळी दोन आठवडे आली नसेल तर तुमचे डॉक्टर ओटीपोट तपासून गर्भधारणा झाली किंवा नाही ते सांगू शकतात, अर्थात रक्त किंवा लघवी तपासणी करूनच ते निश्चित निकाल देतील.
प्रसूतीवेदना
प्रसूतीची सुरूवात कशी होते?
प्रत्येक स्त्रीमध्ये प्रसूतीची सुरूवात वेगवेगळ्या तर्हेने होते. गर्भाशयाचे स्नायू एका विशिष्ट लयीत आकुंचन पावतात, त्यामुळे गर्भ पुढे जाण्यास मदत होते.
गर्भाशयाची मान रूंदावते आणि पाण्याची पिशवी फुटणे या काही खुणा आहेत. कळा सुरू केल्यानंतर लगेच रूग्णालयात जाण्याची गरज नसते, विशेषत: तुमच्या पहिल्या गर्भारपणात प्रसूतीची पहिली पायरी काही तासानंतर संपते, त्यामुळे तुम्ही घरीच जास्त आरामात राहू शकता, पण पुढील सूचनांसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लगेच कळविले पाहिजे.
गर्भारपणाच्या संपूर्ण काळात तुम्हांला गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन झाल्याचा अनुभव येईल. परंतु ते खोटे असू शकते. प्रसूतीच्या खर्या वेदनांमध्ये आकुंचनक्रिया लयबध्द असते, जास्त त्रासदायक असते आणि नियमित अंतराने होत असते. तुम्हाला थोडे रक्त सुध्दा दिसेल. (जर तुम्हाला अचानक खूप रक्तस्त्राव झाला किंवा हळुहळू रक्तस्त्राव होऊ लागला तर लगेच रूग्णालयात जा.)
पाण्याची पिशवी फाटण्याची परिणाम स्वच्छ स्त्राव दिसण्यात होतो, तेव्हा स्नायूंच आकुंचन झाल्याचे लक्षात ही येत नाही. तुमच्या ओटीपोटात दुखते किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. पण तीव्र
वेदना/कळा किंवा चक्कर येणे ही धोक्याची लक्षणे आहेत, त्यामुळे तुम्ही लगेच रूग्णालयात जाणे आवश्यक आहे. तुम्हाला असे सुध्दा जाणवेल की बाळ खाली खाली येत आहे. ही सगळी लक्षणे प्रसूतीपूर्वीची लक्षणे आहेत.
खोट्या कळा आणि प्रसूतीची खरी सुरूवात यातील फरक सहजपणे ओळखणे पहिल्या बाळंतपणात शक्य नसते. स्नायूंचे आकुंचन खर्या कळा खोट्या कळा वेळा नियमित आणि वाढत्या दराने बहुधा अनियमित असतात वेळ कमी कमी होत जाते. आणि वेळेतील दरात काही बदल होत नाही. हालचाल परिणाम स्नायूंच्या आकुंचनावर काही आकुंचन थांबते. (उदा. चालणे) परिणाम होत नाही. जागा मागच्या बाजूने सुरू होऊन बहुधा पुढेच येतात. आकुंचनाची शक्ती विशिष्ट दराने वाढत असतात. बहुधा कोणतीही वाढ होत नाही व अशक्त असतात. जर तुम्हांला खरंच कळा येत असतील तर त्या एक एक तासाने येऊ लागल्यावर सांगा. कळ केव्हा सुरू झाली आणि केव्हा संपली ती वेळ लिहून ठेवा. जेव्हा दर पाच मिनिटांनी कळा यायला सुरूवात होईल, तेव्हा तुम्ही रूग्णालयात जा.
स्नायूंचे आकुचन आणि प्रसरण होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आणि श्वासोच्छवासाचे तंत्र बर्याच महिला अपत्यजन्मापूर्वी घेतल्या जाणार्या वर्गांमध्ये शिकतात, त्यामुळे त्या अपत्याजन्माच्या वेळी होणार्या त्रासाला तोंड देऊ शकतात, मात्र काही वेळा वेदना कमी करणार्या औषधांपासून तुमची पूर्णपणे सुटका होऊ शकत नाही. वेदना कमी करणारी काही औषधे फक्त मोठ्या किंवा शिकविणार्या रूग्णालयांमध्येच उपलब्ध असतात. पण बाकी बरीचशी सगळ्या रूग्णालयांमध्ये उपलब्ध असतात.
ऍनेसथिसिऑलॉजिस्ट - जे वेदनांपासून आराम देण्यात तज्ञ आहेत - ते तुमच्या डॉक्टरांबरोबर काम करतात आणि तुमची वेदनांपासून सुटका करण्यासाठी सगळ्यात योग्य पध्दत निवडतात. प्रसूतीच्या कळांमध्ये वाढ करण्यासाठी देखील औषधे वापरली जातात.
शस्त्रक्रियेने प्रसूती
विशिष्ट शस्त्रक्रियेने प्रसुति
सिझेरियन सेक्शन म्हणजे शस्त्रक्रियेने बाळांना जन्म देण्याची पध्दत होय. यात आधी उदराला छेद देउन नंतर गर्भाशयाला छेद दिला जातो व बाळाला जन्म दिला जातो. हा छेद बहुतेक जननेंद्रियांच्या आसपासच्या केसाळ भागात दिला जातो. आणि हा छेद ‘बिकीनी कट’ या नावाने प्रसिध्द आहे. काही केसेसमध्ये हा छेद गर्भाशयाच्या खालच्या बाजूपासून उदराच्या वरच्या भागापर्यंत दिला जातो. काही वेळा कळा सुरू होण्याआधी शस्त्रक्रिया केली जाते, याची अनेक कारणे आहेत.
- Having Placenta previa
- Preeclampisa
- मधुमेह (बाळ जर खूप मोठे असेल तर)
- ओटीपोटाचा भाग जर बाळाचे डोके येउ न शकण्याइतका छोटा असेल
- Rh - रोग, रक्ताचा एखादा रोग
- जेव्हा बाळाचे डोके खाली नसेल, तेव्हा अशा स्थितीत विशिष्ट शस्त्रक्रियेने (Cesarean) प्रसुति केली जाते.
विशिष्ट प्रकारची शस्त्रक्रिया केली कशी जाते?
जर ही शस्त्रक्रिया आधीपासून ठरविलेली नसेल, तर तुमचे डॉक्टर त्याची आत्ता का गरज ते स्पष्ट करतील आणि यात कोणते धोके आहेत ते देखील सांगतील. बर्याचशा रूणालयात तुमच्या बाळाच्या जन्मात भागीदार असणार्यास या शस्त्रक्रियेच्या वेळी उपस्थित राहू देतात. या शस्त्रक्रियेला साधारण एक तास लागतो आणि त्यात खालील टप्प्यांचा समावेश होतो.
- तुमच्या हातात सुई (IV) टोचली जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी जर औषधे देण्याची गरज भासली तर ती यातून दिली जातात.
- ओटीपोटाचा भाग निर्जंतुक केला जातो आणि जननेंद्रियाच्या आसपासचे केस काढले जातात.
- परस्पर - जुळणी आणी इतर तपासण्यांसाठी रक्त घेतले जाते.
- भूल दिली जाते जी मणक्यात दिली जाऊ शकते किंवा संपूर्ण दिली जाते. मूत्राशयात रबरी नळी (कॅथेटर) घातली जाते.
- शस्त्रक्रियेच्या वेळी त्या मार्गे मूत्रविसर्जन होऊ शकते. उदराला आणि गर्भाशयाला छेद देणे. या छेदातून बाळ आणि नाळ बाहेर काढणे. नंतर छेद शिवून टाकणे.
गरोदरपणीचे पोषण
समजूतदारपणे जर पोषक पदार्थ आहारात घेतले तर नक्कीच तुमचे आणि तुमच्या बाळाचे पोषण चांगले होईल. जास्त उष्मांक मिळविण्यासाठी गरोदरपणी तुम्हाला बदल करावे लागतील. चांगले पोषण होण्याची गुरूकिल्ली समतोल आहार आहे.
मांस, कोंबड्या, मासे, कोरडे बीन्स, अंडी आणि टणक कक्वाची फळे
यातून ‘ब’ जीवनसत्व, प्रथिन, आयर्न आणि झिंक पुरविले जाते. शिजवलेल्या मटणातून, कोंबड्यामधून किंवा माशांमधून २-३ औंस मिळते.
या समुहातील इतर पदार्थांमध्ये, एक औंस मटन, १/२ कप शिजविलेले कोरडे बीन्स, एक अंडे किंवा २ टेबलस्पून पीनट बटर बरोबर असते.
दूध, योगर्ट, आणि चीज
हे पदार्थ म्हणजे प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्वांचा साठा असतो. एक कप दूध किंवा योगर्ट, १ १/२ औंस नैसर्गिक चीज, किंवा २ औंस प्रक्रिया केलेले चीज याबरोबर असते.
जेव्हा शक्य असेल तेव्हा कमी चरबी असलेले पदार्थ निवडावेत, साय, मलई वगैरे पूर्णपणे काढलेले किंवा थोड्या प्रमाणात काढलेले दूध, जर तुम्हाला तुमच्या सुपर बाजारात उपलब्ध होतील यात योगर्ट- दूध आणि कमी दुग्धशर्करा असलेले पदार्थ असतात. जर तुम्हाला असे जाणवले की, दुधाचे पुरेसे पदार्थ उपलब्ध होत नाहीत, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून कॅल्शियमयुक्त इतर पदार्थांची माहिती घ्या.
फळे
हा समूह जीवनसत्व ‘अ’ ‘क’ पोटॅशियम आणी तंतू पुरविते. एक मध्यम सफरचंद, केळे किंवा संत्री, १/२ कप कापलेले, शिजवलेले किंवा डब्यातील फळे, किंवा सहा औंस फळांच्या रसाबरोबर असते. बरीज, सायट्रस फळे किंवा रस, कलिंगड आणि इतर फळे यात चांगल्या प्रमाणात जीवनसत्वे ‘ क’ असते. मनुका आणि Prunes देखील चांगले असतात.
भाज्या
यात जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ आणि आयर्न व मॅग्नेशियम सारखे खनीजपदर्थ असतात ही चरबी कमी असते आणि तंतूमय असतात, त्यामुळे बध्दकोष्ठता होत नाही. एक कप कच्ची पालेभाजी (पालक, लेट्यूस, Lroccoli), १/२ कप इतर शिजवलेली किंवा कच्ची पालेभाजी (गाजर, रताळी, मका, पीज्. बटाटे) किंवा ३/४ कप भाजीच्या रसाबरोबर असते.
पाव, (Ereals, तांदूळ आणि Pastas)
यातून शक्तीचा मुख्य स्त्रोत कर्बोदके (स्टार्च) मिळतो, त्याबरोबरच जीवनसत्वे, खनीजपदार्थ आणि तंतूमय पदार्थ मिळतात. पावाचा एक स्लाईस, एक औंस Cereal, किंवा १/२ कप शिजविलेले Cereal, तांदूळ किंवा पास्ता. या बरोबर असतो. शक्यतो संपूर्ण धान्यापासून-कडधान्यापासून बनविलेले आणि कमी साखर असलेले पदार्थ घ्यावेत.
चरबी, तेल आणि मिठाई
या पदार्थामध्ये उष्मांक जास्त असतात आणि जीवनसत्व किंवा खनीजपदार्थ कमी चरबी असलेल पदार्थ घेण्याचा प्रयत्न करावा.
लोहाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ
बर्याचशा स्त्रियांमध्येही प्रमाणात रक्तातील लाल पेशी कमी असतात. मासिक पाळी, अनियमित व अयोग्य आहार किंवा आधीचे गरोदरपण ही त्याची काही कारणे होत. म्हणून गरोदर होण्याआधी पासून तुम्ही तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढविल पाहिजे. मांस मनुका, सोयाबीनची उत्पादने, पालक आणि गव्हाचे सत्व यांच्या प्रयोगाने तुमच लोहाचे प्रमाण वाढेल गरोदर असताना लोहाची गरज रोज दुप्पट होत असते.
पस्तीशीनंतरची गर्भाधारणा
पस्तीशीच्या किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या स्त्रियांना पुढील प्रकारचे धोके असतात.
- प्रसूतीच्या कार्यात बिघाड
- शस्त्रक्रियेने प्रसूति
- गरोदरपणी मधुमेह
- गरोदरपणात उशिरा रक्तस्त्राव
- अपत्यजन्मापूर्वी आकडी येणे आणि उच्चरक्तदाब
- एकूण यात मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो
गर्भाला असणारे धोके
- बाळ < २५०० ग्रॅम
- बाळ > ४००० ग्रॅम
- अचानक/आपोआप जन्माला येणे
- बाळ मृतावस्थेत जन्माला येणे
- नवजात बालकाचा मृत्यू
- सिझेरियन
- गुणसूत्रांमधील प्रमाणापेक्षा जास्त वाढ
- गरोदरपणीचे पोषण