गर्भ राहिल्याचे निदान डॉक्टर कसे करतात.
मासिक पाळी चुकल्यानंतर चार दिवसात तपासणी करून गर्भधारणा झाली आहे किंवा नाही याचे निदान होऊ शकते, अर्थात मासिक पाळीच्या तारखेनंतर दहा दिवसांनी जर तपासणी केली तर ती एकदम बरोबर असू शकते. साधारणपणे लघवीची तपासणी केली जाते पण रक्त तपासणी जास्त योग्य आहे. रक्त तपासणीने गर्भाचे वय देखील समजू शकते, कारण काही वेळा गर्भधारणेच्या काळाबद्दल शंका असते. जर तुमची मासिक पाळी दोन आठवडे आली नसेल तर तुमचे डॉक्टर ओटीपोट तपासून गर्भधारणा झाली किंवा नाही ते सांगू शकतात, अर्थात रक्त किंवा लघवी तपासणी करूनच ते निश्चित निकाल देतील.
प्रसूतीवेदना
प्रसूतीची सुरूवात कशी होते?
प्रत्येक स्त्रीमध्ये प्रसूतीची सुरूवात वेगवेगळ्या तर्हेने होते. गर्भाशयाचे स्नायू एका विशिष्ट लयीत आकुंचन पावतात, त्यामुळे गर्भ पुढे जाण्यास मदत होते.
गर्भाशयाची मान रूंदावते आणि पाण्याची पिशवी फुटणे या काही खुणा आहेत. कळा सुरू केल्यानंतर लगेच रूग्णालयात जाण्याची गरज नसते, विशेषत: तुमच्या पहिल्या गर्भारपणात प्रसूतीची पहिली पायरी काही तासानंतर संपते, त्यामुळे तुम्ही घरीच जास्त आरामात राहू शकता, पण पुढील सूचनांसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लगेच कळविले पाहिजे.
गर्भारपणाच्या संपूर्ण काळात तुम्हांला गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन झाल्याचा अनुभव येईल. परंतु ते खोटे असू शकते. प्रसूतीच्या खर्या वेदनांमध्ये आकुंचनक्रिया लयबध्द असते, जास्त त्रासदायक असते आणि नियमित अंतराने होत असते. तुम्हाला थोडे रक्त सुध्दा दिसेल. (जर तुम्हाला अचानक खूप रक्तस्त्राव झाला किंवा हळुहळू रक्तस्त्राव होऊ लागला तर लगेच रूग्णालयात जा.)
पाण्याची पिशवी फाटण्याची परिणाम स्वच्छ स्त्राव दिसण्यात होतो, तेव्हा स्नायूंच आकुंचन झाल्याचे लक्षात ही येत नाही. तुमच्या ओटीपोटात दुखते किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. पण तीव्र
वेदना/कळा किंवा चक्कर येणे ही धोक्याची लक्षणे आहेत, त्यामुळे तुम्ही लगेच रूग्णालयात जाणे आवश्यक आहे. तुम्हाला असे सुध्दा जाणवेल की बाळ खाली खाली येत आहे. ही सगळी लक्षणे प्रसूतीपूर्वीची लक्षणे आहेत.
खोट्या कळा आणि प्रसूतीची खरी सुरूवात यातील फरक सहजपणे ओळखणे पहिल्या बाळंतपणात शक्य नसते. स्नायूंचे आकुंचन खर्या कळा खोट्या कळा वेळा नियमित आणि वाढत्या दराने बहुधा अनियमित असतात वेळ कमी कमी होत जाते. आणि वेळेतील दरात काही बदल होत नाही. हालचाल परिणाम स्नायूंच्या आकुंचनावर काही आकुंचन थांबते. (उदा. चालणे) परिणाम होत नाही. जागा मागच्या बाजूने सुरू होऊन बहुधा पुढेच येतात. आकुंचनाची शक्ती विशिष्ट दराने वाढत असतात. बहुधा कोणतीही वाढ होत नाही व अशक्त असतात. जर तुम्हांला खरंच कळा येत असतील तर त्या एक एक तासाने येऊ लागल्यावर सांगा. कळ केव्हा सुरू झाली आणि केव्हा संपली ती वेळ लिहून ठेवा. जेव्हा दर पाच मिनिटांनी कळा यायला सुरूवात होईल, तेव्हा तुम्ही रूग्णालयात जा.
स्नायूंचे आकुचन आणि प्रसरण होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आणि श्वासोच्छवासाचे तंत्र बर्याच महिला अपत्यजन्मापूर्वी घेतल्या जाणार्या वर्गांमध्ये शिकतात, त्यामुळे त्या अपत्याजन्माच्या वेळी होणार्या त्रासाला तोंड देऊ शकतात, मात्र काही वेळा वेदना कमी करणार्या औषधांपासून तुमची पूर्णपणे सुटका होऊ शकत नाही. वेदना कमी करणारी काही औषधे फक्त मोठ्या किंवा शिकविणार्या रूग्णालयांमध्येच उपलब्ध असतात. पण बाकी बरीचशी सगळ्या रूग्णालयांमध्ये उपलब्ध असतात.
ऍनेसथिसिऑलॉजिस्ट - जे वेदनांपासून आराम देण्यात तज्ञ आहेत - ते तुमच्या डॉक्टरांबरोबर काम करतात आणि तुमची वेदनांपासून सुटका करण्यासाठी सगळ्यात योग्य पध्दत निवडतात. प्रसूतीच्या कळांमध्ये वाढ करण्यासाठी देखील औषधे वापरली जातात.
गर्भधारणा
- Details
- Hits: 47900
10
स्त्रीरोग
हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?
