वेदनेपासून आराम मिळण्यासाठी आणि प्रसूतीत मदत करणारे औषधोपचार.
स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आणि श्वासोच्छवासाचे तंत्र बर्याच महिला अपत्यजन्मापूर्वी घेतल्या जाणर्या वर्गामध्ये शिकतात.
त्यामुळे त्या अपत्यजन्माच्या वेळी होणार्या त्रासाला तोंड देऊ शकतात, मात्र काही वेळा वेदना कमी करणार्या औषधांपासून तुमची पूर्णपणे सुटका होऊ शकत नाही. वेदना कमी करणारी काही औषधे मोठ्या किंवा शिकविणार्या रूग्णालयामध्येच उपलब्ध असतात. पण बाकी बरीचशी सगळ्या रूग्णालयामध्ये उपलब्ध असतात.
ऍनेसथिसिऑलॉजिस्ट
जे वेदनापासून आराम देण्यात तज्ञ आहेत. ते तुमच्या डॉक्टरांबरोबर काम करतात आणि तुमची वेदनांपासून सुटका करण्यासाठी सगळ्यात योग्य पध्दत निवडतात. प्रसूतीच्या कळांमध्ये वाढ करण्यासाठी देखील औषधे वापरली जातात.
भूल देण्याचे प्रकार
Epiclural भूल
ही भूल कॅथेटरमार्फत मणक्याच्या अर्ध पारदर्शक तंतूमय आवरण आणि पाठीच्या मणक्याच्या हाडा दरम्यान दिली जाते. त्यामुळे कमरेच्या खालचा भाग बधिर होतो याचा उपयोग शस्त्रक्रियेने प्रसूती करण्याच्या विशिष्ट पध्दतीत देखील केला जातो. ही भूल १५-२० मिनिटे कार्य करते आणि ज्या स्त्रियांना मेंदू रोग आहेत. त्यांच्या साठी ही पध्दत उपयुक्त नाही. यामुळे गर्भ पुढे ढकलण्याची तुमची शक्ती अपुरी पडू शकते आणि मग चिमट्याचा वापर करून प्रसूती करावी लागते.
या पध्दतीत काही दोष आहेत. Epiclural घेण्याआधी तुम्हांला रक्तदाब नियंत्रित ठेवण्याआधी नसेतून स्त्राव घेण्याची गरज असते. हा या पध्दतीतील नेहेमीचा अनुषंगिक परिणाम आहे. प्रसूती होईपर्यंत रबरी नळी तुमच्या पाठीत असते, कारण एखादेवेळी तुम्हाला भूल देण्याची गरज भासू शकते.
अपत्यजन्मानंतर उद्भवणारी तीव्र डोकेदुखी, मूत्रोत्सर्जनात अडथळा किंवा चालताना त्रास होणे, शरीराचे तपमान कमी - जास्त होणे, प्रसूतीची वेळ लांबणे आणि त्यामुळे चिमट्याचा वापर करावा लागणे किंवा शस्त्रक्रियेने प्रसूती करणे ही संभाव्य लक्षणे होत. औषधामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके मंद पडू शकतात.
कमी प्रमाणातील Epidural या नवीन पध्दतीत काही फायदे आहेत यात स्त्रावाचा पंप सतत थोड्या प्रमाणात भूल देत असतो. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी वेदना होतील याबद्दल तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. यामुळे संवेदना बधिर होतात. पण यात पायांची शक्ती जात नाही. तसेच याचा परिणाम योनीमार्गे अपत्यजन्मानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतरही टिकून राहतो.
गर्भाशयाच्या मानेला भूल देणे
सामान्य (लोचल) भूल गर्भाशयाच्या मानेच्या आवरणाच्या तंतूमध्ये दिली जाते, त्यामुळे गर्भाशयाच्या मानेचा विस्तार होत असताना होणार्या वेदना जाणावत नाहीत. याचा परिणाम साधारणपणे दोन तास टिकतो, गरज भासल्यास आणखी एखादे इंजेक्शन देऊ शकते, या औषधामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके मंद होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यास त्याचा वापर टाळावा.
बाह्य जननेंद्रियास भूल देणे
योनीमार्गाजवळील भाग बधिर करण्यासाठी दोन इंजेक्शने दिली जातात. (योनीमार्ग आणि मलाशयाच्या मधील भाग) यामुळे आराम मिळतो. आणि बाळावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. पण जर बाळाचे डोके जनननलिकेत खूप खाली असेल तर त्याचा उपयोग होत नाही.
वेदनाशामके
वेदनाकमी करण्यासाठी यांचा वापर केला जातो, पण संपूर्ण जाणीव नष्ट होत नाही. म्हणून ते वेदना पूर्णपणे थांबवत नाहीत तर फक्त त्यांची तीव्रता कमी करतात.
ही बहुतेक नसेतुन दिली जातात किंवा स्नायूमध्ये इंजेक्शन दिले जाते आणि स्नायूंच्या आकुंचन प्रसरणावर याचा परिणाम होत नाहीत तोपर्यंत ही वेदनाशामके दिली जात नाहीत. गुदमरल्यासारखे होण्याबरोबर शिसारी येणे, मळमळणे, तणाव आणि रक्तदाबांवर परिणाम होणे हे अनुषंगिक परिणाम दिसून येतात. या प्रकारच्या वेदनाशामकामुळे बाळाच्या श्वासोच्छ्वासावर परिणाम होऊ शकतो. पण हे दुष्परिणाम कमी कालावधीचे असतात आणि गरज भासल्यास विरोधी क्रियेचा वापर करू शकतो.
औषधौपचारांचे प्रकार
- Details
- Hits: 10681
4
स्त्रीरोग
हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?
