Print
Hits: 9618

लैंगिक संबंधांनी होणारे रोग कसे पसरतात?
एस.टी.डी किंवा लैंगिक संबंधाच्या संसर्गाने रोग पसरण्याचे अनेक मार्ग आहेत. लैंगिक संबंध ठेवल्याने रोगांचे जंतू/विषाणू वीर्य, योनीतील स्त्राव आणि रक्त यात पसरतात.

थुंकीमुळे देखील हे रोग पसरू शकतात. जर तुमच्या तोंडाजवळ छोटीशी जखम असेल तर त्यामार्गे हे जंतू शरीरात प्रवेश करतात. सुईवर किंवा सिरींजमध्ये असलेले दूषित रक्त हे रोग पसरवितात. ज्यांना या रोगाची लागण झाली आहे अशा गरोदर स्त्रिया हा रोग त्यांच्या बाळास देतात.

हेपाटायटीस बी सोडून या प्रकारच्या इतर कोणत्याही रोगास प्रतिबंध करणारी लस उपलब्ध नाही. लैंगिक संबंधामुळे तुम्हाला जर एकदा रोग झाला तर तो पुन्हा होऊ शकतो. आणि तुम्हाला एकावेळी एकापेक्षा जास्त रोग असू शकतात. बरेचदा रोगावर सहजपणे उपचार करता येऊ शकतात, पण जर दुर्लक्ष केले तर या प्रकारातील सगळे रोग धोकादायक आहेत. काही रोगांसाठी जसे जननेंद्रियावरील मस, जननेंद्रियावरील नागीण किंवा एच.आय.व्ही. यावर काहीही उपचार नाहीत.
खरे जीवन
‘पहिल्याच संभोगाच्या वेळी तुम्हाला संसर्ग हो‍उ शकत नाही किंवा तुम्ही गरोदर राहू शकत नाही, जर खर्‍या अर्थाने संभोग झाला नसेल तर’.
हकीकत
होय पहिल्याच वेळी तुम्हाला संसर्ग होऊ शकतो, पूर्ण संभोग झाला नसला तरी संसर्गित व्यक्तीच्या जननेंद्रियाशी संपर्क आल्याने देखील रोग होऊ शकतात. शरीरातील स्त्रावामुळे किंवा मुखाने संभोग केल्यास संसर्ग होतो. तुम्ही आणि तुमच्या भागीदाराला निरोधके वापरण्यास सांगावे.
लैंगिक संबंधामुळे होणारे रोग आणि गरोदरपण
गरोदर असलेल्या स्त्रियांना, गरोदर नसलेल्या स्त्रियांसारखेच लैंगिक संबंधामुळे होणारे रोग हो‍उ शकतात. गर्भारपण त्या स्त्रियांना किंवा त्यांच्या गर्भाला कोणत्याही प्रकारची सुरक्षितता पुरवत नाही. उलट जर गर्भारपणी असे रोग झाले तर ते त्या स्त्रियासाठी आणि बाळासाठी फार धोक्याचे असते. लैंगिक संबंधामुळे कोणते रोग होऊ शकतात आणि त्यांचे कोणते परिणाम होतात हे स्त्रिला माहिती असले पाहिजे आणि त्या संसर्गापासेन आपले व बाळाचे संरक्षण कसे करायचे हे देखील माहिती असले पाहिजे.

गर्भारपणी स्त्रीवर हे रोग कोणता परिणाम करतात?
गरोदर स्त्रिया आणि गरोदर नसणार्‍या स्त्रियांमध्ये परिणाम होतात. एस.टी.डी किंवा लैंगिक संबंधाच्या संसर्गाने रोग पसरण्याचे अनेक मार्ग आहेत. लैंगिक संबंध ठेवल्याने रोगांचे जंतू/विषाणू वीर्य, योनीतील स्त्राव आणि रक्त यात पसरतात.

एस.टी.डी मुळे गर्भाशयाच्या मानेचे आणि इतर कर्करोग होतात. जुनाट कावीळ आणि जुळणीपेशींच्या जादा वाढीमुळे निर्माण होणारा कडकपणा आणि इतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. बरेचसे रोग छुपे असतात. त्यांची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

बाळाभोवती असणारे पेशींचे आवरण लवकर फाटले आणि बाळंतपणानंतर गर्भाशयास संसर्ग होणे हे परिणाम देखील दिसून येतात.

गरोदर स्त्रिच्या बाळास संसर्ग कसा होतो?
या प्रकारचे रोग गर्भ पोटात असताना, जन्मानंतर लगेच किंवा काही काळाने आई कडून बाळाकडे जातात. काही प्रकारचे STD (जसे उपद्वंश-गुप्तता) चे जंतू वारेमार्गे गर्भाशयात जाऊन गर्भाच्या विकासास्थितीत त्यांच्यावर परिणाम करतात. इतर रोग (जसे परमा, Chlamydia, हेपाटायटीस बी, आणि जननेंद्रियावरील पुरळ) गर्भ जेव्हा गर्भनलिकेतून जात असतो तेव्हा आईमार्फत बाळात जातात. एच.आय.व्ही. संसर्ग गरोदरपणी वारेमार्फत होतो, जन्माच्या क्रियेत तो बाळावर हल्ला करतो आणि असे दुसरे रोग स्तन पानाद्वारे देखिल फैलतात.

STD चा परिणाम गर्भावर किंवा जन्मलेल्या बालकावर कसा होतो?
मृत बालक जन्मास येणे, जन्माच्या वेळी वजन कमी असणे, डोळ्यांचा संसर्ग, न्यूमोनिया, फुफ्फुसांचा दाह, रक्तप्रवाहात संसर्ग होते, मेंदूवर परिणाम होणे, जन्मत:चा आंधळेपणा, बहिरेपणा किंवा इतर अवयवांमध्ये बिघाड होणे, तीव्र कावीळ, मस्तिष्क दाह, यकृताचे जुनाट आजार इ. घातक परिणाम दिसून येतात. तर काही रोग काही महिन्यांनंतर किंवा वर्षानंतर लक्षात येतात.

गर्भारपणी STD वर उपचार करता येतात का?
गुप्तरोगांवर जे जंतुमुळे होतात, त्यांच्यावर बॅक्टरीया प्रतिबंधक औषधे गरोदरपणी घेऊन उपचार करता येतो. विषाणुमुळे होणार्‍या जसे जननेंद्रियावरील पुरळ आणि एच.आय.व्ही. या रोगांवर उपचार नाहीत. फक्त विषाणू विरोधी औषधे घेऊन या रोगांची लक्षणे कमी करता येऊ शकतात. या बरोबरच आईकडून बाळाला एचआयव्ही चा संसर्गाचा धोका नाट्यमयरित्या कमी होऊ शकतो. ज्या गरोदर स्त्रिच्या जननेंद्रियावर पुरळ आहे तिची प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करावी म्हणजे जन्मलेल्या बालकाला संसर्गाचा धोका राहणार नाही.

गरोदर स्त्रियांनी स्वत:चा संसर्गापासून कसा बचाव करावा?
गरोदरपणी स्त्री एक पतिव्रता असते, तिचा नवरा जर एक पत्‍नीव्रताचे पालन करणारा नसेल तर त्या स्त्रिला संसर्ग होऊ शकतो. म्हणून त्या स्त्रिने प्रत्येक संभोगाच्या वेळी गर्भ निरोधक वापरावे. संसर्गापासून संरक्षण करणे ही बाब गरोदरपणाच्या संपूर्ण काळात फार नाजूक असते.