Print
Hits: 10765

अपत्यजन्माचे वर्ग का घेतले जातात?
तुमची आजी नक्कीच अपत्यजन्माच्या वर्गांना गेली नसेल, आणि तरीही तिची प्रसूती सहजगत्या झाली असेल, मग आता या वर्गांची गरज का भासते? शहरी जीवन हे बैठे जीवन असते आणि सहज प्रसूती होण्यास तितकेसे अनुकुल नसते.

पण हे वर्ग गरोदर स्त्रियांच्या गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या नवयांसाठी एक साधन म्हणून घेतले जातात. त्यांना त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी आणी इतर गरोदर स्त्रिया व त्यांच्या कुटुंबियांशी बोलता येते. नुकत्याच केलेल्या अभ्यासावरून अपत्यजन्माचे शिक्षण दिल्यास कोणते फायदे होतात ते खाली नमूद केले आहेत.