अपत्यजन्माचे वर्ग का घेतले जातात?
तुमची आजी नक्कीच अपत्यजन्माच्या वर्गांना गेली नसेल, आणि तरीही तिची प्रसूती सहजगत्या झाली असेल, मग आता या वर्गांची गरज का भासते? शहरी जीवन हे बैठे जीवन असते आणि सहज प्रसूती होण्यास तितकेसे अनुकुल नसते.
पण हे वर्ग गरोदर स्त्रियांच्या गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या नवयांसाठी एक साधन म्हणून घेतले जातात. त्यांना त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी आणी इतर गरोदर स्त्रिया व त्यांच्या कुटुंबियांशी बोलता येते. नुकत्याच केलेल्या अभ्यासावरून अपत्यजन्माचे शिक्षण दिल्यास कोणते फायदे होतात ते खाली नमूद केले आहेत.
- गरोदरपण सुसह्य कसे करावे, हे शिकायला मिळते.
- सामान्य प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि माहिती मिळते. गर्भारपणीच्या आधीच्या विकासासंबंधी शिकायला मिळते.
- गर्भारपणातील आणि त्यामुळे तुमच्या जीवनावर होणारा परिणाम समजतो. वेळेच्या आधी येणार्या कळा आणि त्यांना प्रतिबंध कसा करावा हे समजते.
- तुमच्या कुटुंबियांना तुमच्या परिस्थिती कसे सामावून घ्यायचे हे शिकायला मिळते.
- चांगला संपर्क साधाण्याची कला आणि अपत्यजन्माची योजना.
- कळा येतात हे कसे सांगावे. मदतीच्या इतर पर्यायाविषयी शिका.
- वेदना कमी करणारे पर्याय शिका.
- नव्या बाळाची काळजी कशी घ्यावी ते शिका.
- स्तनपानाचे फायदे आणि ते कसे सुरू करावे हे शिका.
- अर्भकास उत्तेजित करणे आणि त्याचा विकास करण्याचे तंत्र शिका.
- अपत्यजन्माशी संबंधित स्थानिक संस्थांशी संपर्क साधून तुम्ही या वर्गाची चौकशी करू शकता. यात रूग्णालये, अपत्यजन्माचे केंद्र, संस्था यांचा समावेश होतो.