Print
Hits: 4311

व्यावसायिक चिकित्सकाचे कार्य
लोकांना त्यांच्या कार्यक्षमतेचा पूर्णपणे वापर करता यावा म्हणून अनेक तंत्र वापरून त्यांना मदत केली जाते. प्रत्येक व्यक्तीचा उपचार हा तिच्या/त्यांच्या क्षमतेवर, शिक्षणावर कोणत्याही गोष्टीत रस घेण्यावर आणि व्यावसायिक पार्श्वभूमीवर आधारलेला असतो.

या उपचारांमध्ये एखाद्याला सुरक्षितपणे कसे खावे - प्यावे, एखाद्याला विशिष्ट प्रकारे बूट आणि पायमोजे कसे घालावे, चेन कशी लावावी, शर्ट आणि ब्लाउजची बटणे कशी लावावीत हे शिकविले जाते, तर एखाद्याला व्हीलचेअरवर बसून स्वयंपाक कसा करावा आणि घर कसे चालवावे हे शिकविले जाते, त्यामुळे अपंगाचा भार वाटत नाही, तसेच एखाद्या हात/पाय गमावलेल्यास खास तंत्रज्ञानाने तयार केलेली गाडी/दुचाकी कशी चालवावी हे शिकविले जाते, ज्यांचे त्यांच्या स्नायूंवर नियंत्रण नाही - त्यांना संगणक कसा वापरायचा ते शिकविले जाते आणि घरातील उपकरणे वापरण्यास शिकविले जाते.

व्यावसायिक चिकित्सक, भावनात्मक आणि मानसिक प्रश्न असणार्‍या लोकांबरोबर कार्य करतात. उदा. तणाव, अस्वस्थता, सिझोफ्रिनिया - असणार्‍या लोकांना त्यांचे कार्यक्रम आखण्यात सांगतात, म्हणजे रोजच्या जीवनात ते जास्त कार्यक्षमतेने काम करू शकतात. शारीरिक आणि मानसिकरित्या अकार्यक्षम असणार्‍या मुलांमध्ये व्यावसायिक रोगोपचार पध्दतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

स्वास्थ्य प्राप्तीसाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी काम करणे आवश्यक आहे आणि महत्वाचे आहे हे फार पूर्वीपासून माहिती आहे आणि याचा उपयोग प्रामुख्याने मानसिक दुबळेपणाच्या उपचारात केला जातो.

पहिले महायुध्द (१९१४ - १९१८) संपल्यानंतर त्यातील जखमी आणि अपंग सैनिकांचे पुनर्वसन करण्याच्या वेळी व्यावसायिक उपचार पध्दतीस १९१७ मध्ये औपचारिक व्यवसाय म्हणून मान्यता मिळाली. व्यावसायिक उपचार तज्ञ व्यावसायिक उपचारातील पदवीधारक किंवा पदव्यत्तोर शिक्षण घेतलेला असतो. जीवशास्त्र, मानसशास्त्र आणि थिअरी आणि व्यावहारिक, व्यावसायिक उपचार पध्दती यांचा या प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश असतो तसेच रोगाशी संबंधित प्रशिक्षण व्यावसायिक अनुभव ही दिले जाते. प्रशिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक उपचारकास National Board for Certification of Occupational Therapists मार्फत घेतली जाणार्‍या परिक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते तेव्हा तो मान्यताप्राप्त/नोंदनीद्मकृत व्यावसायिक उपचारक बनु शकतो.

समाजातील सर्व थरातील दुर्बल लोकांना एकत्र करण्यासाठी प्रयत्‍न केले जात आहेत, त्यासाठी या व्यवसायाचा विस्तार करण्यात येत आहे. व्यावसायिक उपचारक त्यांचे कार्य दुर्बल लोकांपर्यंत पोहचावे, त्यांच्या कार्याची जागा पटकन सापडण्यासाठी आणि अपघात घडू नये अशा ठिकाणी असावी यासाठी जनसामान्यांची आणि खाजगी संस्थांची मदत घेतात.