Print
Hits: 4590

व्यावसायिक उपचारात वापरल्या जाणार्‍या पध्दती
कला, कार्यानुभव, मनोरंजन, खेळ, स्वत:ची काळजी घेणे, घराचे व्यवस्थापन ही मुद्दाम करून घेतली जाणारी कामे आहेत, जी खालील गोष्टींमध्ये मदत करतात.

रोजच्या जीवनातील कार्य
स्वयंपूर्णता, हालचाल वाढविणे, संपर्क आणि घराचे व्यवस्थापण, स्वंयपूर्णतेत नीटनेटका पोषाख घालणे. खाऊ घालणे, स्नान करणे इ. कार्यांचा समावेश होतो. हालचाल वाढविण्यासाठी अंथरूणातील हालचाल, व्हीलचेअर्स, सार्वजनिक आणि खाजगी परिवहन, मदत करणारे घटक वापरले जातात. संपर्कात लिहिण्याची क्षमता, वाचन, दूरध्वनीचा वापर आणि संगणक यांचा समावेश होतो.

ऑर्थोसिस/मोडलेली हाडे घट्‌ट धरून योग्य त्या ठिकाणी बसविण्यासाठी वापरण्याचे साधन Orthosis हे असे साधन आहे जे एखाद्या स्थितीला आधार देण्यासाठी, एखाद्या भागाची हालचाल न होऊ देण्यासाठी अशक्त स्नायूंना मदत करण्यासाठी व्यक्तीच्या शरीरात घातले जाते. तात्पुरते साधन थर्मोप्लास्टीक पासून बनविलेले असते. कायमच्या स्थितीत दीर्घ उपचारासाठी वापरण्यात येणारे साधन धातू किंवा लोखंडापासून बनविलेले असते.
या साधनाचे दोन प्रकार आहेत

  1. Static साधनांध्ये न हलणारे भाग असतात जे हालचालीला प्रतिबंध करतात आणि दुखापत झालेल्या भागाला आधार देऊन आराम देतात.
  2. डायनॅमिक साधनांमध्ये हलणारे भाग असतात जे हालचाल करण्यास परवानगी देतात आणि त्यांचे नियंत्रण करतात. काही हालचालींचे नियंत्रण शरीरातील अंतर्गत भागाकडून केले जाते. किंवा बाहेरून करायचे झाल्यास इलॅस्टिक, स्प्रिंग, यंत्र इ. चा वापर केला जातो.

बायोफिडबॅक - एक बरोबरीचा उपचार
बायोफिडबॅक हे उपचाराचे असे एक तंत्र आहे, ज्यामुळे अशिलस/ग्राहकास यांत्रिक वापराने शारीरिक कार्याचे काही अंशी नियंत्रण करण्याची क्षमता प्राप्त होते. ग्राहकास त्याची जबाबदारी समजते आणि तो/ती स्वत:च्या सुधारणेसाठी सक्रियतेने भाग घेतात. एखाद्या विशिष्ठ प्रश्नात सुधारणा घडवून आणण्यासाठी ग्राहक स्व-नियंत्रणाची त्याची/तिचे भावना वाढवितात. आणि स्वत:चे प्रभुत्व निर्माण करतात.

या उपचार पध्दतीत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आहे, ती म्हणजे यात ग्राहकच चिकित्सकाच्या सूचनेनुसार आणि नियमित चिकित्सेने इच्छित बदल घडवून आणत असतो.

इलेक्ट्रॉनिक बायोफिडबॅक आपल्याला सातत्याने, भरपूर आणि त्वरित माहिती उपलब्ध करून देते. मोजण्यासाठी वापरल्याजाणार्‍या उपकरणांमध्ये ट्रान्सड्यूसरचा समावेश असतो, ज्यात प्रक्रिया केली जाऊन त्याचे परिणाम दर्शविले जातात. जे मापन केलेले असते त्यातील बदल ट्रान्सड्यूसर टिपतो. या विद्युत उपकरणात वापरले गेलेले घटक विस्तार करणे, दुरूस्ती करणे, गाळणे, आणि संदेशांना एकत्र करून त्यांना प्रदर्शित करण्याचे कार्य करतात. या उपकरणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. उदा. संगणक, बझर्स, दिवे किंवा मीटर्स.

बायोफिडबॅक मुळे व्यक्ती त्याच्या स्नायूंचे ऐच्छिक आणि अनैच्छिक आकुंचन, रक्तदाबाची पातळी, हृदयाच्या ठोक्यांचा दर आणि मेंदूच्या कार्य याबाबतीत जागरूक होते.

हालचाल उपचार पध्दती
बर्नस्टॉर्मच्या मतानुसार/दृष्टीकोनातून अर्धांगवायूच्या उपचार रूग्णांच्या सुधारणेच्या प्रक्रियेत उपलब्ध असणार्‍या मोटवरीच्या उपयोगावर आधारित असतात. यात जास्त सहज आणि गुंतागुंतीच्या हालचाली करण्यावर भर देऊन सुधारणा घडवून आणली जाते. Synergies प्रतिक्षित क्रिया आणि प्रमाणापेक्षा जास्त हालचाल हे साधारन ऐच्छिक हालचालींच्या प्रक्रियेमध्ये दिसून येतात.

मज्जासंस्थेच्या विकासाची उपचार पध्दती - बोबाथचा दृष्टिकोन
मज्जासंस्थेच्या विकासाच्या उपचाराचे प्राथमिक उद्दिष्ट सहजसाध्य हालचाली पुन्हा शिकणे यात एखाद्या स्थितीत राहणे, वजन तोलणे,धडाची हालचाल तसेच शरीराच्या दोन्ही बाजूंचा उपयोग करणे या तंत्राचा उपयोग केला जातो. एकत्रित हालचाल, एकत्रित प्रतिसाद, नियंत्रणाचे काही विशिष्ठ बिंदू उदा. खांदा आणि उदराचा खालचा भागातील हाडांचे वर्तुळ, प्रतिक्षित क्रियेत अडथळा आणणे यांचा वापर केला जातो.

रूडच्या दृष्टीकोनातून मज्जास्नायूंच्या बिघडलेल्या कार्यांचा उपचार
मार्गारेट रूड ने संवेदनावाहक उत्तेजन आणि पुनरूत्पादन विषयक स्नायूचे इकत्रित नियंत्रण केले, त्यामुळे मेंदूच्या कार्यात बिघाड आलेल्या मुलांमध्ये उपयुक्त असा स्नायूंचा प्रतिसाद मिळविणे शक्य झाले. ब्रशिंग हलक्या चापट्या मारणे, पटकन बर्फ फिरविणे, सांध्यावर जड पट्‌ट्या बांधणे यातून स्पर्शज्ञानास उत्तेजन दिले जाते. अडथळा आणण्याच्या पध्दतीत सांध्यावर हलक्या वजनाच्या वजनाच्या पट्‌ट्या बांधणे, एका तालात पण हळू हळू हालचाल करणे यांचा समावेश होतो. या उपचार पध्दतींचा उपयोग hypotonia, hypertenia आणि hyperkinesis च्या रूग्णांमध्ये केला जातो.

Proprioceptive Neuromuscular Facilitation (PNF) approach
मेंदू मज्जातंतूच्या रोगात/बिघाड Proprioceptors उत्तेजित करून उपचार केले जातात. PNF ही पध्दत मज्जास्नायूंच्या प्रतिसादात वाढ करण्यासाठी वापरली जाते.