Print
Hits: 5272

वेदनेची तीव्रता मोजणे हे महत्वाचे असते आणि त्यामुळे औषधोपचारासंबंधी महत्वाचे निर्णय घेता येतात.वेदना काही साधनांच्या मदतीने नीट मोजता येते. जास्त काळ होत असलेल्या वेदनांच्या बाबतीत त्या आधीचा काही काळ निश्‍चित करावा.
उदा. त्या आधीचा काही काळ निश्‍चित करावा. उदा. त्या आधीचे काही आठवडे अथवा काही महिने, ज्यामुळे कोणत्या विशिष्ट काळात वेदना साधारण होत्या, अथवा, काही महिने ज्यामुळे कोणत्या विशिष्ट काळात वेदना साधारण होत्या, जास्त होत्या अथवा अत्यंत कमी होत्या याचा विचार करता येतो. आपल्याला होणार्‍या वेदनेच्या दर्जाबाबत रूग्ण जे कथन करतो त्या गोष्टी रोगनिदानासाठी वापरल्या जातात.

वेदना संवेदनाक्षम मज्जातंतूंना उत्तेजित केल्यावर देखील ज्या वेदना बराच काळपर्यंत तशाच राहतात त्या वेदना रूग्णाला नेहमीच्या वाटतात, जर जखमी झालेल्या पेशी, हाडे वगैरे असतील तर ती वेदना नेहमी जास्त प्रकारची असते, धडधडणारी आणि घुसल्यासारखी असते. जर कातडीला दुखापत झाली तर होणारी वेदना ही जळजळणारी असते. जर दुखापत झालेली पेशी ही आतल्या अवयवांमधील असेल तर कुठल्या अवयवांना दुखापत झाली आहे त्यानुसार वेदना होतात आणि त्या झटके देणार्‍या अथवा कुरतडणार्‍या अशा असतात आणि त्या नेहमीच्या कातडीशी संबंधित असतात. जेव्हा आतड्यांमधील इतर अवयवांना दुखापत झालेली असते. उदा. मीसेंटरी (आतड्यांमधील आवरणाचा एकभाग) तेव्हा होणार्‍या वेदना ठणका येणार्‍या भोसकल्यासारख्या अशा असतात.