Print
Hits: 5646

बुद्धीभ्रंश, ज्याला इंग्रजीमधे डिमेंशिया म्हणतात. अल्झायमर डिसीज हा ब-याच जणांना माहित असतो. पण अल्झायमर ही एक पॅथॉलॉजीकल एन्टिटी आहे. अल्झायमर मधे होतं काय? की बुद्धीभ्रंश होतो, माणूस विसरायला लागतो. ही अशी व्याधी आहे की जी न्यूरॉलॉजिस्ट्सना मेंदूच्या तपासणीत कळते. ह्या खूप ऍड्व्हान्स रोगामधे माणूस स्वत:लाच हरवून बसतो. पण असं विसरायला लागणं म्हणजेच अल्झायमर असं अजिबात नाही. कारण अशा अजून १०-१२ व्याधी आहेत की ज्यामधे बुद्धीभ्रंश होतो. दोन तीन साध्या पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. कधी कधी आपल्याला स्वत:लाच असं वाटतं की आपलं विस्मरण होत चाललय. आपण आपल्या सहका-यांना आणि कुटुंबियांना विचारतो की, ’काय रे आज काल मी खूप विसरायला लागलो आहे का?’ किंवा कधी कधी आपल्याला घरातल्या किंवा जवळच्या एखाद्या व्यक्ती मधे असं विस्मरण आढळायला लागतं. अशा विस्मरणाचं जर ठोस उदाहरण दिसून आलं तर सायकोमेट्रिक टेस्ट करून घ्या. ही टेस्ट म्हणजे माझ्या मेंदूची जी बौद्धीक क्षमता आहे त्याचं एक पृथ्थकरण आहे. जे ऑबजेक्टिवली आपल्याला मोजता येतं. ह्या पृथ्थकरणामधे तुमच्या ज्या शंका आहेत, तुमच्या ज्या कमतरता आहेत, त्या ठळकपणे दिसून येतात. आणि त्या परीक्षेमधे जर दिसून आलं की ह्या साठीच्या किंवा सत्तरीच्या व्यक्तीमधे काहीतरी कमतरता आहे, तर त्याची अजूनही डीटेल इन्व्हेस्टिगेशन्स करता येतात आणि तुम्हाला असे काही बौद्धीक व्यायाम सांगितले जातात की ज्या करून तुमच्या आजाराचं रुपांतर बुद्धीभ्रंशात ह्या व्याधीमधे होणं हे लांबू तरी शकतं. काही वेळा टळूही शकतं, हा पुरावाही शास्त्राकडे आहे. आणि म्हणून ह्या चाचण्या करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय उपयोगी आहे.

बुद्धीभ्रंश आणि मेंदूतील रक्तपुरवठा ह्या दोन महत्त्वाच्या व्याधी जर सोडल्या, त्या न होण्यासाठी व्यवस्थित काळजी घेतली तर पन्नाशीनंतर मेंदूसाठी खूप काही काळजी करायचे कारण आहे असे वाटत नाही.