Print
Hits: 6284

मूत्रपिंड कोणते कार्य करते?
शरीरातील द्रव पदार्थांचा समतोल राखण्याचे मध्यवर्ती कार्य मूत्रपिंड करते, त्याला Homeostasis असे म्हणतात.

शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? ICF आणि ECF म्हणजे काय?
प्रौढ निरोगी व्यक्तिच्या वजनाच्या ६०ऽ पाणी शरीरात असते, ते वेगवेगळ्या भागात असते. पेशीच्या अंतर्भागाला (पेशीत असलेल्या) ICF म्हणतात. यात शरीरातील पाण्याच्या २/३ पाणी असते किंवा शरीराच्या ४०ऽ पाणी असते. पेशींच्या बाह्यभागाला (पेशींच्या बाहेर अस्तित्वात असलेल्या) ECF (Extra Cellular Fluid) म्हणतात. यात संपूर्ण शरीराच्या १/३ पाणी असते.

मानवाच्या शरीरातील मुख्य विद्युत अपघट्य कोणते?
मानवाच्या शरीरात मुख्यत: पुढील विद्युत अपघट्य असतात. सोडियम पोटॅशियम, क्लोराईड, बायकार्बोनेट, फॉस्फेट आणि सल्फेरस इ. चे हे अपघट्य पेशींमध्ये आणि पेशींच्या बाहेर विभागलेले असतात. सोडियम, क्लोराईड आणि बायकार्बोनेट हे मुख्यत: पेशीच्या बाह्यभागात असतात. म्हणून ते ECF ची तत्व स्थापित करतात. पोटॅशियम पेशीच्या अंतर्भागात असते. शरीरातील ९८% पोटॅशियम पेशीच्या अंतर्भागात असते. पेशीच्या अंतर्भागातील तरल पदार्थांचे प्रमाण बदलत असते आणि त्याच्यात सामान्यपणे फॉस्फेटस, सल्फेटस आणि चूकीचा परिणाम झालेले लहान रेणू समाविष्ट असतात.

Volume Depletion म्हणजे काय?
शरीरातील रक्ताचा किंवा द्रव पदार्थाचा र्‍हास होणे त्याला Volume Depletion म्हणतात. रक्तस्त्राव, उलटीद्वारे द्रव पदार्थाचा र्‍हास, अतिसार किंवा मूत्रोत्सर्जानास उत्तेजन देणार्‍या औषधामुळे मूत्रद्वारे जास्त पाणी जाणे, ही रक्ताचा किंवा द्रव पदार्थाचा र्‍हास होण्याची कारणे दिसून येतात.

Volume Depletion असणारे रूग्ण कसे असतात?
वैद्यकीय चिकेत्सा/अभिव्यक्ती द्रवपदार्थाच्या र्‍हासाच्या परिमाणावर अवलंबून असते. जर त्याचे प्रमाण कमी जास्त असेल तर रूग्णात चक्कर येणे, अशक्तपणा, तहान वाढणे, तोंड कोरडे होणे, अशी लक्षणे दिसून येतात. जर त्याचे प्रमाण जास्त असेल तर त्याचा परिणाम रक्तदाब कमी होण्यात आणि मूत्रोत्सर्जावर होतो.

व्यक्तीचे `Volume Status' योग्य रीतीने मोजण्याचे परिणाम आहे काय?
अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार्‍या रूग्णांमध्ये मूत्राशयातून मूत्र बाहेर काढण्यासाठी उपयोगात आणली जाणारी लवचिक रबरी नळी (Cathetera) हृदयाला जोडलेली असते. त्यामुळे मध्यवर्ती नीलरक्तवाहिनीचा दाब, फुफ्फुसांमधील केशवाहिन्यांचा दाब इत्यादी दाबांचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते. या परिमाणांद्वारे `Volume Status' योग्य रीतीने मोजता येतो.

`Volume Depletion' चा कशाप्रकारे उपचार केला जातो?
व्हॉल्यूम आकुंचित होण्याच्या रोगात योग्य त्या तरल पदार्थाचा करून उपचार दिले जातात. जर रक्तस्त्राव होत असेल तर रक्त दिले जाते. पेशींमध्ये आढळणारे आणि पाण्यात विद्राव्य असे प्रथिन Albumin आणि रक्तजल (Plasama) यांचा तातडी च्या क्षणी उपयोग केला जातो. सोडियम असणार्‍या द्रावणाचा उपयोग उलटी होणे, अतिसार इ. मध्ये केला जातो.

Hyponatremia म्हणजे काय?
रक्तातील सोडियमची पातळी कमी होणे, याला Hyponatremia असे म्हणतात. याची सामान्य पातळी १४० meq/IL असते.

Hyponatremia होण्याची कारणे कोणती?
जेव्हा सोडियम चा र्‍हास होतो किंवा शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून त्यात सोडियम विरघळते, तेव्हा Hyponatremia होतो.
१) अतिसारामुळे सोडियमचा र्‍हास.
२) मूत्रपिंडाद्वारे सोडियमचा र्‍हास.
३) पाण्याची पातळी वाढणे, जी हृदयक्रिया बंद पाडण्यात किंवा मूत्रपिंडाच्या रोगात दिसून येते.
४) SIADH (Syndrome of lnappropriated ADH Production)

Hypenatremia घातक आहे काय?
सोडियमच्या र्‍हासाच्या पातळीवर Hyponatremia परिणाम अवलंबून असतात. काहीवेळा रूग्णाला भ्रम होतो आणि काही वेळा जर सोडियमची पातळी खूप खाली गेली असेल तर त्याचा परिणाम रूग्ण बेशुध्दावस्थेत (Coma) जाणे किंवा त्याचा मृत्यू हो‍उ शकतो.

Hypernatremia म्हणजे काय?
रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढल्याने Hyprenatremia होतो. पाण्याचे चयापचयात जेव्हा अनियमितता निर्माण होते आणि जेव्हा शरीरातील विद्राव्य द्रवामध्ये विरघळणार्‍या पदार्थाचे प्रमाण पाण्यात वाढते तेव्हा Hypernatremia होतो.

Hypernatremia होण्याची कारणे कोणती?

 1. कोमा
 2. परासरणात्मक साराचे (Osmotic Substances) मूत्रात असणे. ज्यामुळे पाण्याचा जास्त र्‍हास होतो. उदा. साखर, मॅनिटॉल चे व्यवस्थापन, मधुमेहाची लक्षणे इ.
 3. मूत्रपिंडाद्वारे पाण्याच्या जास्त प्रमाणात र्‍हास
 4. त्वचेमार्फत पाण्याचा जास्त प्रमाणात र्‍हास उदा. घाम, भाजणे इ.

शरीरात पोटॅशियमचे प्रमाण किती असते?
मानवाच्या शरीरात ३५०० meq एवढे पोटॅशियम असते. ते बहुतांशी पेशींमध्ये असते.

Hyperkalemia म्हणजे काय?
रक्तातील पोटॅशियमची असाधारण वाढ म्हणजे Hyperkalemia पोटॅशियमची सामान्य पातळी ३.५ ते ४.५ meq. (प्रत्येक लिटरला) एवढी असते. जर ही पातळी ४.५ meq/l पेक्षा जास्त असेल तर त्यास Hyperkalemia म्हणतात.

Hyperkalemia ची कारणे कोणती?

 1. मूत्रपिंडाद्वारे कमी प्रमाणात उत्सर्जन होणे, जसे मूत्रपिंडाच्या रोगात होते.
 2. मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणार्‍या औषधांमध्ये असणारे पोटॅशियमचे प्रमाण (उदा. Spironolactone)
 3. पोटॅशियमचे पेशींमधून बाहेर जाणे, ही परिस्थिती पेशींमधील आम्ल विषारी वाटल्यास दिसून येते.

Hyperkalemia झाला असल्यास रूग्ण कसा दिसतो?

 1. हाता - पायात अशक्तपणा
 2. हृदयाची असाधारण धडधड जी मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. अशावेळी ECG उंच लहरी दर्शविते.

Hyperkalemia चा उपचार कोणता?

 1. आपत्कालीन परिस्थितीत नसेतून कॅल्शियम दिले जाते त्यामुळे हृदयाचा जास्त आत असणार्‍या पोटॅशियमपासुन बचाव होतो.
 2. इन्सुलिन आणि साखर नसेतून दिली जाते.
 3. Polysterene Sulfonate दिले जाते.
 4. मूत्रपिंडाच्या रोग्यांसाठी (Renal failure) Hemodilysis वापरले जाते. Hyperkalemia चे मुख्य कारण अजून सापडले नाही.

Hyperkalemia म्हणजे काय?
जेव्हा रक्तातील पोटॅशियमची पातळी ३.५ meq/L च्या खाली जाते तेव्हा त्यास S असे म्हणतात

Hypokalemia होण्याची कारणे कोणती?

 1. अपुरे खाणे.
 2. मूत्रपिंडाद्वारे पोटॅशियमचा जास्त र्‍यास हा र्‍हास मूत्रोत्सर्जनास उत्तेजना देणार्‍या औषधामधुन होत असतो
 3. उलटी, अतीसार यामुळे जठर व आतड्यांमधून र्‍हास
 4. भाजल्यामुळे त्वचेद्वारे पोटॅशियमचा र्‍हास