Print
Hits: 13116

मूत्र पृथ:करण कशासाठी केले जाते?
खालील गोष्टी समजण्यासाठी मूत्र पृथ:करण केले जाते.

 1. मूत्रातील रक्ताचे प्रमाण किंवा प्रथिन पाहणे.
 2. लघवीमध्ये पस आहे का पाहणे. s ची संख्या वाढणे.
 3. मूत्रातील स्फटिक शोधून काढणे, जे मुतखड्यात आढळतात.
 4. Casts शोधून काढणे. मूत्रपिंड खराब झाल्यामुळे प्रथिन, नळीतील पेशी, लाल पेशी, पांढर्‍या, पांढर्‍या रक्त पेशी एकत्र येऊन साचतात. नंतर ते मूत्रपिंडाद्वारे मूत्रात रक्त जाऊण Casts च्या रूपात दिसतात.

मूत्राच्या रंगाला महत्व का असते?
साधारणपणे मूत्राचा रंग फिकट पिवळा असतो. खालील परिस्थितीत यात बदल होतो.

 1. गर्द रंगाचे मूत्र - जेव्हा पाणी कमी प्रमाणात प्यायले जाते किंवा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, व्यायाम केल्याने किंवा उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्यास, गर्द रंगाचे मूत्रोत्सर्जन होते.
 2. तपकिरी (Brownish) रंगाचे मूत्र - जेव्हा मूत्रात थोड्या प्रमाणात रक्ताचे असते. तेव्हा तपकिरी रंगाची लघवी होते, तिला Smokey Urine असे म्हणतात.
  Glomerulonephritis या रोगात दिसून येते. या बरोबरच पावलांची सूज कमी प्रमाणात मूत्रोत्सर्जन आणि एखादेवेळेस ताप, ही लक्षणे दिसून येतात.
 3. अति पिवळी लघवी - काविळीत दिसून येते. पोटात दुखणे, शिसारी येणे आणि ताप ही लक्षणे दिसतात.
 4. बरीचशी औषधे जसे Rifampicin किंवा बीट वगैरे खाल्ल्यामुळे लघवीचा रंग केशरी येऊ शकतो.
 5. पांढरट लघवी - मूत्रमार्गात जेव्हा एखादा संसर्गजन्य रोग होतो, तेव्हा मूत्रोत्सर्जन करताना मूत्रमार्गात दाह होतो.
 6. लघवीतून रक्त जाते लाल लघवी होते.

Proteinurea म्हणजे काय?
लघवीतून प्रथिनं बाहेर टाकण्याचे प्रमाण जेव्हा वाढते, तेव्हा त्याला Proteinurea असे म्हणतात. प्रौढांच्या लघवीतून २४ तासात साधारण १५० ml. gms. पेक्षा कमी प्रथिनं बाहेर टाकली जातात. या कशातही जर वाढ झाली तर त्याला Proteinurea म्हणतात.
Proteinurea ची लक्षणे कोणती?
Dipstick परीक्षेद्वारे लघवीतले प्रथिनांचे प्रमाण पाहिले जाते, आणि ते मुख्यत: पाण्य़ात वेद्राव्य असे प्रथिन (albumin) वर अवलंबून असते. त्यामुळे प्लास्टिक पट्‌टीद्वारे निरीक्षण केले असता लघवीचा रंग बदलेला आढळतो.
Proteinurea खालीलप्रमाणे मोजला जातो.
१अ: साधरणत: ३० mg/dl
२अ: ३०-१०० mg/dl
३अ: १००-५०० mg/dl
Proteinurea ची कारणे कोणती?
Proteinurea ची काही कारणे खालीलप्रमाणे

 1. मूत्रपिंडातील महत्वाच्या कार्यगटावर (Glomerulus) परिणाम करणारे रोग उदा. (Glomerulunephritis) मूत्रपिंडातील गोकेरूल्सचा दाह, Nephroticsyndrome.
 2. औषधे, बॅक्टेरिया प्रतिबंधक औषधे किंवा रक्तदाब कमी होणे या कारणामुळे मूत्रपिंडातील नळ्यांना इजा झाल्यास
 3. ग्लोमेरूल्स मधून जर प्रमाणापेक्षा जास्त प्रथिनांची जळती झाली तर उदा. मज्जापेशीमधील रेणू (Myeloma)

नेहमीच्या सामान्य तपासणीमध्ये व्यक्तीनं Proteinase प्लास्टिक पट्‌टी (dipstick) वर तपासला पाहिजे. तिने/त्याने काय करावे?
Proteinurea चे कारण शोधण्यासाठी व्यक्तीने एखाद्या तज्ञाची मदत घेणे महत्वाचे आहे. साधारणपणे २४ तासात जेवढ्या प्रथिनांचे उत्सर्जन होते ते नोंदले जाते. काही रूग्णांना तर मूत्रपिंडाची Biopsy करावी लागते.

लघवीमध्ये पू आढळणे (pyaria) म्हणजे काय?
नेहमीच्या प्रमाणापेक्षा लघवीतून जास्त प्रमाणात पांढर्‍या रक्त पेशींचे उत्सर्जन होणे यालाच लघवीमध्ये पू आढळणे असे म्हणतात. अंदाजे १० cc लघवीचा नमुना घेऊन ती भांड्यांमध्ये काही काळ ठेवल्यानंतर तळाशी जो गाळ बसतो त्यावरून पांढर्‍या पेशींचे प्रमाण ठरवले जाते. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जेव्हा पाचपेक्षा जास्त पांढर्‍या रक्तपेशी दिसतात, तेव्हा प्रमाणापेक्षा जास्त पांढर्‍या रक्तपेशींचे उत्सर्जन लघवीवाटे होत असते. याचे मुख्य कारण मूत्रमार्गात संसर्ग असते. मुतखडा, मूत्रपिंडाची सूज यातही लघवीत पू आढळतो.

रक्ती लघवी (Hematuria) म्हणजे काय?
लघवीमध्ये रक्त जाणे याला रक्ती लघवी असे म्हणतात.
याचा शोध कसा लागतो?
Dipstick च्या वापराने याचा शोध लागतो. यात Orrhotoluidine ची प्रक्रिया केलेली एक पट्‌टी असते. रक्त, प्रतिक्रिया निर्माण करणार्‍या घटकावर प्रतिक्रिया करते, त्यामुळे तपासणी पट्‌टीचा रंग बदलतो. सूक्ष्मदर्शकाखाली दिसणार्‍या लाल रक्तपेशींच्या संख्येवरून साधारणपणे रक्ती लघवीचे निदान होते. पुरूषांमध्ये साधारणपणे ० ते १ आणि स्त्रियांमध्ये थोडेसे जास्त प्रमाण असते. स्त्रियांमध्ये किंवा पुरूषांमध्ये जर लघवीमध्ये अगदी कमी प्रमाणात लाल रक्त पेशी असतील तरी त्यांचा शोध घेतला पाहिजे. मासिक पाळी सुरू असणार्‍या स्त्रियांच्या लघवीत लाल रक्त पेशी असू शकतात हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, म्हणून पाळी संपल्यानंतर पुन्हा लघवीची तपासणी करून घ्यावी.
रक्ती लघवी होण्याची कारणे कोणती?

 1. मूत्रपिंडाशी संबंधित कारणे - मुतखडा, गाठ किंवा संसर्ग
 2. रक्तस्त्रावाचा आजार असणारे रूग्ण (रक्ताची गुठळी बनण्याची सवय)
 3. ग्लोमेरूलर कारणे: मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सचा दाह
 4. मूत्रपिंडातील नळ्यांना इजा करणारे रोग: प्रतिबंधक औषधे घेतल्यामुळे होणारी इजा, औषधांमुळे होणारी इजा