Print
Hits: 4640

मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सचा दाह म्हणजे काय?
खालील वैशिष्ट्यांवरून हा रोग ओळखू येतो
१) कमी प्रमाणात मूत्रोत्सर्जन - oliguria
२) लघवीत रक्ताचे प्रमाण ज्यामुळे लघवीचा रंग धुरकट होतो
३) लघवीत लाल रक्तपेशी
४) मूत्रोत्सर्जन व्यवस्थित न झाल्याने हाता - पायांवर सूज.
या रोगाची कारणे कोणती?
खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे मूत्रपिंडातील गोमेरूल्सचा दाह होऊ शकतो.
१) संसर्ग: सूक्ष्म जीवाणूंची एक जात (Streptococi), Hep C
२) त्वचाक्षय आणि रक्तवाहिनीचा दाह
३) LgA Nephropathy
या रोगावर उपचार कोणते?
१) मीठ आणि पाण्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे
२) मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणार्‍या औषधांचा वापर, त्यामुळे तरल पदार्थ साचून राहणार नाही.
३) रक्तदाब कमी करणारे घटक, जशी गरज असेल त्याप्रमाणे साधारणपणे Steroids किंवा इतर घटक वापरत नाहीत.

मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सच्या दाहाचे पुनर्वसन कशात होत किंवा रोगभविष्य कोणते?
ज्या कारणांमुळे हा दाह होतो. त्यावर अवलंबून असते. सूक्ष्म जीवाणूंच्या संसर्गात जर याचे स्थान दुय्यम किंवा गौण असेल तर रोगभविष्य चांगले आहे.

IGA Nephropathy म्हणजे काय?
ग्लोमेरूल्समध्ये इम्युनोग्लोबिन (IGA) कमी झाल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. १९६८ मध्ये Berger आणि Hinglais यांनी प्रथम याच वर्णन केले होते. म्हणून हा रोग Bergers Disease म्हणून ओळखला जातो आणि मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सचा दाह हा रोग जगार सगळीकडे दिसून येतो. पुरूषांमध्ये सामान्यपणे दिसून येतो.

मूत्रपिंडदाह होण्याची कारणे कोणती?
अजूनही या रोगाचे निश्‍चित कारण सांगणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे आहे. काही जीवाणूच्या संसर्गात हा दुय्यम असेल जो एखाद्या संसर्गाला दाद न देणार्‍या पध्दतील जास्त रोगप्रतिबंधक पदार्थ निर्माण करण्यास उत्तेजन देतो आणि शेवटी हे पदार्थ मूत्रपिंडात जमा होतात, असे एक कारण असू शकते.

रोगनिदानासाठी मूत्रपिंडाची बायप्सी करणे गरजेचे आहे काय?
होय. निदान निश्‍चित करण्यासाठी बायप्सी केली जाते.

या रोगात रूग्ण कसा दिसतो?
बर्‍याचशा रूग्णांमध्ये लहान किंवा मोठ्या प्रमाणात लघवीत रक्त दिसून येते आणि ते प्रथिन स्फटिकाशी (Protein Urea) संबंधित असते. काही रूग्णांमध्ये रक्तदाब वाढलेला असतो.

IGA Nephropathy वर उपचार करता येतात का?
बर्‍याच प्रकारच्या उपचारपध्दती वापरल्या गेल्या आहेत. उदा. Steroids, Face Oil इ. यातील प्रत्येकाने स्वतंत्र असे फायदेशीर परिणाम दिसून आले की ज्यामुळे हा रोग नियंत्रित करता येतो. ज्या पुरूष रूग्णांना उच्च रक्तदाब आहे आणि ज्यांच्यात मूत्रपिंडाचा रोग बळावतो आहे त्यांच्यावर हे उपचार करून पहावेत.

त्वचाक्षय (Lupus) मूत्रपिंड दाह म्हणजे काय?
या रोगार त्वचा, सांधे, मज्जासंस्था, मूत्रपिंड आणि रक्त यावर परिणाम होतो. यात स्थानिक रक्तसंचयामुले लाली येते याला Systemic Lupus Erythmatosus (SCE) म्हणतात. जेव्हा मूत्रपिंडावर याचा परिणाम होतो तेव्हा त्याला त्वचाक्षय मूत्रपिंड दाह असे म्हणतात.

त्वचाक्षय मूत्रपिंडदाहासाठी काही उपचार आहेत काय?
होय. मूत्रपिंडाची बायप्सी आणि पेशीसमूहाचे वर्गीकरण करून या रोगावरील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाते. जेव्हा रोगोपचार करावयाचा असतो तेव्हा बहुतांशी Steroids चा वापर केला जातो आणि बर्‍याच वेळा मूत्रपिंडरोगतज्ञ Cyclophosphamide ही वापरातात. या रूग्णांना हे घटक/औषधे साधारणपणे ६ ते १२ महिन्यापर्यंत घ्यावे लागते.

‘मला त्वचाक्षय मूत्रपिंडादाह असल्याचे निदान झाले आहे’. मला डायलेसीस करावे लागेल काय?
रोगामध्ये ज्यांच्या पेशीसमूहाच्या रचनेत जास्त बदल झालेला नाही ते बायप्सी केल्यानंतर उपचाराला चांगला प्रतिसाद देतात. ज्यांच्या पेशीसमुहाच्या रचनेत बदल झाला आहे त्यांच्या बाबतीत तेव्हा प्रतिसाद मिळत नाही. फक्त काही रूग्णच डायलेसीस किंवा रोपणासाठी जातात.

त्वचाक्षय मूत्रपिंडदाह असणारा, डायलेसीसवर असणार्‍या रूग्णाला मूत्रपिंड रोपण करता येते काय?
होय. या प्रकारच्या रूग्णावर मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया करता येते, आणि एकदा रोपण केल्यानंतर हा रोग पुन्हा उद्‌भवण्याची शक्यता फार कमी असते.