Print
Hits: 11468

शीघ्रगती/तीव्र मूत्रपिंड दोष
तीव्र मूत्रपिंड दोष म्हणजे काय?
मूत्रपिंडातील पेशींचा तीव्र विनाश किंवा झीज जी पुन्हा पुन्हा होऊ शकते, त्याला तीव्र मूत्रपिंड दोष असे म्हणतात.
याची कारणे कोणती?

 1. कमी रक्तदाबामुळे मूत्रपिंडाला कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. उलटी, अतिसार, जास्त रक्तस्त्राव (शस्त्रक्रिया केल्यानंतर), भाजणे या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये मूत्रपिंडाला कमी रक्तपुरवठा होतो.
 2. रोगप्रतिबंधक औषधे किंवा रंग किंवा प्रमाणापेक्षा जास्त प्रथिन यामुळे मूत्रपिंडाला इजा झाल्यास. जेन्टामायसिन सारखी प्रतिबंधक औषधे मूत्रपिंडाला सरळ इजा करू शकतात तर औषधांची ऍलर्जी ज्याला Interstitial मूत्रपिंड दाह म्हणतात, मूत्रपिंडाला इजा करतात (उदा. सल्फा औषधे)
 3. कर्करोग, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ यामुळे मूत्रप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

तीव्र मूत्रपिंडदोष प्राणघातक आहे काय?
होय. ही गंभीर परिस्थिती आहे. रूग्णालयात असलेल्या या रोगाच्या रूग्णांचं मृत्यूचं प्रमाण ५०% पेक्षा जास्त आहे.
हा रोग झाला आहे हे कसे समजते?
जेव्हा मूत्रोत्सर्जानाचे प्रमाण अचानक खूप कमी होते आणि क्रिटेनीन वाढते तेव्हा मूत्रपिंडदोष आहे हे लक्षात येते. अति उलट्या होत असतील तर रूग्णात Volume Depletion ची चिन्ह आणि लक्षणे आढळतात.
यावर काही उपचार आहे काय?
Volume Depleted रूग्णांमध्ये फ्लुइडस्‌ रक्त देऊन रक्तदाब वाढविला पाहिजे. विरूध्द परिणाम करणारे औषध शोधून काढून त्याचा वापर थांबविला पाहिजे. काही रूग्णांमध्ये डायलेसिस (सच्छिद्र पडदा वापरून द्रवामधील स्फटिक पदार्थ आणि द्रवभाग निरनिराळे करणे) करावे लागते, जे बहुतेक वेळा तात्पुरते असत.
जुनाट मूत्रपिंड दोष म्हणजे काय?
मूत्रपिंडाचे कार्य हळुहळू मंदावण्यांच्या क्रियेमुळे या दोषाचे निदान होते. याची कारणे पुढीलप्रमाणे:

 1. मूत्रपिंडातील महत्वाच्या कार्यगटाचा दाह - हा मूत्रपिंडाचा संसर्गजन्य रोग नाही. कमी प्रमाणात लघवी, लाल रंगाची लघवी, लघवीत प्रथिन, अंगाला सूज येणे ही याची लक्षणे होत. उच्च रक्तदाबात बर्‍याच वर्षापर्यत कोणतेही लक्षण दिसत नाही.
 2. उच्च रक्तदाब - बरीच वर्ष अनियंत्रित असलेला उच्च रक्तदाब मूत्रपिंडातील रक्तपेशींना हानिकारक ठरतो आणि मूत्रपिंड दोष निमाण होतो.
 3. मधुमेहामुळे मूत्रपिंडाची रक्त गाळण्याची आणि निरूपाची आणि निरूपयोगी पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते. साखरेचे जास्त प्रमाण मूत्रपिंडाद्वारे जास्त रक्त गाळते. काही काळ ही परिस्थिती राहिल्यामुळे आणि मूत्रपिंंडाला अधिक कार्य करावे लागल्यामुळे गाळण्याची प्रक्रिया दोषपूर्ण होते.
 4. जुनाट मूत्रपिंड संसर्ग - बराच काळ संसर्ग राहिल्याने मूत्रपिंडाच्या रचनेला हानी पोहचते. यामुळे मूत्रपिंडाची रक्त गाळण्याची क्षमता कमी होते.
 5. मुतखड्यासारखा अडथळा - मूत्रप्रवाहामध्ये मुतखड्यासारखे अडथळा निर्माण होऊन तो Nephrons ना हानिकारक ठरतो. त्यामुळे हळुहळू पण शेवटी त्याचा परिणाम जुनाट मूत्रपिंडदोष निर्माण होण्यात होतो.
 6. बरीच औषधे मूत्रपिंडाला हानी पोहचवितात. Aspirin, lbuprofen ही औषधे आणि Sulpha drugs आणि जेन्टामायसिन ही रोगप्रतिबंधक औषधे सगळ्यात घातक आहेत.

जर माझ्या मूत्रपिंडात जुनाट दोषाचे निदान झाले तर मी डॉक्टरांकडे केव्हा-केव्हा जायला पाहिजे?
मूत्रपिंडाचा जुनाट दोष असणार्‍यांनी मूत्रपिंड तज्ञांकडून तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. या रूग्णांना कमीत कमी तीन महिन्यातून एकदा तपासले पाहिजे.
माझ्या डॉक्टरांनी मला २४ तासातील लघवी द्यायला सांगितले. ही कोणत्या तपासणीसाठी वापरली जाते?

 1. लघवीत किती प्रमाणात प्रथिनं जात आहेत याचे अचूक निदान करण्यासाठी.
 2. २४ तासात किती क्रिटेनीन बाहेर टाकले गेले हे पाहण्यासाठी, क्रिटेनीन खालील सूत्राचा उपयोग करून मोजले जाते.

Cr Clearance = (U x V )/p U: Con of creatinine in urine
V: Volume of urine
P: Plasma creatinine.

यावरून मूत्रपिंडाच्या कार्याची कल्पना येते.
क्रिटेनीनची अशी एखादी पातळी आहे का, की तेव्हा डायलेसीस सुरू करावे लागेल?
नाही. रक्तजल क्रिटिनीनची पातळी ही स्नायू सम्मुचयाची (Mass) परावर्तन आहे. ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असू शकते. कुपोषीत व्यक्तींमध्ये ही पातळी कमी असू शकते.
या रूग्णांना (CRF) कोणत्या प्रकारचा आहार द्यावा?
६ ग्रॅम प्रथिनं/kg शरीराच्या वजनाच्या प्रमाणात एका दिवसाला घेतली पाहिजेत. माफक प्रमाणात प्रथिनांवर घातलेले बंधन (CRF) मध्ये होणार्‍या वाढीचा वेग मंदावते, असे दिसून आले आहे.
मूत्रपिंड दोष असणार्‍या रूग्णांना जीवनसत्व देण्याची गरज आहे काय?
होय. त्यांच्या आहारात जीवनसत्व ब, क आणि फोलिक ऍसिड असले पाहिजे. ज्यांना Renal Osteodystrophy वर उपचार चालू आहेत. अशांसाठी जीवनसत्व ड राखून ठेवावे. रक्तातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे PTH नामक संप्रेरकाच्या स्त्रावाला उत्तेजित करते, हे संप्रेरक हाडांवर परिणाम करते. अशाप्रकारच्या रोग्यांमध्ये कॅल्शियम कमी प्रमाणात आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असते. त्यांचा उपचार कॅल्शियमचा पुरवठा करून केला पाहिजे.
पोटॅशियम घेण्यावर काही बंधने आहेत का?
रूग्णाने पोटॅशियम घेण्याबाबत जागरूक असले पाहिजे. केळी, टमाटे, संत्री, फळांचे रस इ. ज्यात पोटॅशियम जास्त असते, ते पदार्थ खाण्याचे टाळावे.
माझ्या मूत्रपिंडात जर दोष असेल, तर मला किती पाणी किती पाणी प्यायचे परवानगी आहे?
डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगवेगळी असते. मूत्रपिंड दोष असणार्‍या रूग्णांमध्ये Volume expansion आणी Contraction दिसून येते. म्हणून त्यांनी नेहमी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. साधारणपणे दिवसाला १-१.५ लिटर एवढ्या माफक प्रमाणात पाण्यावर बंधन घातले जाते.
रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे कितपत महत्वाचे आहे?
रक्तदाब नियंत्रित ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. रक्तदाब नियंत्रित असल्यास रोगाची वाढ मंदावते असे अभ्यासावरून दिसून आले आहे.

(CRF) मध्ये रक्तातील लाल पेशी कमी होण्याचे कारण काय?
Erythropoeitin चा कमी उत्पादनाशी हे संबंधित आहे. Erythropoeitin अस्थिमज्जांना लाल रक्तपेशी उत्पादित करण्यास उत्तेजित करते.
ऍनिमियासाठी काही उपचार आहे काय?
लाल रक्तपेशी वाढविण्यासाठी Erythropoeitin चे इंजेक्शन घ्यावे. हे इंजेक्शन घ्यायला सुरूवात करण्याआधी लोहाचे प्रमाण पाहणे महत्वाचे आह्ते.
या रोगाच्या (Chronic Renal Failure) शेवटच्या स्थितीत कोणते उपचार उपलब्ध आहेत?
खालील उपचार पध्दती उपलब्ध आहेत.
१) हेमोडायलेसीस
२) पेरीटोनियल डायलेसीस
३) मूत्रपिंडारोपण
मूत्रपिंड दोष असणार्‍या रोग्यांमध्ये डायलेसीस केव्हा सुरू करावे?
जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य नेहमीपेक्षा २५% कमी होईल हे क्रिटेनीन Clearance चे मापन करून निश्‍चित झाल्यानंतर लगेचच डायलेसीस सुरू करावे असा आताच्या तज्ञांचा सल्ला आहे. शिसारी येणे, उलट्या होणे किंवा फुफ्फुसामध्ये द्रवपदार्थ साठून राहणे, अशा लक्षणांची वाट पाहून नये जे मूत्रपिंडदोषाच्या अंतिम स्थितीत दिसतात.