Print
Hits: 5935

मधुमेहाचा मूत्रपिंडावर परिणाम होतो काय?
होय, निश्‍चितपणे मधुमेहाचा मूत्रपिंडावर परिणाम होतो, याला Diabetic Nephropathy म्हणतात.

मधुमेही मूत्रपिंड दोष म्हणजे काय?
साधारणपणे ज्यांना ३० ते ५०% इन्सुलिन घ्यावे लागते त्यांच्यात या प्रकरचा दोष असतो आणि १० ते १५% NIDDM असणार्‍यांना मधुमेही मूत्रपिंड दोष असतो.

मधुमेह झाल्यानंतर किती दिवसांनी मूत्रपिंडावर परिणाम होतो?
IDDMमधुमेहाच्या Juvenile अवस्थेत मूत्रपिंडावर परिणाम होतो. १४ - १५ वर्षांपासून जर juvenile मधुमेह असेल तरच परिणाम होतो. ज्यांना Juvenile मधुमेह नाही त्यांच्यात वेगवेगळ्या अवधीत मूत्रापिंडावर परिणाम होऊ शकतो.

असे कोणते घटक आहेत की ज्यावरून Deabetic Nephropathy मध्ये वाढ झाली आहे हे समजू शकत?
पुढील गोष्टीवरून वाढ झाल्याचे समजू शकते
१) साखर व्यवस्थित नियंत्रित होत नाही.
२) रक्तदाब नियंत्रित झाला नाही तर
३) ज्यांच्या कुटुंबात उच्चरक्तदाब किंवा हृदय रोग आहे अशा रूग्णांना
४) ज्यांच्या बहीण किंवा भावाला Diabetic Nephropathy आहे.

मधुमेही मूत्रपिंड दोष होऊ नये म्हणून कोणती सावधगिरी बाळगावी?
प्रत्येक मधुमेही व्यक्तीने त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्य त्यांच्या डॉक्टरांकडून तपासून घेतले पाहिजे, आणि मूत्रपिंड तज्ञाला भेटणे देखील आवश्यक आहे. खालील घटकांमुळे मूत्रपिंड दोषात वाढ होऊ शकत नाही.
१) रक्तदाबावर नियंत्रण
२) रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण

उपचार सुरू असतांना देखील जर मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड होत राहिला तर काय घडू शकते?
बहुतांशी मधुमेही रूग्णांमध्ये उपचार सुरू असतांना देखील मूत्रपिंड दोष अंतिम स्थितीत जातो उदा. डायलेसीस किंवा मूत्रपिंड रोपण.

मधुमेही रूग्ण मूत्रपिंड रोपण करू शकतो काय?
होय, मधुमेही रूग्ण मूत्रपिंड रोपण करू शकतो. खरं तर मूत्रपिंड आणि स्वादुपिंड यांचे रोपण एकत्रितपणे IDDM च्या रूग्णात करू शकतात. मधुमेही रूग्णांमध्ये मूत्रपिंड रोपणाला चांगला प्रतिसाद मिळत नाही. काही अंशी हे खरे आहे की मधुमेही रूग्णाला जास्त संसर्ग होतो आणि हृदयाला कमी रक्तपुरवठा करण्याचा त्यांचा कल असतो.

मधुमेही रूग्णांमध्ये किती जणांना डायलेसीस करावे लागते?
NIDDM च्या रूग्णांमध्ये १० ते १५% पर्यंत डायलेसीस करावे लागते. IDDM रूग्णांमध्ये याचे प्रमाण ३०% पेक्षा जास्त असते.

डायलेसीसवर असणार्‍या रूग्णांमध्ये काही विशेष प्रश्न निर्माण होतात का?
मधुमेही रूग्णांमध्ये कृत्रिम मार्ग तयार करणे कठीण असते आणि त्यांना संसर्ग होण्याचा संभव जास्त असतो.

कुटुंबातील एखादी व्यक्ती मधुमेही रूग्णाला मूत्रपिंडदान करू शकते काय?
NIIDM च्या रूग्णांसाठी वापरू नये, कारण एकाच कुटृंबातील व्यक्ती आणि मुल यांच्यात मधुमेह वाढण्याचा धोका असतो. IDDM रूग्णाच्या बाबतीत त्याच्या कुटुंबातील व्यक्ती कमीत कमी त्याच्यापेक्षा १० वर्षे मोठी हवी.

अनेक पाणथळ पिशव्यांनी युक्त असलेला मूत्रपिंड रोग म्हणजे काय?
अनेक पाणथळ पिशव्यांमध्ये तरल लघवी असते आणि ती दोन्ही मूत्रपिंड मध्ये असते या वैशिष्ट्यावरून हा रोग ओळखू येतो.

पाणथळ पिशव्यांनी मूत्रपिंड रोग होण्याचे कारण काय?
हा गुणसूत्रांचा रोग आहे. पुनरूत्पादन विषयक पेशींमधील घटक प्रमाणापेक्षा क्रोमोझोम्स १६ वर जास्त असणे, याला Autosomal Dominant Disease असे म्हणतात. रोग इकडून तिकडे जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे Autosomal Recessive आणि तो प्रमाणापेक्षा जास्त असा क्रोमोझोम्स नंबर ६ वर दिसून येतो.

इतर अवयवांवर या पाणथळ पिशव्या दिसतात का?
होय. मूत्रपिंड, यकृत, मेंदू, स्वादुपिंड आणि काही वेळा तर हृदयात ही दिसून येतात.

हा रोग व्यक्तीच्या कसा लक्षात येतो?
बरीच वर्ष या रोगाचे कोणतेही लक्षण दिसत नाही. पाठदुखी, रक्तीलघवी, पोट भरल्यासारखे वाटणे ही सुरूवातीची लक्षणे दिसून येतात. या रूग्णाला मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा मुतखडा असू शकतो.

हा रोग परतवून लावण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपचार आहेत?
नाही. पाणथळ पिशव्यांच्या मूत्रपिंड रोगाचे उपचार पू-निर्मितीस प्रोत्साहन देणारे असतात.

हा रोग असणारे रोगी रोपण करू शकतात काय?
होय. हा रोग असणार्‍या रूग्णांवर रोपणाची शस्त्रक्रिया करू शकतात. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जर मूत्रपिंड खूप मोठे असेल तर रोपण करतेवेळी ते काढणे आवश्यक आहे.

ह्या रोगाचे निदान करण्यासाठी कोणती तपासणी केले जाते?
अल्ट्रासाउंड केल्याने या रोगाचे निदान होऊ शकते, पण जर गरज वाटली तर दरपोकळीचे सीटी स्कॅन करून हा रोग असल्याचे निश्‍चित करता येते.

ह्या रोगाला प्रतिबंध करता येतो का?
पुनरूत्पादन विषयीचे मार्गदर्शन या रोगाला आळा घालण्यास मदत करते. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रूग्णाची ओळख गर्भ धारण करण्याच्या आधीच्या वयात झाली पाहिजे, म्हणजे त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन घेता येते. यासाठी व्यावसायिक आणि या विषयातील तज्ञाकडे जाणे आवश्यक आहे, अशा तज्ञालाच प्राधान्य द्यावे.

अलपोर्टस्‌ लक्षणसमूह (Syndrome) म्हणजे काय?
हा पुनरूत्पादनाविषयक स्थानांतरीत रोग आहे याला X linked रोग असे म्हणतात. ज्यामुळे १) मूत्रपिंडाचे कार्य बिघडणे, २) कमी ऐकू येणे. ही लक्षणे दिसतात. जास्त प्रमाणात इतर प्रकारचे पेशीसमूह, जे मूत्रपिंडातील महत्वाच्या कार्यगटाच्या केशवाहिनीच्या खाली असणार्‍या लवचिक आवरणाचे घटक असतात, त्यांच्यामुळे हा रोग होतो.

अलपोर्टस्‌ लक्षणसमूह असलेला रूग्ण कसा दिसतो?
पुरूषांमध्ये मूत्रपिंडामधील बिघाड बहुतेक दिसून येतो, स्त्रियांमध्ये याचे प्रमाण फार कमी आहे.