Print
Hits: 10188

पेरीटोनियल डायलेसीस म्हणजे काय?
उदरपोकळी भोवतालचे व त्यातील सर्व अवयवांच्या भोवतालचे पातळ आवरण, पचनसंस्था भोवतालचे आवरण म्हणजे पेरीटोनियम उदरपोकळीतील अवयवांमध्ये जी जागा असते तीला पेरीटोनियल पोकळी असे म्हणतात.

पेरीटोनियल पोकळीर Dextrse आणि पाणी पेरीटोनियल आवरणातून या द्रावणात येते आणि तेथून वाहून जाते, किंवा बाहेर टाकले जाते.

पेरीटोनियल डायलेसीस करताना शरीरक्रियाशास्त्राचे कोणते तत्त्व वापरले जाते?
खालील दोन महत्वाच्या वेळी पेरीटोनियल डायलेसीस केले जाते.
१) भिन्न घनतेचे वायू व द्रवपदार्थ एकमेकात मिसळले जातात तेव्हा (Diffusion)
२) अल्ट्रा फिल्टरेशन
डिफ्युझन
डिफ्युझन हे यांत्रिक तत्त्व आहे. ज्यात पेरीटोनियल डायलेसीस निरूपयोगी पदार्थाचा नाश करते. यात उदर पोकळी व त्यातील सर्व अवयवांच्या भोवतालचे पातळ आवरण (Peritoneal) भेदून जाणार्‍या आवरणाचे कार्य करते आणि डिफ्युझन होते. नंतर रक्ताची तीव्रता वाढून ते डायलेसीसच्या द्रावणात मिसळते.
अल्ट्रा फिल्टरेशन
भेदून जाण्यायोग्य (Permeable) आवरणातून पाण्याची जी हालचाल होते तिला अल्ट्रा फिल्टरेशन असे म्हणतात. ही अशी यंत्रणा आहे ज्यात पेरीटोनियल डायलेसीस ने तरल पदार्थ काढून टाकले जातात. या प्रकारच्या डायलेसीसच्या द्रावणात ग्लुकोज असते ते परिणाम कारक Osmotic घटक म्हणून कार्य करते. त्यामुळे पातळ आवरणातून पाणी इकडून तिकडे जायला मदत होते. पाण्याबरोबर काही विद्राव्य द्रवात विरघळणारे पदार्थ (Solutes) ओढून घेतले.

पेरीटोनियल डायलेसीससाठी कोणते द्रावण वापरले जाते?
डायलेसीस द्रावणात खालील पदार्थ वापरले जातात.

सोडियम - १३२mg/lt. पोटॅशियम शून्य, गरज असेल त्याप्रमाणे मिसळले जाते.
क्लोराईड - ९६ ते १०२mg/lt. कॅल्शियम ३.५ किंवा २.५mg/lt.
मॅग्नेशियम - ०.५ किंवा १.५mg/lt.

बायोकार्बोनेट Lactate च्या स्वरूपात असते. सामान्या (Normal) डायलेसीस द्रावणात Lactate ३५ ते ४०mg/lt. असते. ग्लुकोज Dextrose च्या स्वरूपात असते.

पेरीटोनियल डायलेसीस कसे केले जाते?
पेरीटोनियल डायलेसीसमध्ये उदरपोकळीत (Abdoman) रबरी नळी (Catheter) घातली जाते. पेरीटोनियल डायलेसीस द्रावण जे प्लास्टिक पिशव्यांमध्ये दिले जाते (साधारणपणे २-२.५ लिटर एका वेळी) ते रबरी नळीला जोडले जाते आणि तेथून द्रावण उदरपोकळीत जाते. हे द्रावण काही वेळ उदरपोकळीत राहू दिले जाते आणि नंतर सोडून दिले जाते.

पेरीटोनियल डायलेसीस मध्ये Exchange अदलाबदल म्हणजे काय?
प्रथम उदरपोकळीत राहिलेले द्रावण बाहेर टाकले जाते. ज्या पिशवीत पेरीटोनियल डायलेसीसचे द्रावण असते ती पिशवी रबरी नळीला जोडली जाते आणि द्रावण आत सोडले जाते. नंतर ही पिशवी रबरी नळीतून काढून टाकली जाते (y-set मध्ये शक्य असते.) याला Exchange म्हटले जाते.
हे द्रावण उदरपोकळीत काही तासांपुरते ठेवले जाते नंतर बाहेर सोडले जाते.

Exchange साठी किती वेळ लागतो?
३० ते ४५ मिनिटे

CAPD म्हणजे काय?
सतत हिंडते फिरते किंवा चल पेरीटोनियल डायलेसीस म्हणजे CAPD (Continuous Ambulatory Peritoneal Dialysis) पेरीटोनियल डायलेसीसचे द्रावण कायम पोटात असते. दिवसातून ३ ते ४ वेळा Exchange केले जाते. पेरीटोनियल डायलेसीस द्रावण रात्रभर उदरपोकळीत राहू दिले जाते आणि सकाळी बाहेर सोडले जाते.

CCPD म्हणजे काय?
सतत चक्री पेरीटोनियल डायलेसीस म्हणजे CCPD (Continuous Cycler Peritoneal Dialysis) या पध्दतीत रात्री यंत्राच्या मदतीने डायलेसीस केले जाते. द्रावणाच्या पिशव्या झोपायच्या वेळी यंत्राला अडकवलेल्या असतात आणि यंत्र त्याला सांगितल्याप्रमाणे आपोआप उदरपोकळीत द्रावण सोडते आणि बाहेर टाकते. सकाळी रूग्णाला यातून मोकळे केले जाते आणि ताजे द्रावण उदरपोकळीत सोडले जाते, जे पुन्हा यंत्राला जोडण्याआधी बाहेर टाकले जाते.

CAPD पेक्षा CCPD चांगले आहे काय?
दोन्ही पध्दतीत पुरेसे डायलेसीस केले जाते. परंतु CCPD पध्दतीत दिवसा Exchanage केले जात नाही, त्यामुळे रूग्णाला जास्त स्वातंत्र्य मिळते. PET (Peritoneal Membrane Equilibriation Test) नावाची पेरीटोनियल आवरणाची जी तपासणी केली जाते तिच्या वैशिष्ट्यांवर CCPD पध्दत वापरणे अवलंबून असते.

एका आठवड्यासाठी किती लिटर पेरीटोनियल द्रावणाची आवश्यकता असते?
CAPD आणि CCPD या दोन्ही पध्दतींसाठी साधारण ५६ ते ६० लिटर द्रावण दर आठवड्याला आवश्यक असते.

हेमोडायलेसीस की पेरीटोनियल डायलेसीस कोणती पध्दत चांगली आहे?
आतापर्यंत यावर जो काही अभ्यास झाला आहे त्यात दोन्ही पध्दतींच्या यशाविषयी मतभेद आढळून आले. परंतु सातत्याने असे मत मांडले गेले आहे की, पहिल्या २-३ वर्षाच्या दरम्यान पेरीटोनियल डायलेसीसचा रूग्ण हेमोडायलेसीसच्या रूग्णापेक्षा चांगला राहतो. हेमोडायलेसीस करायचे की पेरीटोनियल डायलेसीस करायचे हे व्यक्तीवर ठरवले जाईल.

पेरीटोनियल डायलेसीसचे फायदे कोणते?
१) घरच्याघरी Exchange करण्याचे स्वातंत्र्य असते. रूग्णाला जास्त स्वातंत्र्य मिळते.
२) हेमोडायलेसीसमध्ये पाणी पिण्यावर जेवढे कडक निर्बंध असतात, तसे यात नसतात.
३) पोटॅशियम घेण्यावरही बंधन नसतात.

पेरीटोनियल डायलेसीससाठी कोणत्या प्रकारच्या रबरी नळ्या वापरल्या जातात?
जुनाट रोग्याच्या डायलेसीससाठी सामान्यपणे सीलीकॉन, रबर किंवा पॉलीयुरेथिन पासून बनविलेल्या रबरी नळ्या वापरल्या जातात. काही रबरी नळ्यांची नावे अशी - Tencdhoff, Toronto Western आणि Life Cat.

पेरीटोनियल डायलेसीसची नळी आत घालण्यासाठी कोणत्या प्रकारची भूल द्यावी?
बहुतेक करून स्थानिक भूल देऊन डायलेसीसची नळी आत घातली जाते. हे करताना Laproscope वापरून उदरपोकळीला नाभीजवळ छेद दिला जातो.

इतर वस्तूंपासून वेगळे केल्यानंतर किती काळाने Cathedra डायलेसीस साठी वापरता येतो?
साधारणपणे २ ते ३ आठवडे

पेरीटोनियल डायलेसीसमध्ये कोणती गुंतागुंत निर्माण होत?

  1. रबरी नळी सैल झाल्याने द्रावणाची गळती
  2. उदरपोकळीत सोडण्यात आणि बाहेर टाकण्यात डायलेसीस द्रावणाच्या प्रवाहात अडचणी येतात. बर्‍याच वेळा हे बध्दकोष्ठतेशी संबंधित असते आणी रेचक (सौम्य) दिल्यावर ही अडचन दूर होते.
  3. रबरी नळीचा संसर्ग (बाहेरच्या बाजूला संसर्ग) किंवा उदरपोकळी भोवतालच्या किंवा पचनसंस्थेभोवतालच्या आवरणाचा दाह (Peritonintis)

पेरीटोनियल डायलेसीस करणारा रूग्ण द्रावण काळपट असल्याची तक्रार करतात, हे काय सुचविते?
साधारणपणे पेरीटोनियल डायलेसीस द्रावण रंगहीन असतात. काळपट द्रावण आवरणाचा दाह असल्याचे दर्शविते. उदरपोकळीत वेदना होणे आणि द्रावणाचा रंग काळपट होणे हे दाह असल्याचे स्पष्ट करते, आणी हा रंगातील बदल रूग्णाच्या सहजपणे लक्षात येतो. अशावेळी मूत्रपिंड तज्ञ किंवा नर्सला जे रूग्णाची काळजी घेतात, त्यांना याचे माहिती देणे अतिशय महत्वाचे आहे. पेरीटोनियल डायलेसीसमध्ये जे प्रतिबंधक औषधे दिली जातात, ती काही वेळा नसेतून दिली जातात.

पेरीटोनियल डायलेसीसमध्ये द्रावण बाहेर सोडण्याची क्रिया कशी नियंत्रित केली जाते?
डेक्ट्रॉस - द्राक्ष शर्करा असलेले पेरीटोनियल डायलेसीस द्रावण बदलेले जाते. या द्रावणाच्या (तीव्र- Concentrate) पिशव्या १.२५, २.५ आणि ४.५ च्या वजनात मिळतात. जास्त द्रावण जर शरीरबाहेर टाकले गेले तर कमी रक्तदाबाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि पेरीटोनियल डायलेसीसचे द्रावण बदलणे पण आवश्यक आहे.

Exchange ची क्रिया घडत असताना माझ्या उदरपोकळीत वेदना होतात. मी काय करावे?
पेरीटोनियल पोकळी प्रसरण पावल्यामुळे उदरपोकळीत वेदना होतात. यासाठी डायलेसीसचे द्रावण जे आत घालावयाचे आहे त्याच्या मापात थोडासा बदल केला पाहिजे.