Print
Hits: 7552

उच्च रक्तदाब म्हणजे काय?
जास्त प्रमाणात रक्तदाब वाढणे म्हणजे उच्च रक्तदाब

प्रौढांमध्ये रक्तदाबाची सहज पातळी किती असते?
Normal किंवा सहज पातळी म्हणजे हृदय स्नायूंच्या आकुंचनासंबंधीची पातळी जी १२० ते १३५ असते आणि हृदय स्नायूंच्या प्रसरणाविषयीची पातळी जी पायाच्या ८० ते ९० मिलीमीटर असते.

उच्चरक्तदाब किती सामान्य आहे?
सामान्यपणे लोकांमध्ये उच्चरक्तदाब दिसून येतो. वय इत्यादीवर उच्चरक्तदाबाची व्याख्या अवलंबून आहे किंवा त्यात बदल घडू शकतो. लोकसंख्येच्या ५ऽ उच्चरक्तदाब असू शकतो जो १४०/९० च्या वर असतो. साठ वर्षे वयाच्या वर यात ३५ऽ पर्यंत वाढ होते.

Essential उच्चरक्तदाब म्हणजे काय?
उच्चरक्तदाब याच इतर दुय्यम कारणांशी संबंध येत नाही, जसे अंतर्गत स्त्राव, औषधे किंवा मूत्रपिंडाच्या नलिकांशी संबंधित असलेल्या रक्तदाबाला Essential रक्तदाब म्हणतात.

उच्चरक्तदाब कसा विभागला जातो?
Joint Nationality Committee (JNC) विभागणीचा उपयोग साधारणपणे उच्चरक्तदाबाची तीव्रता पाहण्यासाठी केला जातो. प्रात्यक्षिकांसाठी याची विभागणी केली जाते. जसे सीमेजवळ, सौम्य, माफक प्रमाणात किंवा तीव्र.

White Coat उच्चरक्तदाब म्हणजे काय?
डॉक्टरांकडे जाण्याच्या भितीमुळे जेव्हा रक्तदाब वाढतो, तेव्हा त्याला White Coat उच्चरक्तदाब म्हणतात. हा पुन्हा पुन्हा वाढू शकतो.

रक्तदाबाच्या पातळीची तपासणी केली जात असताना कोणती सावधगिरी बाळगावी?
रूग्णाचा रक्तदाब तपासताना चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

 1. रूग्णाने ३ ते ५ मिनिटे आरामात खुर्चीवर बसले पाहिजे.
 2. योग्य आकाराच्या Cuff वापरला पाहिजे.
 3. हृदयस्नायूंचे आकुंचन आणि रक्तदाब पाहिला पाहिजे.
 4. ५ मिनिटांच्या अंतराने दोन किंवा जास्त वेळा तपासणी केली पाहिजे.

उच्चरक्तदाबाचा उपचार करणे महत्वाचे का आहे?
जर उच्चरक्तदाबावर उपचार केला नाही तर पुढील परिणाम होऊ शकतात.

 1. हृदयरोगाचा झटका येणे किंवा हृदय बंद पडणे.
 2. रक्तवाहिनीला इजा झाल्याने मेंदूला झालेली दुखापत
 3. मूत्रपिंडाची क्रिया बिघडू शकते.

उच्चरक्तदाबाची लक्षणे कोणती?

 1. एखादेवळेस रूग्ण लक्षणविरहित असतो.
 2. डोकेदुखी
 3. घशाचा दाह होण्याची लक्षणे दिसतात किंवा हृदयक्रिया बंद पडते.

तरीही फक्त अनुवंशिकता हेच उच्चरक्तदाबासाठीचे पुरेसे कारण ठरत नाही, तर वातावरणातील घटक देखील महत्वाचे ठरतात.

अन्य कोणते घटक महत्वाचे आहेत?

 1. लठ्‌ठपणा
 2. बैठे काम
 3. मद्य घेण्याचे जास्त प्रमाण
 4. मोठ्या प्रमाणात सोडीयम घेणे

मीठ घेण्याचे प्रमाण कमी केले तरी रक्तदाबावर काही परिणाम झाला नाही?
बर्‍याचशा रूग्णांमध्ये रक्तदाब तेवढा संवेदनशील नसतो, जो सोडियम घेतल्यावर त्याला विरोध करेल.

उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यानंतर इतर काही तपासण्या करणे आवश्यक आहे काय? जर उच्चरक्तदाब सौम्य असेल आणि आरोग्यासंबंधी हा एकच प्रश्न असेल तर मर्यादित तपासण्या पुरेशा आहेत. पण जर तीव्र स्वरूपाचा रक्तदाब असेल तर जास्त सखोल तपासण्यांची आवश्यकता आहे. मर्यादित तपासण्यांमध्ये कमीत कमी रक्तातील रसायन, रक्तपेशींना आलेख (Hemogram) छातीच्या क्ष-किरण चिकित्सा आणि विद्युतहृदलेख (ECG) इ. तपासण्या केल्या पाहिजेत.

उच्चरक्तदाबाच्या व्यवस्थापनात कोणती औषधे वापरली जातात?
या औषधांची विस्ताराने विभागली खालीलप्रमाणे

 1. मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणारी औषधे - उदा. Hydrochlorothiazide
 2. बीटा ब्लॉकर्स उदा. Propanolol, Metoprolol, Atenolol
 3. कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स - उदा. Diltazem, Nifedipine, Verapamil, Amlodipine, Felodipine
 4. ACE उदा. Lisinopril, Enalapril
 5. अल्फा ब्लॉकर्स - Prazosin

उच्चरक्तदाबाच्या औषधांचे अनुषंगिक परिणाम कोणते?
उच्चरक्तदाब कमी करण्याच्या सगळ्या औषधांमुळे जर रक्तदाब अतिशय कमी झाला तर रूग्ण चक्कर येणे, शक्तीहीनता जाणवणे इ. तक्रारी करतात. प्रत्येक औषधाचे वेगवेगळे अनुषंगिक परिणाम आहेत.

 1. बीटा ब्लॉकर्स - हृदयाचे स्पंदन कमी करतो, फुफ्फुसाचे आकुंचन, तीव्र उदासिनता, लैंगिक कार्यात बिघाड होणे, मध्यबिंदूपासून दूर असणार्‍या नलिकांचे रोग, Lipid Abnormalities
 2. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स - डोकेदुखी, Flushing, छातीत धडधडणे, पावलांवर सूज येणे, बध्दकोष्ठता इत्यादी.
 3. ACE Inhibitors - कफ, हायपरकॅनलेमिया, त्वचेवर पुरळ येणे, चव न समजणे
 4. मूत्रोत्सर्जनात उत्तेजन देणारी औषधे - शरीरातील पाणी कमी होणे, रक्तात साखरेचे प्रमाण वाढणे, Lipild मध्ये वाढ.

उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी कोणती औषधे प्रथम वापरावीत?
बरेचसे चिकित्सक रूग्णाची एकूण परिस्थिती पाहून, जसे हृदयाजवळील मज्जातंतूंचे जाळे, मूत्रपिंडाची स्थिती इ. औषधयोजना करतात. बीटा ब्लॉकर्स आणि मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणार्‍या औषधांचा वापर सामान्यपणे सुरूवातीला केला जातो. हे लक्षात ठेवले पाहिजे. ACE Inhibitors पण बर्‍याच वेळा प्रथम औषधोपचार योजन म्हणून वापरले जाते. कोणते औषध वापरायाचे याची निवड करणे साधारणपणे जो रूग्णावर उपचार करतो, त्या चिकित्सकावर अवलंबून असते.