Print
Hits: 6930

"माझी बायको मला सोडून गेली त्याचं कारण म्हणजे तिच्या श्रीमंती राहणीमानाला मी पुरा पडू शकलो नाही आणि मी तितका श्रीमंत होणं शक्यच नाही".
"च्यायला, केस किती जाताहेत माझं अर्ध टक्क्ल तर आताच पडलय. कोण बघणार आहे यापुढे माझ्याकडे?"
"माझ्या कामात इतकया चुका होतात बॉस केवळ माझी गरज म्हणून सहानुभूतीने मला सांभाळून घेतो मी काहीही करायला गेलं तरी चुकतय"
"घरातलं कुठलच काम मला जमत नाही. माझं लग्न आता अगदी मोडकळीला आलं आहे".

नैराश्याच्या गर्त्तेत अडकलेल्या माणसाचं बोलणं अगदी अशा प्रकारचं असतें वरवर पाहिलं तर त्यांच्या बोलण्यात सच्चाई असते पण प्रत्यक्षात मात्र, त्यांच्या विचार करण्याच्या पध्द्तीत बदल झालेला असतो. त्यांचे स्वत:बध्दलचे विचार बदलत असतात. वाटण्यात, वागण्याबोलण्यात आणि विचारात बदल होण ही नैराश्याच्या विकारात तीन महत्वाची लक्षणं आहेत. कदाचित हे बदल ह्ळूह्ळू होत असतात. पण एवढं मात्र नक्‍की नैराश्याच्या गर्तेत सापडण्यापूर्वीचा माणूस आणि सापडलेला माणूस यांच्या भावना - विचार - वर्तन वेगळं असतं.

कित्येकदा तर आधी माणूस जसा होता, त्याच्या अगदी विरूध्द टोकाचं त्याचं वागणं, विचार करणं, असतं त्याची अनेक उदाहरण मिळतात. एखाद्या यशस्वी उद्योजकाला वाटायला लागतं की तो दिवाळखोरीच्या उंबरठयावर आहे. आईला तिची स्वत:ची मुलं नकोशी होतात, खादाड माणसाला अन्न पाहिलं तरी मळमळतं आणि एखाद्या रोडसाईड रोमिओला मुलींचा कंटाळा यतो. निराश माणूस सुखाच्या दिशेने जाण्याऐवजी सुखकारक गोष्टींना टाळतो. स्वत:ची काळजी घ्यायच्या ऐवजी तो स्वत:ची उपेक्षा करतो. नीटनेटकेपणे रहावे, स्वच्छ कपडे घालावेत ही इच्छा सुध्दा रहात नाही. त्याची जगण्याची आहिम प्रेरणा सुध्दा आत्महत्येच्या विचारांनी ग्रासली जाते. यशस्वी होण्याची याच्या जिद्दीची जागा अलिप्तता आणि नकोसे वाटून माघारीने घेतली जाते.

नैराश्याचे सर्वात दृष्य लक्षणे म्हणजे, सतत असणारी दु:खाची भावना अतिशय झाकोळलेल वाटणं, एकाकीपणा आणि इतरांबाबत अगदी निष्प्रेमाची भावना. निराशाग्रस्त माणूस सकृतदर्शनी कोणतेच कारण नसताना रडतो किंवा त्याला रडू येतं आणि ज्यावेळी त्याने खरोखर रडणे गरजेचे असते तेव्हा त्याच्या डोळ्यात टिपूससुध्दा नसते. त्याला झोप नीट लागत नाही किंवा वेळीअवेळी जाग येते. जाग आल्यावर परत झोप लागतच नाही.उलटपक्षी काहीजणांना सतत थकवा जाणवतो आणि सतत ते पलंगावर आडवे असतात. काही जणांची भूक मंदावते अन वजन घटतं तर काहीजणांची भूक वाढून जाडेपणा वाढतो.

कोणताही निराश माणूस स्व:कडे फार नकरात्म्क दृष्टीने पाहतो. त्याला वाटतं आपण अगदी असहाय आहोत, एकाकी आहोत. स्वत:तील दोष आणि कमतरतांबध्दल स्वत:लाच जबाबदार ठरतात. स्वर:बध्दल परिस्थितीबध्दल जगाबध्दल आणि भविष्याबध्दल त्यांचा निराशाग्रस्त दृष्टीकोन आढळतो. त्याच्या आसपास जे काही घडतय त्याच्याशी काही देण-घेणं नसतं. पूर्वी ज्या गोष्टीत त्याला भरपूर आंनद मिळायचा, त्या गोष्टींपासून आता त्याला आनंद मिळेनासा होतो. त्याला त्याचे स्वत:ला निर्णय घेता येत नाहीत आणि/किंवा जे पूर्वी निर्णय घेतले त्या निर्णयाला धरून वागता येत नाही.

काहीजण, नेहमी आढळून येणारी खिन्नता, उपहासाची भावना न जाणवताच नैराश्याने ग्रस्त असतात. त्यांना शारीरिक वेदना/त्रास होतात किंवा मद्यापि होतात किंवा अंमली पदार्थांचे व्यसनाधीन होतात. जेव्हा एखादा माणूस काम करीत असताना बऱ्याचदा खूप कंटाळलेला थकलेला दिसतो, तो पण निराशाग्रस्त असतो. अत्यंत हुषार मुलाला परीक्षेत अगदी कमी मार्क मिळाले, हा सुध्दा नैराश्याचाच एक प्रकार आहे. आता असा पुरावा मिळाला आहे की अवखळ आणि चंचल मुलांच्या वागणूकीच्या मुळाशी सुध्दा डिप्रेशन असतं.

डिप्रेस्ड्‌ माणसांना सामान्यत: असंच वाटत राह्तं. मी आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या गोष्टीला वंचित झालोय. वस्तुस्थिती मात्र तशी नसते. निराशाग्रस्त माणसाची धारणा असते की तो एक पराभूत माणूस आहे आणि कायमचा पराभव राहणार आहे. आणि म्हणून तो अगदी क्षुद्र, कुचकामी आहे इतकच काय जगायला सुध्दा नालायक आहे या स्थितीत तो आत्महत्येचा प्रयत्‍न सुध्दा करू शकतो. अलिकडेच अमेरिकेतील नॅशनल इन्स्टीटूट ऑफ मेंटल हेल्थ पुरस्कृत, १० वर्षांच्या संशोधन प्रकल्पाने, डिप्रेस्ड लोकात, सातत्याने आढळणारी खिन्‍नतेच्या भावना टिकून राहण्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकला आहे. संशोधकांनी असे म्हणले आहे की सर्व निराशाग्रस्त माणसे अनेक घटनांचा चुकीचा अर्थ लावतात. त्यांच्या आसपास जे काही घडत आहे त्याबध्दल तो जसा विचार करतो तसं त्याला वाटत असतं.

दुसया शब्दात सांगायचं झालं तर, डिप्रेस्ड माणसाला खिन्न आणि एकाकी वाटतं कारण तो असा चुकीचा विचार करतो की तो, अपुरा आणि (लोकांनी) त्याज्य ठरविलेला माणूस आहे. म्हणून, निराशाग्रस्त रूग्णाच्या डिप्रेस्ड मूडवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी, त्याच्या चुकीच्या विचारसरणीत बदल करण्यावर भर दिला तर त्याला अधिक मदत होवू शकते. आमच्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की डिप्रेस्ड माणसं स्वत:बद्दलचं कलुषित मत असताना सुध्दा, अतिशय अवघड कामं, सामान्य माणसांप्रमाणे करतात. एका अभ्यासात आम्ही डिप्रेस्ड व्यक्तिंना, वाचन, समजावून घेणे आणि अभिव्यक्ती यांचा अवघड होत जाणाया चाचण्या घेतात आल्या. जसजसे पेशंटना या चाचण्यात यश मिळायला लागले तस तसे ते अधिक अशावादी होवून लागले. त्यांचा मूड बदलला, त्यांची स्व-प्रतिमा उंचावली. अजून एक रंजक गोष्ट म्हणजे त्यापेक्षा अवघड चाचण्यात ते अधिक यशस्वी झाले

या संशोधनाच्या निष्कर्षांवर आधारित डिप्रेश्यानच्या उपचारांसाठी मार्ग आखण्याची गरज आहे. ज्या मार्गात पेशंट स्वत:ला मदत करू शकेल. या संशोधनाच्यामुळे, मानासोपचारक आता, डिप्रेस्ड माणसं स्वत:शीच काय बोलतात-म्हणजेच विचार करतात. त्याबाबत अधिक लक्ष देतात. त्यांच्या असं लक्षात येतं आहे की डिप्रेस्ड माणसांच्या मनात सातत्याने त्रासदायक विचार असतात आणि प्रत्येक नकारात्मक विचाराने डिप्रेस्ड फिलींग्ज वाढतात. हे विचार अनेकदा वस्तुत: वास्तविकतेवर आधारीत नसतात किंवा अनेकदा त्यांना असं वाईट/नकारात्मक वाटत त्याचं सबळ कारण आढळून येत नाही. हे नकारात्मक विचार, त्याला ज्यात बरं वाटतं अशा काही गोष्टी करण्यापासून परावृत्त करतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर "आळशी" बेजबाबदार: अशी टीका ऐकण्याची पाळी येते आणि त्यामुळे ते अधिकच डिप्रेस्ड होतात.

ही चुकीची विचारासरणी समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. आपण सहज फिरायला चाललो आहोत आणि समोरून आपला मित्र येताना दिसतो. तो आपल्या जवळून आपल्याला ओलांडून जातो पण ओळख सुध्दा दाखवित नाही. आपल्याला वाईट वाटतं. आपल्याला आश्चर्य वाटतं, ह्या माणसानं असं तोंड का फिरवलं?

ही आपण आपल्या कॉमन मित्राशी ही घटना बोलतो. तो सांगतो, "अरे,तो इतका नादात होता की त्यानं तुला पहिलेच नाही’ आपलं सामान्यत: समाधान होतं आणि ही घटना आपण विसरून सुध्दा जातो. पण आपण जर डिप्रेस्ड असू तर आपली पक्की खात्री पटेल की आपल्या मित्रानं आपल्याला तोडून टाकलय आपण त्याला त्या घटने बध्दल विचारणारही नाही. आणि ती चूक वारंवार करतात. इतकंच काय, मैत्रीतल्या स्नेहाला/चेष्टेला सुध्दा ते तोंडून टाकण्याचं लेबल लावतात. प्रत्येक घटनेची काळी बाजूच त्यांच्या डोळ्यासमोर येते. आणि सांध तपासून सुध्दा बघत नाहीत की त्यांनी आपण लावलेला अर्थ चुकीचा आहे का बरोबर आहे?

जर एखादा निराशाग्रस्त असेल, तर त्याच्या वाईट भावनांची मुळे, चुकीच्या विचारात आढळतात. या चुकांचा संबंध माणूस स्व:बाबत कसा विचार करतो आणि सभोवताली घडणाऱ्या घटनांकडे ती व्यक्ती कसे पाहते, त्यांच्याशी असतो. असं असून सुध्दा, माणूस इतर प्रश्न सोडविण्याबाबत त्यांच कौशल्य आहे तसंच असतं अशा वेळी त्यानं वैज्ञानिकासारखा जर दृष्टीकोन ठेवला आणि कारणमीमांसा करण्याचे आपले कौशल्य आणि सारी बुध्दीमत्ता आपली विचारपध्दतीची छाननी करुन ते विचार वास्तविक आहेत का, सत्याला धरून आहेत का हे तपासून घ्यायला हवं. या मार्गानं कोणत्याही घटनेपासून, प्रथम दर्शनी अप्रिय भावनांपासून मुक्त होणं शक्य आहे.

कोणताही माणूस स्वत:ला अशा पध्दतीने मदत करू शकतो
१. आपल्या स्वत:च्या नकारात्मक विचारांना ओळखणे.
२. ते विचार दुरूस्त करून आणि त्या ऐवजी पर्यायी अधिक वास्तविक विचार करणे

नकारात्मक विचारांच्या तपासणीसाठी काही मुद्ये
या संशोधनाच्या निष्कर्षांवर आधारित डिप्रेशनच्या उपचारांसाठी मार्ग आखण्याची गरज आहे. ज्या मार्गात पेशंट स्वत:ला मदत करू शकेल.

जेव्हा केव्हा तुम्हाला थोडेफार दु:खी वाटेल, थोडसं थांबा मागे वळून पहा, आणि तुमच्या दु:खाला निमित्त मात्र ठरलेला आणि वाढवणारा विचार कोणता ते आठवण्याचा प्रयत्‍न करा. अलीकडे घडलेल्या घटनांबाबत, कदाचित ती प्रतिक्रिया असेल, कदाचित शेवटच्या तासातील घटनांच्या बाबतीत, कदाचित अगदी अलिकडे घडलेल्या काही मिनिटातील ती घटना असू शकते. किंवा कदाचित आठवणीतल्या साठवणीतील घटनांची ती प्रतिक्रीया असेल. त्या विचारात खालिलपैकी एक किंवा अनेक विचारसूत्रे असतात.
१. स्वत:बध्दल विपरित मत: अन्य कुणा, बुध्दीवान, यशस्वी, सक्षम, आकर्षक व्यक्तीशी तुलना केल्यामुळे हा विचार बळावतो.
"मी चिंटू इतके चांगले मार्क मिळवत नाही". "तिच्या सारखं मुलांना सांभाळणं मला मुळी जमतच नाही" माझ्यात जजमेंटच नाही. अशा प्रकारच्या स्वत:ला कमी लेखणाऱ्या विचारांच्या चक्रात राहतात.
२. स्वत:वरच टीका आणि स्वत:ला दोष देणं.
डिप्रेस्ड माणसाचे विचार त्यांनीच ठरविलेल्या, गृहित धरलेल्या स्वत:मधील कमतरतांच केंद्रीत असतात. त्याला स्वत:ला अपेक्षित होतं की एखादी गोष्ट तो चांगली करू शकला नाही किंवा इतरांना त्याच्यामुळे नुकसान पोहाचले, किंवा इतरांना वाईट शब्द उच्चारले गेले तर तो संपूर्णपणे स्वत:ला दोषी धरतो. जेव्हा परिस्थिती वाईट असते, तेव्हा हे सगळं माझ्यामुळेच, अशी त्याची विचारधारा असते. "माझी लायकीच नाही" आणि खरोखरच जर आयुष्यात चांगलं काहीतरी घडलं तरी वाटतं हे घडलं नां तो केवळ अपघात आहे। माझी लायकीच नाही। स्वत:बध्दलची प्रतिमा चांगली नसल्याचा हा परिणाम। त्यामुळे होतं काय माणूस स्वत:कडुन अवाजवी मागण्या करू लागतो. ‘मी दरवेळी चांगलं, बिनचूक काम करायलाच हवं’ असा दृष्टीकोन असतो.
३. घटनेचा नकारात्मक अर्थ लावणे.
साध्या सरळ गोष्टींचा नकारात्मक अर्थ जोडण्यामुळे नैराश्य वाढतं. कुणी काहीतरी त्या माणसाबध्दल जराशी टीका केली की तो कधी माझं चांगलं करणार" असाच अर्थ काढायचा. अगदी एखाद दिवशी रिक्षावाल्याला मोड देताना फाटकी पाच रूपायाची नोट दिली तर “मी असा फाटका दसतो म्हणूनच त्याने अशी नोट दिले” असा अर्थ होतो. अशा नकारात्मक अर्थ लावण्याने वास्तवापासून दूर जायला होतं.
४. भविष्याबध्दल नकारात्मक अपेक्षा
माणसांना वाटायला लागतं आताची जी परिस्थिती आहे ती बदलणारच नाही. सगळा अंधार आहे त्यामुळे प्रयत६न कशाला करायचा? पडे रहो

जबाबदाऱ्यांचं ओझं
डिप्रेस्ड माण्साला त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्यांचे प्रचंड ओझं वाटायला लागतं. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी कशा निभावणार असा त्याला प्रश्न पडतो. "इतकी काम आहेत की ती पुर्ण कशी करायची हेच समजत नाही" असंच ते सारखं बजावताना दिसतात. हा जो कामाच्या दडपणाचा गोंधळ असतो, त्यातून फारसे काहीच निष्पन्न होत नाही. अशा विचारांमुळे श्वास अपुरा पडल्याची डोकेदुखीचा त्रासही उद्‌भवतो.

अशा नकारात्मक विचारांचं करावं काय?
नकारात्मक विचार कधी ना कधी, प्रत्येकाच्या डोक्यात येतातच. पण माणसं हे विचार झटकून कामाला लागतात. पण नैराश्यग्रस्त माण्साच्या मनात हे विचार ठाण मांडून बसलेले असतात. त्याच्या प्रत्येक गोष्टीला हे विचार चिटकविण्याच काम तो सतत करत असतो.
असे विचार जर तो ओळखू शकला तर त्यात बदल घडणे शक्य आहे.
१. नकरात्मक विचारांनीं ’ऑटोमॅटीक’ होण्याची वृत्ती असते. काही कारण घडलं, निमित्त झालं म्हणून ते विचार येतात. असं नाही तर ते अक्षरश: आपोआप येतात. ह्या विचारांच खरं कारण म्हणजे, त्याचं स्वत:ला कमी लेखण होय. तो स्वत:च्या क्षमतेपेक्षा खूपच कमी समजतो.
२. ह्या विचारांचा काहीही उपयोग नसतो. आणि ते अतर्क्य गोष्टीवर आधारीत असतात. माणसाच्या उध्दिष्टांच्या ते आड येतात. त्यात उडया मारायची वृत्ती असते. ते धाडकन निष्कर्षापर्यंत जाउन पोहोचतात.
३. ते चुकीचे विचार असले तरी त्या क्षणी बरोबर वाटतात पण ते वास्तवाला धरुन नसतात.
४. ह्या विचारांशी सातत्याने हेच योग्य विचार अस वाटायला लागतं. अशा विचारांच्या भोवऱ्यात माणूस अडकला तर प्रत्येक गोष्टीचा विपरीत अर्थ काढण्याची त्याला सवयच लागते आणि मग सगळं काही नकोसेच वाटायला लागेल. माणूस आपल्या विचारांना ओळखू शकतो. ते विचार का चुकीचे आहेत ते तपासू शकतो आणि ते का चुकिचे आहेत ते ही समजावून घेऊ शकता.

आता पुढे दिलेल्या गोष्टी हे विचार तपासायला उपयोगी पडतील.

माणूस आपल्या विचारा‍ंना ओळखू शकतो. ते विचार का चुकीचे आहेत ते तपासू शकतो आणि ते का चुकीचे आहेत तेही समजावून घेवू शकतो.

माणसं बयाचदा टोकाचीच भूमिका घेतात. खाईन तर तूपाशी नाहीतर राहिन उपाशी अशी भूमिका असते. एखाद्या वेळी घरात एखादी गोष्ट सापडली नाही तर ते म्हणतात’ "आयुष्यात कधीच काही वेळेवर सापडत नाही" किंवा एखाद्याला काविळीची शंका आहे म्हणून रक्त, लघवी तपासायला सांगितलं की त्याला सगळं जग पिवळं दिसायलाच सुरूवात होते.

सार्वत्रिकरण आणि लेबल लावणं
"मी कोणालाच आवडत नाही नेहमी चुक माझीच असते’ माझ्यात कधीच सुधारणा होणार नाही" माझं नशीबच फुटकं अशी जनरल वाक्य वारंवार बोलली जातात.

चांगलं काही न दिसणं.
त्यांच्या आयुष्यात चांगलं काही घडलं तर त्यांना तो ऍक्सिडेंट वाटतो. "आज चुकून माझं काम वेळेवर पूर्ण झालं पण हा अपवाद आहे- आणि तोच सिध्द करतो की माझं काम वेळेवर होत नाही हा नियम आहे.

यातून बाहेर कसं पडायचं?
फक्त आजच्या दिवसाचा दिनक्रम आखणे प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासाचं वेळापत्रक बनवायचं कुठलाही तास रिकामा ठेवायचा नाही. आजच्या दिवसात करायच्या सगळ्या गोष्टींची यादी करायची सर्वात सोपी गोष्ट प्रथम करायची. त्यामुळे काम करू शकण्यावरचा विश्वास वाढतो.

काम संपलं की त्या समोर मत लिहायचे ही डायरी म्हणजे प्रगतीचा आलेखच आहे (नमुना पहा)

आजची कामे अपेक्षित वेळ नोंद
* सकाळी विचार तपासायला उपयोगी पडतील.
१. माणूस आपल्या विचारांना ओळखू शकतो. ते विचार का चुकीचे आहेत ते तपासू शकतो आणि ते का चुकीचे आहेत तेही समजावून घेवू शकतो.
२. समाधान आणि आनंद- दिवसभरात&#ी गाद्या आवरणे १५ मिनिटे केले १० मि
* लाईट बिल भरणे १ तास दीड तास लागला
* रेशन आणणे १ तास केले १५ मसू शकतो आणि ते का चुकीचे आहेत तेही समजावून घेवू शकतो.
२. समाधान आणि आनंद- दिवसभरात जे काही घडतं त्याला समाधान झालं का आनंद वाटला ते लिहायचे. प्रत्येक काम झाल्यावर त्यापुढे नोंद ठेवाय?निटात झाले
* बँकेत जाणे १ तास केले नाही आळस केला.

आता पुढे दिलेल्या गोष्टी हे विचार तपासायला उपयोगी पडतील.
१. माणूस आपल्या विचारांना ओळखू शकतो. ते विचार का चुकीचे आहेत ते तपा