Print
Hits: 15466

अनेक रुग्नामद्ये मधुमेह हा "छुपा शत्रु" असतो. यांचाच अर्थ असा की, अशा व्यकती मधे कोणतीही लक्षणे दिसुन येत नाहीत. इतर आजाराची तपांसणी करतांना किंवा Routine check-up मध्ये मधुमेह आढळुन येतो. अशी परीस्थीती Routine check-up या प्रकारात आढळते.

१. खुप तहान लागणे, वारंवार लघवी ला जावे लागणे, रात्री लघवी ला जावे लागणे.भुक जास्त लागुन देखील भुक न वाढने. किंबहुना वजन घटणे आणि अशक्त पणा जाणवणे.

२. निरनीराळ्या अवयवांची Infections ऊ.दा त्वचा (पुरळ, गळवे, खाज) मुत्रमार्ग (लघवीला जळ्जळ/आग,लघवीच्या जागी खाज येणे,जागी लाल होणे),श्व्सनमार्ग व फुफुसे (सायनस चे वीकार व टी.बी)ईत्यादी.

३. मधुमेहाचा इतर अवंयवावर झालेला परीणाम पुढील लक्षणानी समजतो. कमजोर नजर /अंधत्व,मुत्रपिंड नीकामी झाल्यामुळे होणारी विवीध लक्षणे इत्यादी.

४. या खेरीज मधुमेही नां अर्थागवायुचा झ्टका, ह्र्दयवीकाराचा झटका या रोगाची शक्यता आधिक असते.

५. स्त्रीयांचा बाबतीत गर्भपात, अर्भकाचा गर्भाशयातच म्रुत्यु, मुलांमधे विर्क्रुती. ईत्यादी बाबींनी मधुमेह आपंली विक्रुती दाखवतो व त्याचेंच अस्तित्व तो दाखवतो.अशा स्त्री च्याया मुलांचे वजन पण जास्त असते.

६. FCPD या मधुमेह विशेष प्रकारात पोटात दुखणे, शौचाला जास्त प्रमाणात व तेलकंट होणे. आणि अन्नघटकांचे पचन व शोषण अपुर्ण राहिल्यामुळॆ होणारी लक्षणे दिसुन येतात. स्वा:दुंपींडात तयार होणारी पाचक द्रव्ये कमी झाल्याने अशा रुग्नांची पचंन शक्ती मंदावलेली असते.

मधुमेहांचे निदान कसे होते?
मधुमेहाची तिव्रता जास्त असल्यास वजन घटणे, तहान लागणे, लघवीला जास्त प्रमाणात होणे इ वर उल्लेख केलेली लक्षणे रुग्णांमध्ये दिसुन येतातच. अशा वेळी रुग्णामध्ये रिकाम्या पोटी तपासलेली रक्तातील पातळी [Fastomg plasma Glucose] १४० मी.ग्र्रम पेक्शा जास्त असेल तर किंवा दिवसाच्या इतर कोणत्याही वेळी तपासलेली रक्तातील ग्लुकोज ची पातळी [Ramdom plasma Glucose] २०० अ मी. ग्रँ पेक्षा जास्त असेल तर मधुमेहाचे निदान नक्की होते.परंतु सोम्य मधुमेहात fasting glouse ची पातळी सहसा वांढलेली नसते. व Random Glocose देखिल निश्चित माहीती देवु शकत नाही. अशा वेळी Glucose Tolerance test G.T.T. करुन मधुमेहाचे निदान केले जाते.

अशा सोम्य मधुमेहात लघवीची तपासणी केले जाते. अशा सोम्य मधुमेहात लघवीची तपासणी केल्यास ग्लुकोज आडळत नाही.मात्र नीरोगी व्यक्तीमधे मात्र क्व्चित प्रसंगी मधुमेहाचे प्रमाण आढळते. त्यामुळे मधुमेह आहे कींवा नाही ठरवणे योग्य नाही. या बद्दल तद्याचे एकमत आहे.

मधुमेहावरील उपाय योजना
मधुमेह हा रोग पुर्णपणे बरा होणे शक्य नसते.तेव्हा cure घेणे हेच चांगले. पण योग्य त्या उपचारांनी मधुमेहावर योग्य ते नियंत्रण शक्य असते. तेव्हा मधुमेहाचे नियंत्रण हे मधुमेहाची Complications खूप अंशी टाळता येते हे आता सिध्द झाले आहे.

आणि या वरिल उपचारात सातत्य राखणे हे फार महत्वाचे आहे.

तेव्हा सातत्य पुर्ण उपचार ही या आजारांची गुरुकेल्ली आहे.