Print
Hits: 11592

व्यायाम व आहाराने मधुमेहावर नियंत्रण
मधुमेह व Hypertension ह्या आयुष्यभराच्या व्याधी आहेत आहार नियत्रंणा बरोबर औषधांच्या वापराबद्दल सुध्दा त्या दिशानिर्देश करतात त्यामुळे व्याधींची जाणीव दिवसभर राहाते. म्हणुन फक्त आहार व व्यायामाच्या आचरणाने या दोन्ही व्याधींवर परिणामकारकपणे नियंत्रण ठेवता येते हे समजण्यावर आर्श्चयच वाटते गोळ्यांच्या त्रासातुन मुक्तता!

अशा व्याधींनी ग्रस्त रुग्ण जेव्हा डॉ. राजीव शारंगपाणी यांचेकडे येतात तेव्हा ते त्यांच्यावर उपचार करतात. बहुतेक रुग्ण जेंव्हा पारंपारिक औषध योजना निरुपयोगी ठरते व त्यांचा प्रक्रुतीत अधिकाअधिक बिघाड होतो. तेव्हा त्यांच्याकडे येतात काही प्रमाणात रोगापासुन आरम मिळण्यासाठीची धडपड व आशा यासाठी अंतिम उपाय म्हणुन या अपारंपारिक उपायांकडे ते वळतात जेव्हा त्यांचा फायदा होतो तेव्हा ते आर्श्चयचकित होतात क्रिडा उपचारांचा पाठपुरावा करण्यासाठी व त्यांचा अनेकांवर वापर करण्यासाठी या माणसाने कर्करोग शल्यचिकित्सेस सोडचिठ्ठी दिली त्याचे रुग्ण मात्र त्यामुळे सुधारले आहेत.

४० वर्षाचे ज्योतिकुमार कुलकर्णी जे लठ्ठ्पणा व मधुमेहाचे रुग्ण आहेत म्हणतात "मला प्रकार II चा Diabetes Mellitus आहे व डॉक्टरांनी मला वजन घटविणे गोड पदार्थ टाळणे Gilbencamide च्या चार गोळ्या नियमितपणे घेण्याचा सल्ला दिला होता. मला थकल्या सारखे होत असे व कोणत्याही प्रकारचा उत्साह नसे तसेच माझी रक्तशर्करा ३५८ ml/dl एवढी जास्त असे. कुलकर्णीनी डॉक्टरांचा सल्ला दोन वर्षे काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही व त्यांच्या गोळ्याची मात्रा ९ पर्यंत वाढली शारंगपाणी यांच्या सल्ल्यावरुन कुलकर्णी यांनी आपले नाव चैतन्य हेल्थ क्लब मध्ये नोंदविले व दोन महिन्यात वजन ८ किलो घटविले एका वर्षात ते आपले वजन ९८ किलोपासुन ३० किलोने कमी करु शकले व त्यांच्या रक्तशर्करेचे प्रमाण उपाशीपोटी १०३ व ११० ml/dl झाले त्यांच्या औषधांच्या मात्रेत सुध्दा साखरेच्या प्रमाणानुसार कमी झाले आनंदी दिसणारे कुलकर्णी म्हणतात गेल्या सहा महिन्यात मी कोणत्याही प्रकारची औषधयोजना केलेली नाही.

४४ वर्षाचे फ़रांदे डी एल यांची सुध्दा यांची सुध्दा अशीच कथा आहे व्यवसायाने उद्योजक असणारे फ़रांदे यांचे जीवन मधुमेहाने गेली दहा वर्षे निरस झाले होते. आहार नियंत्रणाबरोबर ते रोज ५ गोळ्या घेत असत ह्याचासुध्दा परिणाम होत नाही हे बघुन डॉक्टरांनी Insulin घेण्याचा सल्ला दिला "तेव्हा काहीतरी पर्यायाची मला आवश्यकता आहे हे माझ्या लक्षात आले" फरांदे म्हणतात त्यांनी सारंगपाणी यांना भेट दिली दोन महिन्यानंतर त्यांची रक्तशर्करा १८४ ml/dl वरुन ६४ mg/dl झाली त्यांच्या गोळ्यांची संख्या सुध्दा दोन इतकी खाली आली व आणखी एक महिन्यात त्यांची औषधापासुन मुक्तता होऊ शकेल.

हे कसे होऊ शकते? शारंगपाणी म्हणतात मी माझ्या रुग्णांना आहारावर काटेकोर नियंत्रण ठेवावयास सांगतो. या सामाजिक व्याधी असुन औषधांशिवाय नियंत्रत ठेवता येतात त्यांच्या रुग्णांना रात्रीचे जेवण सोडण्यास सांगितले जाते. कारण आपल्या शरीराचे Metabolism असे आहे की रात्री १-०० वाजता ते किमान असते तसेच Metabolism दिवसा उत्तम कार्य करते व असे लक्षात आले आहे समान अन्न दिवसा व रात्री सेवन केले कि संध्याकाळच्या अन्नाचे चरबीत रुपांतर होते. रुग्ण रात्रीचे जेवण घेत नसल्याने त्यांनी रात्रीचे औषध बंद केले पाहिजे कारण (Hypoglyaceamia) (Low Sugar Level) होण्याची शक्यता असते. रुग्णांनी दोन ते चार वेळा अर्ध्या तासासाठी Abdominal Breathing करणे आवश्यक आहे.

या आयुष्यभराच्या व्याधी हळुहळू मृत्यूकडे नेतात शरीरातील सर्व महत्वाच्या अवयवांना हृदय मूत्रपिंड डोळे व Peripheral रक्तवाहिन्या यांना धोका सर्वात जास्त असतो हे आहार आणि व्यायामाने उत्त्म प्रकारे नियंत्रणात ठेवता येते. शांरगपाणीना असे वाटते की आपण आपले शरीर अयोग्य प्रकारे वापरतो व आयोग्य अन्न खातो. म्हणुन या सर्व अडचणी येतात. चालणे किंवा Aerobics मुळे ही जादू होत नाही. वजन नियंत्रणामुळे स्नायुंचा आकार व ताकत आणि Enzyme Content वाढते प्रकार II च्या मधुमेहात रक्तात साखर आढळते कारण Pancreas ने निर्माण केलेले Insulin परिणामकारकता नष्ट झाल्याने स्नायुंकडुन वापरली जात नाही त्यामुळे साखर रक्तात आढळते. स्नायूंची क्षमता वाढविणे ही रक्तातुन साखर बाहेर ठेवण्याचा मार्ग आहे रुग्णाची क्षमता व वजन याला अनुरुप शरिरातील सर्व स्नायुंना व्यायाम दिला जातो.

डॉ. अभय मुथा मधुमेह तज्ञ यांच्या सारख्या साशंक लोकांना वाटते की व्यायाम नक्कीच महत्वाचे कार्य करतो. तरी दीर्घकाळच्या रुग्णांना औषधाची आवश्यकता असते. तरी रुग्णांना स्वतःला सध्याच्या सामान्य जीवनाबद्दल आनंद होतो.

मधुमेह हा तणावांशी संबंधित आहे. म्हणुन या पध्दतीत काहीतरी असु शकते डॉ. व्ही एन अन्नछ्त्रे ज्यांनी पूर्वी फरांदे यांना उपचार दिले आहेत म्हणतात परंतु त्यांना हे पूर्णपणे थांबले आहे याबद्दल पूर्णपणे खात्री नाही.

फरांदे म्हणतात मला आयुष्यभर आहार नियंत्रण करावे लागते परंतु यात मला आवडणाऱ्या गोष्टी उदा. गोड पदार्थ मी कधीतरी खाऊ शकतो ते व इतर ४० रुग्णांना आपले आयुष्य निदान औषधापासुन मुक्त झाले याचा आनंद आहे. त्याचा दिनक्रम अशाप्रकारे त्यांच्या आयुष्याचा भाग बनला आहे की व्यायाम केला नाहीतर काहीतरी चुकल्यासारखे त्यांना वाटते. श्री कुकरी आपल्या उद्दोगात व्यस्त असल्याने दोन महिने व्यायाम करु शकले नाहीत म्हणाले मला काळजी होती की माझी रक्तशर्करा व रक्तदाब वाढला असेल परंतु मला आश्चर्य वाटते की तसे घडले नव्हते माझा दैनंदिन व्यायाम चुकला तर मला कसे तरी वाटते. अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे तंत्र हे योग्य दिशा दर्शक असण्याची शक्यता आहे. वैद्यकिय कम्युनिटींनी एकत्र बसुन याच्यावर विचार करणे आवश्यक आहे.

डॉ. राजीव शारंगपाणी यांच्याशी +९१२० ६१३४४७५ या क्रमांकावर किंवा ४४५०६४५ (दवाखाना) संपर्क साधता येईल.