Print
Hits: 7002

मधुमेहाचे २ प्रकार आहेत. काहीनां तो बालपणीच होतो. तर काहींना प्रोढ्पणी. मधुमेहीना व्यायामाने फक्त लाभच होतो.

बालपणीचा मधुमेह: (डायबीटीस इन्स्निपिडस) याला विशेष काळजी ग्यावी लागते. यात व्यायामाचा परीणाम हा इन्सुलीन सारखा होत असल्याने यातिल कमी जास्त चा फरक हा डाँक्टरी सल्याने करावा. आणि काळजी खुप महत्वाची.

१. व्यायाम करताना आणि लगेच नंतर, गरगरणे, चक्कर येणे, भुक लागणे किंवा थकवा होत असेल तर डाँकटरांना सांगावे.

२. व्यायामाला सुरुवात करताना व नंतर शर्करा तपासावी.

३ जलद पचणारे पिष्ट्मय पदार्थ खावेत. फळांचे रस, बिस्किट.

४. इन्सुलीन चा परीणाम जेव्हा सर्वात जास्त असेल त्यावेळी व्यायाम करु नये.

५. शरीरात टोचलेल्या ईन्सुलीनच प्रमाण सारखे रहावं म्हणुन व्यायाम करतांना उपयोगात न येणाऱ्या स्वा:युत इस्न्सुलीन टोचावे. (पोटातील स्नायु)

६. व्यायाम करतांना स्वच्छ मोजे आणि शूज घालून पावलांना पुरेसा आधार मिळेल अशा तर्र्हेनं व्यायाम करावा आणि नंतर आंघोळ करावी किवा पाय स्वच्छ धुवावेत. डायबिटिक रेटिनोपॅथी असणार्र्या मधुमेह्यांनि उड्या मारणं, पळणं यासारखे व्यायाम करु नयेत, कारणं त्यांच्यामुळे डोळ्या भोवतीचा दाब वाढतो.

७. मधुमेहीनी आठव्ड्यातुन ५ ते ७ दिवस व्यायाम करावा.