Print
Hits: 11647

पायांची नीगा राखणे गरजेचे आहे का?

मधुमेह आणि पायांचा संबध हा विविध कारणानी होतो हे सर्व सामान्य आहे.,त्याची कारणे अशी आहेत.

जर पायांच्या योग्य नीगा राखली नाही तर तर काय होणे शक्य आहे?

जुने व्रण वा उघडे फोड काळे पडणे.एखाद्या अवयंवाची स्थांनीक निर्जीवता निर्माण होणे.(गँगारीन) .उदाहरणार्थ अंगठे किंवा पुर्ण पाय ज्याला दिर्घ काळ ईस्पितळात औषधोपचार अथवा शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते.पांयाची योग्य नीगा न राखल्यास कायमचे अपंगत्व येऊ शकते.

पांयाची नीगा राखायला काय काळजी घ्यावी?

पायांबद्दल आम्हाला माहीती कळवावी?

खालील पैकी एकही लक्षण दिसल्यास आम्हाला ताबडतोब कळवा.

पायांच्या जखमेवर प्रथमोपचार काय?

मधुमेह प्रकार २ (टाईप २) ची कारणे.

मधुमेह २ हा प्रकार जनुके,पर्यावरण, इन्सुलीनची अनियमीतता ( इन्सुलीनचा बीटा पैशीमधे कमी झालेला स्त्राव व इन्सुलीन्शी स्नायुपेशीमधील प्रतीकार) यक्रुतामधे ग्लुकोज्चे वाढलेले उत्पादन व चरबीचे वाढलेले विघटन या सर्वाच्या गुंतागुंतीच्या अन्योन्य प्रक्रियांमुळे होतो.

मधुमेही रुग्णाचा आहार कसा असावा?

पुर्वीच्या काळी मधुमेह म्हटला की भात, बटाटा इ. पिष्टमय पदार्थ वर्ज्य, पिष्टमय पदार्थमुळे रक्ततातील ग्लुकोज ची पातळी वाढते असा समज होता. आधुनीक संशोधनानुसार हा समज चुकीचा आहे हे सीध्द झाले आहे.त्यामुळे असे पदार्थ मधुमेह्च्या रुग्णाने खाले तरी हालतात. साखर, गुळ, फळाचे रस, पक्वाने इ. पदार्थ रक्तात त्वरीत शोषले गेल्यामुळे रक्तातील ग्लुकोज ची पातळी वाढते.म्हणुन वरील पदार्थ वर्ज करणे जरुरी असते. शिन्घ पदार्थ, तेल, तुप, लोणी, चीज चे जास्त सेवन केल्यानेर रक्त वाहीन्याचे वीकार [Atherosclerosis] उतप्नन्न होतात. याकरीता मधुमेही रुग्नांच्या आहारात सिन्घ पदार्थ मर्यादीत असावेत. याशीवाय प्रथीने, जीवन्सत्वे आणि खनीजद्र्व्ये यांचा जरुरीप्रमाणे होणारा समावेश आहाराच्या दुष्टीने महत्वाचा आहे. मधुमेही व्य्क्तीने एकाच वेळी जास्त आहार घेण्यासाऎवजी, थोड्या थोड्या अंतराने अल्प प्रमाणात अन्नसेवन करावे. यामुळे मर्यादीत प्रमाणात शरीरात तयार होणारे ईन्सुलीन योग्य तऱ्हेने कार्य करु शकते.

आहाराची विभागणी सर्वसामान्य: चार भागात केली जाते. सकाळचे न्याहरी, दुपारचे जेवण, संद्याकाळचा चहा व नाश्ता आणि रात्रिचे जेवण. या सर्वाच्या वेळा सातत्याने पाळणे इष्ट ठरते.आहाराची वेळ टळुन गेल्यास रक्तातातील ग्लुकोज कमी होण्याचा धोका [Hypoglycemia] संभवतो. इन्सुलीन चे इंन्जेक्शन घेणाऱ्या रुग्णाच्या बाबतीत इंन्जेक्शन आणि जेवण या दोन्ही वेळा पाळणे महत्वाचे असते.

मधुमेही व्यक्तीने व्यायाम घेणे हीतकारक आहे काय? असल्यास, व्यायाम कधी व कोणता घ्यावा?

व्यायामापासुन मधुमेही व्यक्तीना लाभ होतो, वजनंही कमी होते व, मधुमेहवरील नीयंत्रण सुधारते.चालण्याचा व्यायाम या रुग्णांच्या द्रुष्टीने सर्वांत सोयीक्सर. कोणताही व्यायाम सुरु करण्यापुर्वी डाँक्टरांचा सल्ला घेणे ईष्ट ठरेल. या रुग्णांनी व्यायाम कींवा मैदांनी खेळात भाग अवश्य घ्यावा. परंतु जर मधुमेह नीयंत्रणाखाली असेल तरच. व्यायामामुळे Hypoglycemia होउ नये यासाठी काहीतरी खाण्यांची खबरदारी घ्यावी लागते.

इन्सुलिन- १९२१ साली बँटिन्ग आणि बेस्ट यांनी ईन्सुलीन शोध लावुन मधुमेही रुग्णांना वरदान मीळाले आहे.

नेहमी वापरात असलेले ईस्नुलीन्चे प्रकार

१. प्लेन इन्सुलिन
२. लेन्टे इन्सुलिन
३. गद्य्क्त इन्सुलिन

प्लेन इन्सुलिन प्रभाव लौकर सुरु होऊन संपतो. त्यामुळे ते short acting insulin या प्रकारात मोडते.तर लेन्टे आणि NPH याचा प्रभाव थोड्या उशीराने सुरु होऊन जास्त काल टिकुन राहतो म्हणुन त्यांना Intermediate acting insulins असे म्हणतात. याहीपेक्षा जास्त वेळ प्रभाव राहणारी Long acting insulins वापरली जात नाही.

इन्सुलिन इन्जेक्शन मुळे काही वीपरीत / नको असलेले परीणाम होतात का?

इन्सुलिन इन्जेक्शन्मुळे सर्वांत महत्वाचा दुश्परीणाम म्हणजे हायपोग्लयसिमीया, म्हणजे रक्तातील गुल्कोज्चे प्रमाण वाजवी पेक्षा कमी होणे.

हायपोग्लयसिमीया लक्षणे

  1. खुप भुक लागल्या सारखी वाटणे.
  2. घाम येणे.
  3. छातीत धडधड होणे.
  4. हातांपायांना कंप सुटणे.
  5. चक्कर/अथवा गळुन गेल्यासारखे वाटणे.
  6. एकाच वस्तुच्या दोन प्रतीमा दीसणे.

याखेरीज मेंदुला ग्लुकोज्च पुरवठा न झाल्याने विचीत्र वर्तवणुक [Behaviour Abnormalities ], झतके येणे, बेशुध्दा अवस्था येणे ई. परीणाम होवु शकतात.

हायपोग्लयसिमीया झाल्यास काय कराल?

हायपोग्लयसिमीया ची लक्षणे दिसु लागताच, ताबडतोब काही तरी खाणे, खाद्य पदार्थ शक्यतो गोड असावा, साखर, गुळ, गोद पेये ई. पदार्थ आणि गोड पदार्थ नसेल तर पोळी, भाजी, ब्रेड हे पदार्थ सुद्दा उपयोगी पडतात.

मधुमेह म्हणजे काय?

मधुमेह म्हणजे रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण वाजवी पेक्षा जास्त असणे.

ग्लुकोज हे शरीरातील मुख्य इंधन असल्याने शकती परीणाम निर्माण करण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर होतो. शकती निर्मीती हि पैशीच्या आत होत असते.म्हणजेच ग्लुकोज हे नुसते रक्तामद्ये पेशीच्या बाहेर जास्त असुन काही फायदा होत नाही, ते पेशीच्या आत शिरावे लागते. ग्लुकोज पेशीच्या दरवाजा खुला करुन देण्याचे काम इन्सुलिन हे हार्मोन करते, अनि याच इन्सुलिन च्या कमतरते मुळे मधुमेह होतो. इन्सुलिन निर्मीती स्वादुंपिड [Pancreas] या पोटाच्या वरच्या भागात असलेल्या ग्रन्थींमध्ये होत असते. काही वेळा इन्सुलिन ची निर्मीती योग्य प्रमाणात होत असुन सुदधा त्याचा योग्य परीणाम होत नाही.अशा वेळी देखील मधुमेह होऊ शकतो. मधुमेहत इन्सुलिन चा परीणाम कमी झाल्याने ग्लुकोज पसुन परीणाम निर्माण होत नाही. त्या मुळे अशक्तपणा वाटतो.तसेच रकतातील ग्लुकोज ची प्रमाण वाढल्याने ते लघवी वाटे टाकले जाते, त्या मुळे इतर लक्षणे उत्तप्न्न होतात.

या दोंन प्रमुख कारणा खेरीज मधुमेहाचे इतर पन प्रकार आहेत. उदाहरणा स्वा:दुपिंड दाहाने होणारा मधुमेह [FCPD] गरोदर पणी दिसुन येणारा मधुमेह [Gestational Diabetes], इतर आजारावर संबधीत असलेला मधुमेह

मधुमेह अनुंवाशीक असतो काय?

याचे उत्तर अर्थात होय असेच आहे. ज्या व्य्क्तीनां मधुमेह आहे. अशानां मधुमेह होन्याची शकयता असते. मात्र अनुंवाशीकता बरोबर सभोवतलच्या वातावरणाचा प्रभाव सुद्धा [Environmental Influence] तेवढाच महत्वाचा असतो. उदा. काही Viral Infection चा संबंध IDDM उत्तन्न होण्याबरोबर जोडला गेला आहे. तर एखादी व्य्क्त्ती स्थुल अस्ल्यास तीला NIDDMहोण्याची शक्यता असते. आहारातील कमतरता आणि काही अपायकारक पदार्थ यांचा FCPD शी संबंध आहे, असे तद्याचे मत आहे.