"अंतिम विश्रांतीसाठी जेव्हा आपले डोळे बंद होतील, तेव्हा त्याच दोन डोळ्यांनी दोन अंध व्यक्ती हे सुंदर जग पाहू शकतील."
- नेत्रदान मरणोत्तर करावयाचे असते.
- नेत्रदान मृत्युनंतर ६ तासांच्या आत होणे आवश्यक असते.
नेत्रदान करावयाची इच्छा असल्यास?
- नेत्रपेढीत संपर्क साधून नेत्रदानाचा अर्ज भरावा.
- आपल्या कुटुंबियांना आपल्या मरणोत्तर नेत्रदानाच्या इच्छेबद्दल सांगून ठेवावे.
नेत्रदान इच्छाधारकाच्या मृत्युनंतर आप्तस्वकीयांनी काय करावे?
- स्वेच्छाधारकाच्या मृत्युपश्चात त्वरीत नेत्रपेढीशी संपर्क साधावा.
- डोळे झाकून ठेवावे व फॅन बंद ठेवावा.
समज गैरसमज
- नेत्रदान ५ वर्षे ते ९० वर्षापर्यत कुणीही करू शकते.
- नेत्रदान केल्याने चेहर्यावर विदुपता येत नाही.
- नेत्रदानाचा अर्ज भरला नसला तरीही नातेवाईक/ आप्त स्वकीय मृत व्यक्तीचे नेत्रदान करी शकतात.
- मोतीबिंदु, मधुमेह, रक्तदाब असे आजार असलेली व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात.
- नेत्रदानाच्या प्रक्रियेला फारच कमी वेळ लागतो. नेत्रपेढीला कळविल्यानंतर डॉक्टर त्वरीत येतात व नेत्रदानाची प्रक्रिया अगदी थोडया वेळात (१५-२० मिनिटांत) पूर्ण करतात.
- नेत्रदानासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही.