Print
Hits: 8445

श्वासात दुर्गंधी निर्माण होण्याची कारणे कोणती?

विशिष्ठ प्रकारचे अन्न, तोंडाची स्वच्छता न राखणे, हिरड्यांचे आजार, तोंडाला कोरड पडणे, तंबाखूचे पदार्थ किंवा वैद्यकीय तक्रारी इ. मुळे दुर्गंधी निर्माण होऊ शकते. जेव्हा तोंडाची योग्य स्वच्छता न राखल्याने किंवा हिरड्यांच्या रोगामुळे, किंवा जेव्हा कमी प्रमाणात लाळ सुटत असेल अशावेळी दातांमध्ये सूक्ष्मजीव एकत्र येतात आणि दुर्गंधी निर्माण होते. अन्नकण आणि सूक्ष्मजीव वाहून नेण्यासाठी लाळेची गरज असते. काही औषधे आणि तक्रारी यामुले तोंडाला कोरड पडते. काहीवेळा नाकाच्या पोकळीचा संसर्ग, श्वसनमार्गाचा संसर्ग यामुळे देखील दुर्गंधी निर्माण होते. जर ही दुर्गंधी कायम येत असेल तर तुमच्या दंतवैद्याशी संपर्क साधा. कारण या दुर्गंधीचे मूळ दातांमध्ये देखील असू शकते.

कवळी म्हणजे काय?

दात नसलेल्या जागी तो काढता येतो असा कृत्रिम दात बसविणे म्हणजे कवळी. ही कवळी Acrylic resin पासून बनविलेली असते. काहीवेळा ती वेगवेगळ्या धातूंच्या मिश्रणाने बनविली जाते. संपूर्ण कवळी सगळ्या दातांची जागा भरून काढते, तर काही वेळा एखाद्याच दातांची गरज असते. तेव्हा तेथे कृत्रिम दात बसविला जातो, त्यामुळे तो इतर दातांना स्थिती बदलू देत नाही. संपूर्ण कवळीमध्ये एक ‘पारंपारिक’ आणि दुसरी ‘तात्काळ’ असे प्रकार असतात. पहिल्या प्रकारची कवळी सगळे दात काढल्यानंतर साधारणपणे एका महिन्याने बसविली जाते तर दुसर्‍या प्रकारात दात काढल्यानंतर लगेच बसविली जाते. त्यामुळे दुसर्‍या प्रकारात जास्त गुंतागुंत असते कारण दात काढल्यानंतर जखम भरण्यास पुरेसा अवधी न देता कवळी बसविली जाते.

माझ्या कवळीची मी कशी सवय करून घेऊ?

कोणत्याही कृत्रिम अवयवासारखीच कवळी देखील सुरवातीला त्रासदायक भासते. कवळीमध्ये जास्त प्रमाणात लाळ सुटते किंवा बोलतांना गडबड होते. हे टाळण्यासाठी अन्नाचे लहान घास घ्यावेत, गरम अन्न घेणे टाळावे, तसेच कठीण पदार्थ खाऊ नयेत, जोपर्यंत हिरड्यांना, तेथील पेशींनी नवीन दातांची सवय होत नाही तो पर्यंत ही सावधानता बाळगावी. जसजसा वेळ जाईल तसतशी तुम्हांला कवळीची सवय होईल.

मी या कवळीला/ कृत्रिम दातांना खर्‍या दातांसारखा ब्रशने घासू शकतो काय?

नाही. शक्यतो प्रत्येक खाण्यानंतर कवळी स्वच्छ करावी. सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे कवळी काढून ती साफ करणे. एखाद्याला जर शक्य असेल तर कवळी घासण्याचा सल्ला दिला जातो तसेच तोंड देखील स्वच्छ ठेवले पाहिजे. जर काही नैसर्गिक दात शिल्लक असतील तर ते घासावेत. कवळी घासल्यानंतर ते रात्रभर त्यासाठी असणार्‍या घटकद्रवात बुडवून ठेवावी. रात्रभर कवळी काढून ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे, कारण त्यामुळे पेशीसमुहांवर आणि हाडावर जास्त दाब पडत नाही. रोज जीभ स्वच्छ करण्यास विसरू नये आणि नरम ब्रशने हिरड्या हाताने घासाव्यात. खास कवळ्यांसाठी बनविलेल्या ब्रशचा कवळी बनविलेल्या ब्रशचा कवळी घासण्यासाठी उपयोग करावा.


नवीन कवळी केव्हा बसवावी?

काही वर्षे गेल्यानंतर पेशी आणि हाडे काही प्रमाणात आकुंचन पावतात, तेव्हा कवळी सैल होते. तसेच एखाद्याचे वजन वाढले किंवा कमी झाले तरी कवळी सैल होते. जर दंतवैद्याने सल्ला दिला तर कवळी घट्‌ट करून घेता येते. पण कवळी जर खूप सैल झाली असेल तर नवीन बसवावी.

दात पांढरे करण्याच्या प्रक्रियेत काय वापरले जाते?

१० टक्के कार्बोमाईड पेरॉक्साईड, जे हैड्रोजन पेरॉक्साईड पेक्षा ३ टक्के सौम्य असते, त्याचा वापर केला जातो. ही सगळ्यात प्रसिध्द पध्दत आहे.

ही पध्दत माझ्या दातांसाठी हानिकारक आहे काय?

नाही. योग्य निदानानंतर जर योग्य पध्दत वापरली तर कोणताही अपाय होत नाही. यामुळे दातांवर काहीही वाईट परिणाम होत नाही.

दात पांढरे करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते?

कार्बोमाईड पेरॉक्साईड दातांच्या बाहेरील आवरणात आणि दाताच्या कठीण भागात ठेवले जाते. त्यामुळे दातांवर जो रंग चढलेला असता तो निघून जातो आणि त्याबरोबर दातांचा आतला रंग बदलतो.

माझे दात कितपत पांढरे होतील?

हे तुमच्या दातांचा रंग आणि उपचाराच्या कालावधीवर अवलंबून आहे. तुम्हाला साधारणपणे १३ रंगछटा बदलतांना दिसतील. काही लोकांचे सात दिवसात सात रंग बदलतात.

मी माझे दात पांढरे करू नयेत यासाठी काही कारणे आहेत काय?

होय. दातांमध्ये काही भरले असल्यास किंवा वरून काही आवरण लावले असल्यास त्यांचा रंग बदलत नाही. त्यामुळे आधी जर तुम्ही तुमच्या दातांवर अशा प्रकारे काही उपचार केले असतील तर हसतांना ते नजरेत भरतात, इतर दातांपेक्षा ते जास्त गडद दिसतात. म्हणून तुमचा दंतवैद्य तुम्हांला तपासून योग्य तो सल्ला देईल. दात पांढरे करण्याची प्रक्रिया पैशाच्या दृष्टीने आणि इतर काही धोका उद्‌भवणार्‍या दष्टीने योग्य आहे किंवा नाही ते सांगेल

याचे काही अनुषंगिक परिणाम आहेत काय?

होय. काही लोकांमध्ये उपचार घेत असतांना दातांची संवेदनाशीलता वाढल्याचे दिसून येते. हे लक्षण साधारणपणे सौम्य असते आणि उपचार पूर्ण झाल्यावर थांबते. तसेच तुम्हाला उपचार देणारे तुमच्या दातांना कमीत कमी त्रास व्हवा असाच ट्रे लावतील. संवेदनशीलता कमी व्हावी यासाठी देखील काही औषधे आहेत जी दात शुभ्र करण्याच्या प्रक्रियेत वापरली जातात. ज्या लोकांचे दात संवेदनाशील असण्याचा इतिहास आहे त्यांनी पोटॅशिअम नायट्रेट आणि फ्लोराईड असणारी टूथपेस्ट वापरावी.

शुभ्रता आणणार्‍या टूथपेस्ट मध्ये, व्यावसायिक शुभ्रता आणणार्‍या तंत्रासारखे तंत्र वापरले जाते काय?

नाही. दातांवर बाहेरच्या बाजूने जो रंग चढलेला असतो तो दूर करण्याचे प्राथमिक कार्य टूथपेस्ट करते. दात आतील बाजूने पांढरे करण्याचे कार्य या टूथपेस्ट करत नाहीत. व्यावसायिक शुभ्रता आणण्याचे तंत्राने दात शुभ्र केल्यानंतर त्यांची शुभ्रता टिकविणार्‍या पेस्टमध्ये पेरॉक्साईड असते. यासाठी तुमचा दंतवैद्य तुमच्यासाठी उत्तम फ्लुरॉईड असणारी पेस्ट आणि योग्य ब्रश शोधून देईल जे तुमच्या दाताची शुभ्रता राखतील.


मी माझ्या दातांचा रंग सौम्य कसा करू?

यासाठी वेगवेगळ्या प्रकाराच्या पध्दती आहेत. किंमतीने योग्य, सुरक्षित असे तंत्र म्हणजे दंतवैद्याकडे जाऊन त्याच्या दवाखान्यात दातांचा रंग सौम्य करून घेणे. तुमचा दंतवैद्य तुमच्यासाठी खास ट्रे बनवेल, तो तुमच्या तोंडात व्यवस्थित बसेल त्या मध्ये शुभ्रता आणणारे घटकद्रव्य घाला आणि रात्रभर किंवा काही तासांसाठी तो ट्रे दातांवर लावून ठेवा.

माझे दात पांढरे शुभ्र होण्यासाठी किती वेळ लागेल?

ते तुमच्या दातांच्या रंगावर अवलंबून आहे. काहीवेळा त्यासाठी फक्त ३ ते ५ दिवस पुरेसे आहेत तर काहीवेळा त्यासाठी काही आठवडे किंवा महिने लागतील. जास्त खराब न झालेल्या दातांसाठी सरासरी २ ते ६ आठवडे लागतात. निकोटीन किंवा टेट्रासायक्लीन सारख्या नशिल्या पदार्थांमुळे दातांवर जे कठीण चढते ते काढण्यासाठी २ ते ६ महिने लागतात.

ही शुभ्रता किती दिवस टिकते?

बहुतेक पध्दतीत शुभ्रता कायमची राहते, रंग बदलण्याचा कालावधी साधारणपणे १ ते ३ वर्षे असतो. त्यानंतर काहीवेळा शुभ्रता कमी होते, पण पुन्हा पूर्वीचा खराब रंग येत नाही. पुन्हा शुभ्रता आणण्यासाठी पुन्हा काही दिवस उपचार घ्यावे लागतात. काही दातांची शुभ्रता सात वर्षापर्यंत टिकून राहते.

मला दातांचे रोपण करावयाचे आहे. मला असे समजले आहे की रोपणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही कोणती पध्दत सुचवाल? मला विशिषत: Hydroxyapatite च्या आवरणाच्या दुष्परिणामांबद्दल विचारायचे आहे.

तुमची शंका बरोबर आहे, कारण HA hydroxyapatite आम्लता असणार्‍या परिस्थितीत विरघळेल. सच्छिद्र हाड असणार्‍या परिस्थितीत रोपण संपूर्ण हाडाने वेढलेले असेल. या परिस्थितीत HA पृष्ठभाग असणार्‍या पध्दतींचा फायदा होतो कारण सच्छिद्र हाडांमध्ये याचा जास्त उपयोग होतो. दुसरा पृष्ठभाग वापरला जातो तो म्हणजे TPS (Titasnia Plasnia Spray) याचा टणक पृष्ठभाग असण्याचे काही फायदे आहेत.

माझे वय ४२ आहे आणी गेल्या वीस वर्षापासून मी वरच्या बाजूला कवळी वापरतो आहे. वरच्या संपूर्ण भागात दातांचे रोपण करता येणे शक्य आहे काय? शक्य असल्यास त्यासाठी किती वेळ लागेल आणि त्या दरम्यान मला दातांशिवाय रहावे लागेल काय?

किती हाड शिल्लक आहे त्यावर रोपण अवलंबून आहे. त्यासाठी Panoronic रेडियोग्राफ काढणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही त्यामानाने तरूण आहात म्हणून तुम्हांला त्याचे फायदे देखील जास्त मिळतील. रोपण करण्याच्या दरम्यान तुम्हाला एक दिवस ते जास्तीत जास्त एक आठवडा दातांशिवाय राहावे. लागेल, जे तुमच्या शल्यचिकित्सकावर अवलंबून असेल. रोपणाची जखम भरून येण्यास ४-६ महिने लागतात.

रोपण केलेल्या दातांचे आयुष्य किती असते?

डॉ. ब्रानमार्क ने केलेले पहिले Ossep-integrated रोपण आजही व्यवस्थित कार्यरत आहे (त्याला ३२ वर्षे झाली आहेत). यात साधारणपणे दरवर्षी १mm इतकी हाडांची झीज होते हे गृहित धरले आहे. याप्रमाणे १२mm चे रोपण २० वर्षे टिकू शकते. पण हे अनुमान आधुनिक दंतवैद्यक शास्त्रात आणि हाडांच्या संदर्भात गृहित धरले जात नाही.

मी दंतरोपणावर काही लेख वाचले आणि यासाठी किती वयोमर्यादा असावी याचा विचार करीत होतो. जी व्यक्ति तंदुरूस्त आहे ती दंतरोपण करू शकते. यात शल्यचिकित्सेचा किंवा एखाद्या औषधाचा वापर न करण्यासारखी परिस्थिती काहीवेळा निर्माण होऊ शकते. यात अनियंत्रित मधुमेह आणि अवयव ज्यापासून बनला आहे त्या पदार्थाचा अति उपयोग यांचा सामावेश आहे दातांचे रोपण करण्याच्या खर्चाची तुलना पारंपारिक Three unit Bridge होऊ शकते. दातांच्या रोपणाच्या पध्दतीवर खर्च अवलंबून असतो, आणि तो साधारणपणे एका दातांसाठी १५ हजार ते २५ हजारापर्यंत असतो.

माझ्या चौदा वर्षांच्या मुलीला ती नऊ वर्षाची असल्यापासून समोरचे दात नाहीत. आता उपचार सुरू केल्यास ते खूप लवकर केल्यासारखे होइल काय?

हाडांची संपूर्ण वाढ झाल्यानंतरच रोपण करावे. त्यासाठी अस्थिरोग तज्ञाच्या मदतीने क्ष-किरण चिकित्सा करून वाढ झाली आहे की नाही ते तपासावे. अशा प्रकारची केस असेल तर उपचार सुरू करण्यास हरकत नाही.


कोणत्या प्रकारे दंतरोपण करता येते?

एका दातांचे रोपण करता येते.
अनेक दातांचे रोपण करता येते.
सगळ्या दातांचे रोपण करता येते.

दातांचे रोपण म्हणजे काय?

साधारणपणे टिटॅनियम पासून दाताची कृत्रिम मुळं तयार केली जातात जी रोपणासाठी वापरली जातात. यात शस्त्रक्रिया प्रकारची डिझाईन्स असतात तसे स्क्रू सिलेंडर्स किंवा बास्केटस्‌ दात नसलेल्या जागी शस्त्रक्रिया विज्ञानाच्या मदतीने दात बसविला जातो जो स्क्रू लावून घट्‌ट केला जातो.

दाताचा वरचा भाग रोपणात कसा घट्‌ट केला जातो?

रोपणाची शस्त्रक्रिया- यात रोपण घट्‌ट केले जाते आणी त्यात दात बसविला जातो. रोपण हे हाडाशी संबंधित असते. काहीवेळा उपचार पूर्ण होण्यास काही महिने लागतात. रोपण केल्यानंतर दाताचा वरचा भाग बसविण्यासाठी स्क्रू किंवा सिमेंटचा वापर केला जातो.

लहान मुलांचे दात कोणत्या कारणांनी किडतात?

साखर घातलेल्या किंवा असलेल्या द्रवपदार्थांशी लहान मुलांचा बराच काळ संबंध आल्याने दात किडतात. यात दूध, फळांचा रस, सोडा आणि इतर गोड पेयाचा समावेश होतो.

या द्रवपदार्थातील साखर बालकाच्या दाताभोवती आणि हिरड्यांभोवती साठते, त्यावर सूक्ष्मजीव पोसले जातात आणि ते कीड निर्माण करतात. ज्या ज्या वेळी तुमचे मूल साखर मिश्रित द्रवपदार्थ घेते त्या त्या वेळी त्याच्या दातावर आम्लतेच“ पाहिजे की, झोपेत निर्मिती कमी होते त्यामुळे द्रवपदार्थातील साखर साफ केली जात नाही आणि ती दातांभोवती जमते, जी नंतर दात किडण्यास कारणीभूत ठरते.

रात्रीच्या वेळी मुलांना साखरमिश्रित द्रवपदार्थ देणार्‍या पालकांनी आणि इतर काळजी वाहकांनाही विशिषत: लक्षात ठेवलणून कोणती सावधानता बाळगावी?

लहान मुलांना दात येण्यास सुरूवात झाल्यापासून ते किडण्याची सुरूवात झालेली असते, ही गोष्ट पालकांच्या उशिरा लक्षात येते, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. असे होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

दूध पाजल्यानंतर प्रत्येक वेळी मुलांचे दात आणि हिरड्या स्वच्छ कापडाने किंवा लहान ब्रशने स्वच्छ करावेत. तसेच पहिला दात आल्याबरोबर दात घासण्यास सुरूवात करावी.

सगळे दात आल्यानंतर म्हणजे वयाच्या २ किंवा २ १/२ व्या वर्षी Glossing सुरू होते. गोड द्रवपदार्थाची बाटली तोंडात धरून तुमच्या मुलास झोपू देऊ नये, ऐकत नसल्यास बाटलीत नुसते पाणी भरून द्यावे.

तुमच्या सामान्य पाणी पुरवठ्यात किडीशी सामना करू शकेल इतके फ्लुरॉईड नसेल तर तुमच्या दंतवैद्याकडे जाऊन तुमच्या बाळाला अजून फ्लुरॉईड ची आवश्यकता आहे काय ते तपासावे. बाळाच्या वयाच्या ६-१२ महिन्यादरम्यान दंतवैद्याकडून दात तपासून घेण्यास सुरूवात करावी.

बाळाचे दात किडणे कितपत गंभीर असते?

लहानपणीच दात किडल्यास भयंकर वेदना होतात, त्यामुळे काही खाणे अशक्य होते. खूप किडलेले दात इतरांना देखील संसर्ग पोहचवितात म्हणून ते काढून टाकावे लागतात. जर तुमच्या बाळाचे दात लवकर किडल्यामुळे काढून टाकावे लागेल तर त्याला पुढील प्रश्न निर्माण होतील.

खाण्याच्या सवयी
बोलतांना त्रास होणे
तुटके दात
कायमचे दात खराब होणे
पिवळे किंवा तपकिरी रंगाचे दात

तुमच्या बाळाचे दात किडू नयेत म्हणून काळजी घ्या आणि त्याला हसरे ठेवा.

दात कशामुळे किडतात?

चिकट अशा फिल्मने आपले दात झाकलेले असतात, त्याला प्लाक म्हणतात. या प्लाक मध्ये असणारे सूक्ष्मजीव आपण जे अन्न खातो त्यातील साखर आणि कार्बोहायड्रेटस्‌ वेगळे करतात आणि आम्ल निर्माण करतात जे दातांवरील आवरणास घातक ठरते. अशाप्रकारे नेहेमी आम्लाचा हल्ला झाल्यास दातांवरील आवरण निघून जाते आणि दातांमध्ये पोकळी निर्माण होते.

ब्रशने दात घासल्याने दातांवरील चिकटपणा निघून जातो आणि त्यामुळे आम्लतेचा दातांच्या आवरणावर जास्त परिणाम होत नाही. पण ब्रश सगळीकडे पोहचू शकत नाही. मागच्या दातांमध्ये जी खळगी आणि चीर असते ती ब्रशपेक्षा अरूंद असते त्यामुळे तो स्वच्छ होऊ शकत नाही आणि तेच दात किडण्याची जास्त शक्यता असते. लाळेमुळे तोंडातील अन्नकण साफ केले जातात, पण या खळग्यांमध्ये अडकलेले अन्नकण स्वच्छ होत नाहीत.

असे खळगे असलेल्या दातांमध्ये जास्त म्हणजे ६० टक्के पोकळी निर्माण होते, आणि पदार्थ चावून दळून काढणारे जे सहा दात असतात. यांना दोन मुळे असतात, त्यांना अशा प्रकारचे खळगे आणि चिरा असतात.


Sealant म्हणजे काय?

Sealant म्हणजे प्लॅस्टिकचे आवरण जे दातांमधील खळगे आणि चिरा भरून काढते, दातांचा चिकटपणापासून बचाव करते.

Sealant किती दिवस टिकते?

चावण्याची क्रिया करत असून देखील Sealant बरीच वर्ष टिकते, आवश्यक वाटल्यास पुन्हा लावावे आपल्याला Sealant जो भाग दिसतो त्याला खळगा आणि चिर असते आणि दात किडण्यापासून संरक्षण देतो.

Sealant कसे लावतात?

Sealant लावण्यासाठी सुईची किंवा ड्रिलिंगची गरज भासत नाही. दातांवरील चिकटपणा दूर करण्यासाठी दात स्वच्छ केले जातात आणि त्यावरील खळगे घासून खडबडीत केले जातात म्हणजे Sealant व्यवस्थित चिकटते. दात धुतला जातो, वाळवला जातो आणि नंतर त्यावर Sealant च्या थर दिला जातो आणि तो लाईटने वाळविला जातो.

Sealants चा कोणाला फायदा होतो?

दात येण्याची सुरूवात झाल्यापासून या खळग्यांमध्ये कीड निर्माण होण्याची शक्यता असते. मुलांचे जे कायमचे सहा दात येतात त्यासाठी Sealant वापरण्याची शिफारस केली आहे. यातील पहिला दात वयाच्या ५-१ वर्षादरम्यान येतो आणि दुसरा वयाच्या ११-१३ वर्षात येतो.

मोठ्या व्यक्तींनासुध्दा याचा फायदा होऊ शकतो. तोंड कोरडे पडण्याचा रोग असणार्‍या रूग्णांना किंवा फ्लुरॉईड नसलेल्या पाण्याचा वापर करणार्‍या लोकांमध्ये दात किडण्याचा धोका जास्त असतो, Sealant मुळे तो कमी होतो.

सावधानतेचे किंवा अटकाव करणारे दंतचिकित्सा शास्त्र म्हणजे काय?

मुलांसाठी सावधानतेच्या दंतचिकित्सा शास्त्रात पुढील बाबींचा समावेश होतो: