मी माझ्या दातांचा रंग सौम्य कसा करू?
यासाठी वेगवेगळ्या प्रकाराच्या पध्दती आहेत. किंमतीने योग्य, सुरक्षित असे तंत्र म्हणजे दंतवैद्याकडे जाऊन त्याच्या दवाखान्यात दातांचा रंग सौम्य करून घेणे. तुमचा दंतवैद्य तुमच्यासाठी खास ट्रे बनवेल, तो तुमच्या तोंडात व्यवस्थित बसेल त्या मध्ये शुभ्रता आणणारे घटकद्रव्य घाला आणि रात्रभर किंवा काही तासांसाठी तो ट्रे दातांवर लावून ठेवा.
माझे दात पांढरे शुभ्र होण्यासाठी किती वेळ लागेल?
ते तुमच्या दातांच्या रंगावर अवलंबून आहे. काहीवेळा त्यासाठी फक्त ३ ते ५ दिवस पुरेसे आहेत तर काहीवेळा त्यासाठी काही आठवडे किंवा महिने लागतील. जास्त खराब न झालेल्या दातांसाठी सरासरी २ ते ६ आठवडे लागतात. निकोटीन किंवा टेट्रासायक्लीन सारख्या नशिल्या पदार्थांमुळे दातांवर जे कठीण चढते ते काढण्यासाठी २ ते ६ महिने लागतात.
ही शुभ्रता किती दिवस टिकते?
बहुतेक पध्दतीत शुभ्रता कायमची राहते, रंग बदलण्याचा कालावधी साधारणपणे १ ते ३ वर्षे असतो. त्यानंतर काहीवेळा शुभ्रता कमी होते, पण पुन्हा पूर्वीचा खराब रंग येत नाही. पुन्हा शुभ्रता आणण्यासाठी पुन्हा काही दिवस उपचार घ्यावे लागतात. काही दातांची शुभ्रता सात वर्षापर्यंत टिकून राहते.
मला दातांचे रोपण करावयाचे आहे. मला असे समजले आहे की रोपणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही कोणती पध्दत सुचवाल? मला विशिषत: Hydroxyapatite च्या आवरणाच्या दुष्परिणामांबद्दल विचारायचे आहे.
तुमची शंका बरोबर आहे, कारण HA hydroxyapatite आम्लता असणार्या परिस्थितीत विरघळेल. सच्छिद्र हाड असणार्या परिस्थितीत रोपण संपूर्ण हाडाने वेढलेले असेल. या परिस्थितीत HA पृष्ठभाग असणार्या पध्दतींचा फायदा होतो कारण सच्छिद्र हाडांमध्ये याचा जास्त उपयोग होतो. दुसरा पृष्ठभाग वापरला जातो तो म्हणजे TPS (Titasnia Plasnia Spray) याचा टणक पृष्ठभाग असण्याचे काही फायदे आहेत.
माझे वय ४२ आहे आणी गेल्या वीस वर्षापासून मी वरच्या बाजूला कवळी वापरतो आहे. वरच्या संपूर्ण भागात दातांचे रोपण करता येणे शक्य आहे काय? शक्य असल्यास त्यासाठी किती वेळ लागेल आणि त्या दरम्यान मला दातांशिवाय रहावे लागेल काय?
किती हाड शिल्लक आहे त्यावर रोपण अवलंबून आहे. त्यासाठी Panoronic रेडियोग्राफ काढणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही त्यामानाने तरूण आहात म्हणून तुम्हांला त्याचे फायदे देखील जास्त मिळतील. रोपण करण्याच्या दरम्यान तुम्हाला एक दिवस ते जास्तीत जास्त एक आठवडा दातांशिवाय राहावे. लागेल, जे तुमच्या शल्यचिकित्सकावर अवलंबून असेल. रोपणाची जखम भरून येण्यास ४-६ महिने लागतात.
रोपण केलेल्या दातांचे आयुष्य किती असते?
डॉ. ब्रानमार्क ने केलेले पहिले Ossep-integrated रोपण आजही व्यवस्थित कार्यरत आहे (त्याला ३२ वर्षे झाली आहेत). यात साधारणपणे दरवर्षी १mm इतकी हाडांची झीज होते हे गृहित धरले आहे. याप्रमाणे १२mm चे रोपण २० वर्षे टिकू शकते. पण हे अनुमान आधुनिक दंतवैद्यक शास्त्रात आणि हाडांच्या संदर्भात गृहित धरले जात नाही.
मी दंतरोपणावर काही लेख वाचले आणि यासाठी किती वयोमर्यादा असावी याचा विचार करीत होतो. जी व्यक्ति तंदुरूस्त आहे ती दंतरोपण करू शकते. यात शल्यचिकित्सेचा किंवा एखाद्या औषधाचा वापर न करण्यासारखी परिस्थिती काहीवेळा निर्माण होऊ शकते. यात अनियंत्रित मधुमेह आणि अवयव ज्यापासून बनला आहे त्या पदार्थाचा अति उपयोग यांचा सामावेश आहे दातांचे रोपण करण्याच्या खर्चाची तुलना पारंपारिक Three unit Bridge होऊ शकते. दातांच्या रोपणाच्या पध्दतीवर खर्च अवलंबून असतो, आणि तो साधारणपणे एका दातांसाठी १५ हजार ते २५ हजारापर्यंत असतो.
माझ्या चौदा वर्षांच्या मुलीला ती नऊ वर्षाची असल्यापासून समोरचे दात नाहीत. आता उपचार सुरू केल्यास ते खूप लवकर केल्यासारखे होइल काय?
हाडांची संपूर्ण वाढ झाल्यानंतरच रोपण करावे. त्यासाठी अस्थिरोग तज्ञाच्या मदतीने क्ष-किरण चिकित्सा करून वाढ झाली आहे की नाही ते तपासावे. अशा प्रकारची केस असेल तर उपचार सुरू करण्यास हरकत नाही.