नवीन कवळी केव्हा बसवावी?
काही वर्षे गेल्यानंतर पेशी आणि हाडे काही प्रमाणात आकुंचन पावतात, तेव्हा कवळी सैल होते. तसेच एखाद्याचे वजन वाढले किंवा कमी झाले तरी कवळी सैल होते. जर दंतवैद्याने सल्ला दिला तर कवळी घट्ट करून घेता येते. पण कवळी जर खूप सैल झाली असेल तर नवीन बसवावी.
दात पांढरे करण्याच्या प्रक्रियेत काय वापरले जाते?
१० टक्के कार्बोमाईड पेरॉक्साईड, जे हैड्रोजन पेरॉक्साईड पेक्षा ३ टक्के सौम्य असते, त्याचा वापर केला जातो. ही सगळ्यात प्रसिध्द पध्दत आहे.
ही पध्दत माझ्या दातांसाठी हानिकारक आहे काय?
नाही. योग्य निदानानंतर जर योग्य पध्दत वापरली तर कोणताही अपाय होत नाही. यामुळे दातांवर काहीही वाईट परिणाम होत नाही.
दात पांढरे करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते?
कार्बोमाईड पेरॉक्साईड दातांच्या बाहेरील आवरणात आणि दाताच्या कठीण भागात ठेवले जाते. त्यामुळे दातांवर जो रंग चढलेला असता तो निघून जातो आणि त्याबरोबर दातांचा आतला रंग बदलतो.
माझे दात कितपत पांढरे होतील?
हे तुमच्या दातांचा रंग आणि उपचाराच्या कालावधीवर अवलंबून आहे. तुम्हाला साधारणपणे १३ रंगछटा बदलतांना दिसतील. काही लोकांचे सात दिवसात सात रंग बदलतात.
मी माझे दात पांढरे करू नयेत यासाठी काही कारणे आहेत काय?
होय. दातांमध्ये काही भरले असल्यास किंवा वरून काही आवरण लावले असल्यास त्यांचा रंग बदलत नाही. त्यामुळे आधी जर तुम्ही तुमच्या दातांवर अशा प्रकारे काही उपचार केले असतील तर हसतांना ते नजरेत भरतात, इतर दातांपेक्षा ते जास्त गडद दिसतात. म्हणून तुमचा दंतवैद्य तुम्हांला तपासून योग्य तो सल्ला देईल. दात पांढरे करण्याची प्रक्रिया पैशाच्या दृष्टीने आणि इतर काही धोका उद्भवणार्या दष्टीने योग्य आहे किंवा नाही ते सांगेल
याचे काही अनुषंगिक परिणाम आहेत काय?
होय. काही लोकांमध्ये उपचार घेत असतांना दातांची संवेदनाशीलता वाढल्याचे दिसून येते. हे लक्षण साधारणपणे सौम्य असते आणि उपचार पूर्ण झाल्यावर थांबते. तसेच तुम्हाला उपचार देणारे तुमच्या दातांना कमीत कमी त्रास व्हवा असाच ट्रे लावतील. संवेदनशीलता कमी व्हावी यासाठी देखील काही औषधे आहेत जी दात शुभ्र करण्याच्या प्रक्रियेत वापरली जातात. ज्या लोकांचे दात संवेदनाशील असण्याचा इतिहास आहे त्यांनी पोटॅशिअम नायट्रेट आणि फ्लोराईड असणारी टूथपेस्ट वापरावी.
शुभ्रता आणणार्या टूथपेस्ट मध्ये, व्यावसायिक शुभ्रता आणणार्या तंत्रासारखे तंत्र वापरले जाते काय?
नाही. दातांवर बाहेरच्या बाजूने जो रंग चढलेला असतो तो दूर करण्याचे प्राथमिक कार्य टूथपेस्ट करते. दात आतील बाजूने पांढरे करण्याचे कार्य या टूथपेस्ट करत नाहीत. व्यावसायिक शुभ्रता आणण्याचे तंत्राने दात शुभ्र केल्यानंतर त्यांची शुभ्रता टिकविणार्या पेस्टमध्ये पेरॉक्साईड असते. यासाठी तुमचा दंतवैद्य तुमच्यासाठी उत्तम फ्लुरॉईड असणारी पेस्ट आणि योग्य ब्रश शोधून देईल जे तुमच्या दाताची शुभ्रता राखतील.