Print
Hits: 13669
Herpes
नागिण

नागिण हा सर्वसामान्य वातावरणातील संसर्ग आहे. याचे कारण ओरल हरपीज किंवा जेनिटल हरपीज मुळे उद्भवतो. याचे दोन प्रकारचे संसर्ग असतात

हा संसर्ग सुक्ष्मदर्शीतून एकसमान दिसतो आणि ह्याचा तोंड व जननेंद्रियांच्या भागात संसर्ग होऊ शकतो. सर्वसाधारणतः (HSV-1) हा कमरेच्यावरच्या भागात उद्भवतो व (HSV-2) हा कमरेच्या खालील भागात उद्भवतो.

आपल्या शरिराच्या प्रतिकार करण्याला रोगप्रतिकार असे म्हणतात. जेव्हा हरपीज शरिरावर हल्ला करतात तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती संभाव्य धोक्याला जोरदार प्रतिकार करते. जशी ही क्रिया तिव्र होत जाते तशी दोन्ही भागात भरपुर नुकसान झालेले असते. याच कारणामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती या संसर्गाशिवाय इतर संसर्गाशी लढण्यास असमर्थ ठरते. याच कारणांमुळे हरपीज झालेल्या रुग्णांना हा हरपीज संसर्ग नियंत्रणात ठेवावा लागतो.

लक्षात ठेवा

स्वतःला हरपीज असल्यास त्याची माहिती स्वतःकडे असणे गरजेचे आहे. बराच वेळा हरपीज चे निदान होणे ही परिस्थिती आपल्याला गोधळात टाकणारी, राग, भिती व नौराश्याकडे नेणारी असते. कधी कधी या संसर्गाचा संवेदनशील भाग हाताळण्यासाठी काहीच माहिती उपलब्ध नसते किंवा तशा स्वरुपाची मदत उपलब्ध नसते. यासाठी मदत उपलब्ध आहे. पहिल्या लक्षणापासून डॉक्टरांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. आपल्याला हरपीज आहे किंवा नाही याचे निदान करण्यासाठी त्याचा काही भाग परिक्षणासाठी द्या. आपल्याला हे परिक्षण कशासाठी करायचे आहे हे सांगावे. लक्षात ठेवा जर दाह होत असेल तर निदान पद्धती उपयोगात येत नाही.

प्रचलित हरपीज निदान पद्धती