Print
Hits: 12187

त्वचेची निगा राखण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपली त्वचा कोणत्या प्रकारात मोडते हे ओळखून नंतरच औषधोपचाराला सुरवात करणे. तसेच सुरवातीपासूनच उपचारपद्धतींचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे.

आपली त्वचा चांगली रहावी असे तुम्हाला जर वाटत असेल तर सहाजिकच त्यादृष्टीने आपली पाऊले उचलणे व योग्य प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. याची स्वतःला सवय घालून घेणेही तितकेच गरजेचे आहे. तसेच सकस आहार, फळे, भाज्या याचबरोबर योग्य व्यायाम आणि पुरेशी झोपही चांगल्या सुदृढ त्वचा चांगली रहाण्यासाठी साठी आवश्यक घटक आहेत. शक्यतो सूर्याच्या प्रखर प्रकाशात जाणे टाळावे. जाणे आवश्यकच असेल तर त्वचेची हानी टाळण्यासाठी सनस्क्रिनचा वापर करावा. त्वचेत पाण्याचे प्रमाण संतुलित रहावे यासाठी रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

क्लिंजर आणि मॉइस्चरायझर याचा त्वचा चांगली रहाण्यासाठी आपण चांगला वापर करू शकतो.

इतर उत्पादनात टोनर, एक्सफ्लोइटर, आय-क्रिम किंवा जेलचा समावेश असू शकतो. तडे जाण्यापासून बचाव करण्यासाठी किंवा परिवर्तन आणण्यासाठी दिवसाला तिन-चार उत्पादने वापरणे टाळावे. तुमच्या रोजच्या वापराचे प्रमाण दिवसातून दोनदा, प्रत्येकी १० मिनिटे यापेक्षा जास्त नसावे. तसेच साधारण प्रमाणाची अंमलबजावणी करावी.

खालील गोष्टींचा सर्वसाधारण वापरासाठी उपयोग केला जाऊ शकतो
क्लिंझिंग
तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार त्वचेची काळजी घेण्यासंदर्भात ही पहिली पायरी आहे. पूर्ण दिवसभरात आपल्या त्वचेला घाम, धूळ, माती, सौंदर्य प्रसाधने, जंतू इत्यादींचा सामना करावा लागतो. अशावेळेस हे घटक त्वचेला हानी पोहचवू शकतात त्यांना त्वचेवरून काढण्याची आवश्यक्ता असते. साबण आणि पाणी काहीप्रमाणात त्वचेला साफ करतात पण सौंदर्य प्रसाधनांचा काही भाग त्वचेला चिटकूनच राहतो. यासाठी क्लिंझिंग फार योग्य व उपयोगी ठरते.

पाण्यात मिसळणा-या रसायनांचा वापर करावा किंवा साबण विरहित पीएच संतुलित क्लिंझिंग वाईपचा वापर करावा. क्लिंझिंग करत असताना क्रिम, लोशन किंवा दुधाच्या सहाय्याने हलक्या हाताने मसाज करावी. मसाज करत असताना नाक, हनुवटीचा भाग, मान आणि डोळ्याकडील भागात विशेष लक्ष द्यावे.

क्लिंझिंग करतेवेळी त्वचा स्वच्छ करताना कापूस वापरावा. साफ करतेवेळी जर त्या कापसाच्या पृष्ठभागावर आर्द्रता असेल तर कापूस किंवा कापड स्वच्छ दिसेपर्यंत म्हणजेच त्वचेवरील पूर्ण आर्द्रता शोषून घेईपर्यंत (२ ते ३ वेळा) त्वचेवर फिरवावा.

आम्ही सांगितल्याप्रमाणे, आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे आपल्याला क्रिम किंवा लोशनचा वापर केल्यास फायदा होईल तसेच क्लिंझिंगच्या ठळक बाबी आपल्या लक्षात आल्याच असतीलच.
स्ट्रिमिंग: सर्वप्रकारच्या त्वचेसाठी स्ट्रिमिंगमुळे फायदा होतो. यामुळे त्वचेवर राहीलेली धुळ काढली जाते, रक्तसंचार वाढतो तसेच त्वचेचे रक्षण करणारे त्वचेवरील छिद्र साफ होते. क्लिंझिंग करताना पाण्यात नैसर्गिक औषधी (हर्ब्स) मिसळल्यास स्ट्रिमिंगने त्वचेला अधिक फायदा होऊ शकतो. लवेंडर, थाईम आणि रोजमेरी सारख्या औषधींचा वापर आपण करु शकतो.

मसाज: चेह-यावरील क्लिंझिंग पूर्णपणे काढून टाकल्यावर पुढची पायरी म्हणजे मसाज होय. मसाज करण्याचे मुख्य कारण त्वचेत उजाळा आणणे, चेह-याच्या भागात असणा-या स्नायुंना मोकळे करणे व रक्तसंचार वाढवणे. मसाज ५ ते १० मिनिटांपेक्षा जास्त होता कामा नये तसेच मसाज ही स्वच्छ हातांनीच केली पाहीजे. मसाज करत असताना त्वचेला जास्त ताण देऊ नये.

शीत उपचारपद्धती: क्लिंझिंग नंतरची ही शेवटची पायरी असते. यामधे थंड बर्फयुक्त पाण्याचा वापर करावा. यात त्वचेवरील मलिन घटक काढले जातात व त्वचेचे रक्षण करणारी छिद्रे, ज्यांचा मुखभाग उघडा राहीला आहे त्यांना झकले जाते.

आमच्या सौंदर्य विभागात आपल्याला विविध क्लिंझिंग पद्धती आणि उत्पादने यांची सविस्तर माहिती मिळते. त्वचेच्या प्रकाराप्रमाणेच क्लिंझिंगच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. तसेच याविभागात आपल्याला काही साध्या सुचना, सल्ला देणार आहोत तसेच आपण आपल्या घरी काही वेगळे प्रयत्न न करता कश्याप्रकारे मुखवटा बनवू शकता हेही सांगणार आहोत.

टोनिंग
टोनिंग ही पद्धती चांगल्या त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. टोनिंग ही नेहमी तरल हलक्या स्किन फ्रेशनरने, रोज वॉटरने, किंवा स्किन टोनरने केली जाते. टोनिंग हे त्वचेवरील छिद्रांचा आकार कमी करते व त्यांना झाकण्याचेही काम करते. टोनर त्वचेमधिल लवचिकता राखण्याकरीता उपयुक्त ठरतात. तसेच यामुळे त्वचेत मुलायमताही येते. टोनिंगमुळे त्वचेसाठी रक्तसंचार वाढतो, त्वचेला ताजेतवानेपणा आणतो. एक चांगला टोनर हा थंड पाण्याचे तर इतर टोनर हे नैसर्गिक औषधी, फुले, विनेगर, गुलाब पाणी आणि व्हिच-हॅजेलचे मिश्रण असते. तिव्र स्किन टॉनिकचा व ऍस्ट्रिंजेंट्सचा वापर टाळावा. ते फक्त तेलकट त्वचेकरीता बनवलेले असतात.मॉइस्चरायझिंग
प्रत्येक प्रकारच्या त्वचेला मॉस्चरायझिंगची आवश्यक्ता असते. जर आपल्या त्वचेला तडे जात असतील तर हलका तेलविरहीत मॉस्चरायझर वापरावा. चांगल्या मॉस्चरायझरच्या पर्यायासाठी सूर्याच्या प्रखरतेपासून बचाव करणा-या (SPF) 15) ची निवड करावी. चांगल्या मॉस्चरायझरमधे बरेच लोशन आणि क्रिम्सचा समावेश असतो. कारण यामूळे त्वचेमधे नैसर्गिक आर्द्रता आणण्यास मदत होते. एखादे विशिष्ट उत्पादन प्रत्येकासाठी चांगलेच ठरेल असे नाही. कदाचित चांगला प्रभावी मॉस्चरायझर मिळवण्यासाठी आधी बरेच मॉस्चरायझर वापरावे लागतील.

हलके मॉस्चरायझिंग हे तरुण त्वचेसाठी योग्य ठरते. मॉस्चरायझरच्या रोज वापरामुळेच ते चांगले परिणाम देऊ शकतात. ब-याच मॉस्चरायझिंग क्रिम्स मधे अल्फा-हायड्रोसिल ऍसिड(हे दुध,फळे आणि साखरेतही असते)असते. हे सुरकुत्यांवर प्रभावी ठरतात.

आपली त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी व सुदृढ ठेवण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्वांचा वापर करावा

त्वचेचे सूर्याच्या प्रखरतेपासून रक्षण करणे
सूर्याच्या प्रखरतेपासून त्वचेचे रक्षण करण्याला आपल्या दैनंदीन जीवनातली एक सवयच घालून घेतली पाहीजे. सूर्याचा प्रकाशात दोन प्रकारच्या लहरी असतात जसे UVA & UVB
UVA : हे किरण त्वचेच्या कडा घेतात व त्वचेच्या खोल भागापर्यंत जाऊन रेडिकल हलचाली निर्माण करतात. हे कर्करोगासाठी किंवा संवेदनशील प्रतिक्रीयांना कारणीभूत ठरू शकते.
UVB : हे किरण त्वचेला भाजत जातात व त्वचेवर तपकीरी रंग आणतात. यामूले त्वचेचा कर्करोग उद्भवू शकतो. हे किरण UVA पेक्षा अधिक तीव्र असतात.

याचा प्रभाव त्वरीत दिसत नसला तरी जास्त सूर्यासमोर रहाणे धोक्याचे आहे हे आपल्याला कळले पाहीजे. तसेच पर्यावरणात होणारे अनियमित बदल, प्रदुषण आणि तीव्र साबण आपल्या त्वचेला हानी पोहचवतात.

सूर्याच्या प्रखरतेपासून बचाव करण्यासाठी काही मार्गदर्शन
सुरकुत्यांपासून बचाव

वयाच्या पंचविशीनंतर रोजच्या फेशियल करण्याने त्वचेत लवचिकता टिकून राहते. त्वचेत वेळोवेळी रक्त पुरवठा होत राहतो.

आपण त्वचेवर वापरण्यासाठी विविध कोलेजन उत्पादने खरेदी करू शकता. पण हे अद्यापही सिद्ध झालेले नाही की ही उत्पादने त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवतात.

त्वचेवर वापरण्यासाठी कोणतेही उत्पादन वापरण्याआधी त्वचा तज्ञांना विचारुनच आमलात आणावे. त्वचेतील सुरकुत्या काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे कोलेजन फिबरचे इंजेक्शन किंवा प्लास्टिक सर्जरी वगैरे. पण हे कायमस्वरूपी उपाय नाहीत. तसेच यांच्यावापरा आधी ब-याच गोष्टींचे व त्वचेच्य संवेदनशीलतेचे निरिक्षण आवश्यक असते.

सुरकुत्या येणे ही चिकित्साविषयक समस्या नाही. तरीही काही लोक त्याची मदत घेतात. याची खात्री करुन घेणे गरजेचे आहे की जो डॉक्टर यावर उपचार करणार आहे तो व्यवस्थित या क्षेत्रात पारंगत आहे किंवा नाही, त्वचा तज्ञ आहे किंवा नाही किंवा प्लास्टिक सर्जन आहे किंवा नाही. या सर्व गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक असते.