Print
Hits: 5503

औषधांचा प्रादुर्भाव
त्वचेवर चट्टे पडणे, पोटात मळमळणे इत्यादी प्रतिक्रिया या औषधाच्या प्रदुर्भावाने संभवतात. पिढीजात प्रादुर्भाव, दमा, किंवा अर्टिसेरीया असणा-यांना साधारणतः औषधांचे प्रादुर्भाव होतात. या प्रतिक्रिया स्टेरॉईड किंवा ऍन्टी हिस्टामाईनने हाताळता येतात. जर एखादे औषध घेतल्यानंतर प्रादुर्भाव झाला असेल तर दुस-यांदा तेच औषध पुन्हा घेतल्याने पहिल्यापेक्षा जास्त तिव्रतेने प्रादुर्भाव होऊ शकतो.

त्वचेला अपाय करणा-या औषधी प्रतिक्रियांचे काही प्रकार. सर्वसाधारणतः खालिल औषधी प्रतिक्रिया असु शकतात

औषधांमुळे येणा-या तीव्र प्रतिक्रिया घातक ठरू शकतात. स्टेवन्स जॉन्सन्स सिण्ड्रोम व टॉक्सिक एपिडेर्मल नेक्रॉलीसिज हे कधी कधी जास्त घातक ठरतात. वेदनाशामक, संसर्ग रोखणारी व अपस्मारावरील औषधे सर्वात जास्त प्रदुर्भाव दर्शवतात.

सिद्धांतानुसार कोणत्याही औषधाने प्रदुर्भाव उद्भवू शकतो. मॉर्बिल्लीफॉर्म पादुर्भावाचे कारण मोनोनुक्लेऑसिसने संसर्ग असलेल्या ऍम्पीसिलीन चा रुग्णावर वापर केल्याने होतो.