Print
Hits: 6999

घसा
आवाज घोगरा होणे अथवा खरखरीत होणे सदोष बोलणे अथवा बोबडे बोलणे म्हणजे आवाजामधील बिघाड. हा आवाजातील बिघाड दोन प्रकारचा असतो. आवाज उत्पन्न करण्यास अडथळा येणे आणि आवाजाचा दर्जा टिकविण्यात अडथळा येणे. घोगरेपणा हा एक प्रकारचा सदोष बोलण्याचाच प्रकार आहे ज्यामध्ये खरखरीत अथवा खराब आवाज निर्माण केला जातो. तरीपण घोगरेपणा आणि सदोष बोलणे हे एकमेकांना पूरक समजले जातात.

महत्वाची टीप
घोगरेपणा हे स्थानिक प्रकारचा स्वरयंत्रातील दोष आणि पसरलेल्या अथवा पध्दतशीर दोष या दोन्हींची लक्षणे होत. ही रूग्णामध्ये तणाव निर्माण करणारी लक्षणे असतात तशीच स्वरयंत्राच्या कर्करोगा सारख्या रोगाची प्राथमिक अवस्थेतील लक्षणे देखील असतात.

आवाज निर्माण करण्याच्या पध्दती अथवा यंत्रणा
रचना
स्वरयंत्राची आवाज निर्माण करणारी यंत्रणा (कंठद्वारा जवळील) मध्ये आवाज करणार्‍या खर्‍या तंतूची जोडी असते जे लांबलेले, फाकलेले आणि अनेक स्नायूंनी वेढलेले असतात त्यामुळे या तंतूचा ताण बदलता येतो आणि त्यांच्या मधील जागा देखील बदलता येते तेथील स्नायू सुपीरिअर लॅरींजिअल आणि रीकरंट लॅरींजिअल अशा व्हेगस ज्ञानतंतूच्या दोन फांद्याच्या नियंत्रणाखाली असतात.
प्रमुख पुरवठा
आवाज निर्माण होते वेळी चिकटलेला आवाज करणार्‍या तंतूमध्ये हवेचा झोत पाठविला जातो.ज्यामुळे त्या तंतूमध्ये कंपने निर्माण होतात आणि आवाज निर्माण होतात आणि आवाज निर्माण होतो. जो घसा, जीभ आणि ओठ यांच्या मदतीने व्यवस्थित बोलण्य़ाच्या रूपात अवतरतो. आवाज करणार्‍या तंतूमध्ये अथवानियंत्रण करणार्‍या कोणत्याही अवयवांमध्ये बदल झाल्यास नेहमीपेक्षा भिन्न आवाज निर्माण होतो ज्यामध्ये या तंतूच्या हालचालीमध्ये बदल होतो.

आवाज निर्माण होण्याच्या पध्दतीत बदल होतो अथवा कंपन्यामध्ये बदल होतो (पध्दतशीर सदोष बोलणे) याशिवाय रचनादोष नसताना देखील सदोष बोलणे असू शकते. (कार्यप्रवण सदोष बोलणे).

विभागशीर निदान
नेहमी आढळणार्‍या रोगाशी संबंधित पुरावे यासाठी विभाग ‘अ’ पहा
अ.

  1. विषाणुंमुळे झालेला त्वरित प्रकारचा स्वरंयंत्राचा दाह.
  2. विषाणुमुळे निर्माण झालेला श्वासमार्गाच्या वरच्या भागातील दाह ज्यामुळे बोलता येत नाही आणि घशाचा दाह मोठ्या प्रमाणावर असतो.
  3. आवाज निर्माण करणार्‍या तंतूच्या दोन्ही बाजूला सूज येणे आणि रक्तसंचयामुळे लाली येणे.
  4. श्वासमार्गाच्य़ा वरील भागातील दाह थांबल्यास सुधारणा दिसते अगदी जुन्या प्रकारची उपाययोजना म्हणजे आवाजाला विश्रांती देणे.
  5. जंतुचा संसर्ग असेल तर प्रतिजातीय रक्षय घोगरेपणाचे दाह हेच मुख्य कारण असते. आणि घशाचा दाह असतो.

ब.

  1. स्वररज्जुजवळ गाठ निर्माण होणे.
  2. साधारणपणे गायक स्त्रिया आणि लहान मुलांमध्ये आढळते. श्वासमार्गाच्या वरच्या भागाचा दाह, सायनसचा दाह, धूम्रपान आणि दारू यामध्ये परिस्थिती जास्त बिघडते.
  3. पुढच्या आणि मध्यभागापासून १/३ अंतरावरील स्वररज्जूच्या दोन्ही बाजूला आणि एकत्र येण्याचे ठिकाणी, मऊ, लाल पण लांबलेला गाठी तंतूच्या गाठी प्रमाणे, घट्‌ट आणि पांढर्‍या.
  4. आवाजाल विश्रांती देणे बोलण्याबाबत उपाययोजना अगदी क्वचित शस्त्रक्रिया सुचवली जाते.
  5. सबम्युकोसा या भागाचा दाह झाल्याने निर्माण होतो. (श्लेष्मल आवरण)