Print
Hits: 4539

केस क्र. १.
श्री. डी. के. वय ४० वर्षे, यांना डावी नाकपुडी चोंदणे, डोकेदुखी, डोळ्यातून सतत पाणी येणे आणि नाकपुड्यांमधून रक्त येणे इत्यादी तक्रारी होत्या. सात वर्षापूर्वी त्यांनी Polypectomy आणि Antranasal Antru Toncy केली.

तपासणीत असे दिसून आले की राखाडी रंगाचा मोठा पदार्थ समुच्चय नाकाच्या डाव्या बाजूच्या पोकळीत साठलेला आहे आणि तो नाकातील पडद्याला उजव्या बाजूला ढकलतो आहे. जखमा तपासण्यासाठी वापरण्याचे छोटेसे शस्त्र देखील नाकातून आत घालणे अशक्य होते. नाका जवळचा भाग मऊ होता आणि अश्रू वाहून नेणारी नलिका बंद झाल्य़ाचा पुरावा होता. जबड्याचे डाव्या बाजूचे हाड संवेदनशील होते आणि स्पर्श केल्यावर पदार्थ समुच्चयातून रक्तस्त्राव हो नव्हता. शेवटी नाकात घातक अशी मऊ गाठ निर्माण झाली असल्याचे निदान केले गेले.

नेहमीच्या बायो - केमिकल तपासण्या केल्या गेल्या. नाकाच्या क्ष-किरण चिकित्सेत अपारदर्शकता आणि डाव्या बाजूचे वरच्या जबड्याच्या हाडाची पोकळी व मध्यरेषेच्या जवळच्या पडद्याचा विनाश झाल्याचे दिसले. CT Scan मध्ये सुध्दा डाव्या बाजूच्या वरच्या जबड्याच्या हाडाच्या पोकळीच्या पेशीसमूहाच्या रचनेत बदल झालेला आणी मधल्या रेषेच्या जवळच्या पडद्याच्या पेशी खाऊन टाकलेल्या, नष्ट झालेल्या आणि डाव्या नाकाच्या पोकळीत मऊ असा पदार्थ समुच्चय असल्याचे दिसून आले.

मधल्या पडद्याच्या पेशींचे पुनरावर्तन आणि त्यांचे नष्ट होणे यामुळे रूग्णाची Nedial Maxillectony च्या बरोबर Lateral Rhinotony करणे आवश्यक होते. पदार्थसमुच्चय नष्ट करून जबड्याच्या वरच्या हाडाची पोकळी मोकळी केली गेली. सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने पेशींची रचना अभ्यासल्यानंतर अस्तरपेशीचा घातक नसलेला टबू (ट्यूमर) असल्याचे निश्‍चित निदान केले गेले.

शस्त्रक्रियेनंतर रूग्ण लगेच बरा झाला. रूग्णाची नंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर पुन्हा रोगाचे कोणतेही लक्षण दिसले नाही आणि गेल्या दीड वर्षांपासून रूग्ण पूर्णपणे चांगला आहे.

केस क्र. २.
श्रीमती एम. एल, वय ४८ वर्षे, यांना नाकाच्या दोन्ही बाजू चोंदणे, तोंडाने श्वास घेणे, डोकेदुखी, इ.त्रास होता, त्यांना मधुमेह, रक्तदाब नव्हता आणि दोन वर्षापूर्वी Dalypectoncy झाली होती.

नेहेमीच्या तपासण्या केल्यानंतर दोन्ही नाकपुड्यांमध्ये माळिणी सारखा पदार्थसमुच्चय झालेला दिसून आला. याचा रंग राखाडी होता आणि स्पर्श केल्यावर त्यातून रक्तस्त्राव होत नव्हता. दोन्ही बाजूच्या जबड्याच्या वरच्या हाडाची पोकळी अतिशय संवेदनशील झाली होती. मऊ पेशींचा समुच्चय कोठेही दिसत नव्हता.

नाकाच्या दोन्ही भागात मऊ गाठ निर्माण झाल्याचे निदान केले गेले. नाकाची Endoscopic तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया केली गेली. शस्त्रक्रियेनंतर रूग्णात आश्‍चर्यकारक फरक पडला.

१८ महिन्यांनंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर रोगाचे कोणतेही लक्षण आढळून आले नाही.