होमिओपॅथीचा कॅन्सर (कर्करोग) इलाज
जेव्हा आधुनिक उपचार काम करेनासे होतात, तेव्हाच लोक पर्यायी औषध योजनांचा विचार करतात तरीही वाढत्या प्रमाणात या उपचार पध्दतीचा लोक मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत व त्यांना फायदा होत आहे, पुण्यात कर्करोग रूग्ण नवीन पध्दतीचा अवलंब करीत आहेत व परिणाम उत्साहवर्धक आहेत.
ती पध्दती म्हणजे Homeopathy व तिचा कर्करूग्णांसाठी अवलंब करणारे डॉ. संतोष भन्साळी त्यांच्याकडे ३०० पेक्षा अधिक रूग्णांच्या यशोगाथा जमेस आहेत जेथे आधुनिक उपचारशास्त्र अयशस्वी ठरत आहे तेथे ते कर्करूग्णांना मदत करत आहेत.
दोन वर्षे वयाच्या मीरा पटेलच्या पालकांना ध्यानात आले की आपल्या मुलीला कर्करोग आहे. जेव्हा सामान्य ताप एक महिन्यापुढे चालूच राहिला व डॉक्टरांनी रक्तचाचणीचा सल्ला दिला मीरा acute lymphatic leukemia ने ग्रस्त असल्याचे चाचण्यांमधून ध्यानात आले नंतर दवाखान्याच्या चकरा व cheotherapy च्या दोन पाळ्या झाल्या डॉक्टरांनी असा सल्ला दिला की मीराला bone marrow transplant करून घ्यावे लागेल. Transplant साठी आवश्यक असलेले ६ लाख रू. खर्च करण्यास आम्ही तयार होतो. परंतु ती बरी होईल. याची खात्री नव्हती रामभाई पटेल मीराचे आजोबा म्हणाले, मुलीचे आयुष्य वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून एका मित्राच्या सल्ल्याप्रमाणे ठरवले. त्यावेळी मीराच्या WBC count २६००/cumm (सामान्य स्थिती ४०००/११०००) व तिचा (plant count ६१००० cumm) (सामान्य स्थिती १,१५,००० ते ४,००,०००) WBC व Platelet चाचण्या leukemia वे अस्तित्व सिध्द करणार्या आवश्यक बाबी आहेत. दोन महिन्याच्या डॉ. भंसाळीच्या उपचारानंतर रक्तचाचण्या नुसार मीरा सामान्य होऊ लागली होते. मार्च १३-२००० च्या अलीकडील चाचण्या नुसार WBC count ५६००/cumm व platelet count २,१०,००० होता.
अतिशय आनंद झालेले पालक म्हणतात, कर्करोग म्हटले की आपण नेहेमी ऍलोपॅथीचाच विचार करतो होमिओपॅथी कर्करोगाच्या बाबतीत आश्चर्यकारक सुधारणा कशी दर्शवितात ते आमची मुलगी एक उदाहरण आहे. या व अशा अनेक यशोगाथा मागील. डॉ. भंसाळी म्हणतात, Allopathy मध्ये surgery, chemotherapy किंवा radiation चे उपचार केले जातात पण कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे मरत नाहीत व त्याचे इतर परिणाम होतात त्यामुळे मूत्रपिंडात बिघाड किंवा हृदयावर परिणाम होतो. खरे तर भंसाळींना असे वाटते की Homeopathy अधिक परिणामकारक ठरू शकेल कारण त्यामध्ये उपचारामध्ये प्रत्येकीवरील उपाय ठराविक प्रकारचे नसतात. Homeopathy प्रत्येक रूग्णाच्या संपूर्ण शरीराचा विचार करते व त्यामुळे उपाययोजना व्यक्तिपरत्वे भिन्न ठरते. भंसाळी म्हणतात.
कॅन्सरची शिकार दिपाली मेहंदळे यांना ओटीपोटात जड वाटू लागले जो नंतर कर्करोग असल्याने निदान झाले. त्यांच्या शरीरात कर्करोगाच्या १३.५ सेमी x ११.५ सेमी व १२ सेमी x १०.५ सेमी आकाराच्या २ गाठी होत्या. त्यांना शस्त्रक्रिया व नंतर chemotherapy चा सल्ला देण्यात आला ‘मी मागील वर्षी शस्त्रक्रिया करून घेतली परंतु chemotherapy करण्याची माझी इच्छा नव्हती कारण केस गळणे व nausea सारखे त्याचे इतर परिणाम मी डॉ. संजय भंसाळी बद्दल ऐकले होते. तसेच त्यांच्या Homeopathic उपचारांबद्दल व त्या मार्गाने जाण्याचे ठरविले. जेव्हा दिपालीने chemotherapy नाकारली तेव्हा त्यांची CA-१२५ level ४३.४ U/ml होती. CA-१२५ चाचणी ovarian कर्करोगाची निदान पध्दती आहे. तिच्या सामान्य मर्यादा ३५.० U/ml किंवा कमी असतात. आठ महिने Homeopathic उपचार घेतल्यावर दीपालीचा CA-१२५ ४.४० U/ml पर्यंत खाली आला दीपाली म्हणते आता मला पूर्णपणे सक्षम व उत्साही वाटते.
अंतिम स्थितीला पोहोचण्यापूर्वी आलेल्या रूग्णांपैकी बहुतेकांना बरे करण्याचा भंसाळींना विश्वास आहे त्यांचा असा दावा आहे की त्यांच्या सर्व रूग्णांपैकी ७५ टक्क्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. जरी या निष्कर्षामुळे डॉक्टर आनंदी असले तरी या उपचारपध्दती उपयोग होतो किंवा नाही या बद्दल ते साशांक आहेत. डॉ. दिलीप वाणी consulting pathologist यांना असे वाटते की यावर निर्णय आत्ता देणे घाईचे ठरेल भंसाळींचे उपचार घेतलेल्या सर्व रूग्णांनी तत्पूर्वी chemotherapy उपचार घेतले होते कर्करोगाच्या पेशी आधीच मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या असतील. ते म्हणतात control group नसल्यामुळे कर्करोगाच्या उपचारांच्या मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी Homeopathy चा उपयोग व्हावयास काही वेळ लागेल भंसाळी सांगतात की ही वस्तुस्थिती बघून नियमितपणे सर्व रूग्णांच्या माहितीचा शास्त्रीय चिकिस्तेसाठी नोंद ठेवली आहे. त्यांच्या मते रोगमुक्ती हेच अंतिम उद्दिष्ट आहे.
डॉ. संजय भंसाळी यांच्याशी ४४८३०३७ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
होमिओपॅथी आणि कॅन्सर
- Details
- Hits: 8207
5
कर्करोग
हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?
