Print
Hits: 6318

विल्म’स ट्यूमर हा असा एक आजार आहे त्यात कर्करोगाच्या घातुकपेशी मूत्रपिंडाच्या काही भागात आढळून येतात. किडनी हे एकमेकांशी समन्वय असलेली पाठीकण्याची दोन्ही बाजूला असलेली अवयवाची जोडी असते. मूत्रपिंडाचा आकार ‘किडनी बिन’ सारखा असतो. प्रत्येक किडनीमध्ये सूक्ष्म/छोट्या छोट्या नलिकांचे जाळे असते, त्यातून रक्त गाळून स्वच्छ/शुध्द केले जाते. हे जे नको असलेले भाग असतात त्याचे मूत्रात रूपांतर केले जाते.

मूत्रपिंडात तयार झालेले मूत्र मूत्रनलिकेद्वारे मूत्राशयात जाते. शरीरातून नि:सारण होईपर्यंत ते मूत्राशयातच राहते. ज्या मुलांना विल्म’स ट्यूमर झाला आहे. अशा बहुसंख्य मुलांचा हा रोग बरा होतो. जर या आजाराची मुलामध्ये लक्षणे दिसली तर डॉक्टर पोटाची, गाठ शोधण्यासाठी तपासणी करतात आणी नंतर रक्त आणि लघवी तपासणीसाठी पाठवितात.

डॉक्टर त्यानंतर पिलोग्राम नावाची विशेष क्ष-किरण तपासणी करायला सांगतात. या तपासणीसाठी एक आयोडीन असलेले रंगद्रव्य अंत:क्षेपण करून रक्तप्रवाहार सोडले जाते. त्या द्रव्यामुळे क्ष किरण तपासणीत, मूत्रपिंड अधिक स्पष्टपणे दिसू शकते. त्यानंतर डॉक्टर तुमच्या मुलाची अती तीव्र ध्वनिलहरींचा परावर्तित प्रतिमा तपासणी करायला सांगू शकतात. ह्या (अल्ट्रा सोनिक) तपासणीत तीव्र ध्वनिलहरींचा वापर करून प्रतिमा तयार केली जाते. किंवा कँम्प्युटेड टोमोग्राफिक स्कॅन - सीटी स्कॅन, म्हणजे संगणकाचे मदतीने केलेली क्ष-किरण तपासणी करायला सांगतील. या व्यतिरिक्त एम आर आय ही अत्याधुनिक चाचणी ज्यात चुंबकीय लहरींचा वापर केला जातो, तीही करायला सांगू शकतात. ह्या तपासणीमध्ये पेशीजाल असाधारण आहे असे समजले, तर त्या गाठीचा एक छोटासा तुकडा काढून, सूक्ष्मदर्शक यंत्राचे सहाय्याने त्याची तपासणी केली जाते, त्या तुकड्यात कर्करोगाच्या पेशी आहेत किंवा कसे हे तपासतात. याला बायोप्सी म्हणतात.

तुमचे मूल बरं होण्याची शक्यता आणि त्याला द्यावयाचे उपचार, आजार कोणत्या स्थितीत आहे त्यावर अवलंबून असते (म्हणजे फकत मूत्रपिंडालाच बाधा झाली आहे का कर्करोग अन्यत्र पसरला आहे, त्यावर अवलंबून असते.) तसेच कर्करोगाच्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली कशा दिसतात. अर्बुदाचा आकार केवढा आहे आणि तुमच्या मुलाची तब्येत, वय वगैरे विचारात घेतलं जातं.

टप्प्यांची माहिती
विल्म’स ट्यूमरचे टप्पे एकदा ह्या अर्बुदाचे निदान झाले की, त्यानंतर, बर्‍याच चाचण्या कराव्या लागतात. त्या चाचण्या शरीराच्या इतर भागात कॅन्सर पसरला आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी असतात. ह्याला ‘स्टेजिंग’ म्हणतात. तुमच्या डॉक्टरला कर्करोगाचा नेमका टप्पा माहिती होणे, तुमच्या मुलाचा उपचारांचा आराखडा निश्‍चित करणे आवश्यक असते. विल्म’स ट्यूमर च्या खालील स्टेजस्‌ - टप्पे समजले जातात.
स्टेज पहिली: कर्करोग फक्त मूत्रशयात आढळतो आणि शस्त्रक्रियेने संपूर्णपणे काढून टाकता येतो.
स्टेज दोन: कर्करोगाची प्रसरण मूत्रपिंडाच्या आजुबाजूच्या भागात होते. उदा. चरबी, नरम, पेशीजाल, रक्त वाहिन्या किंवा मूत्रपिंडाची पोकळी (एक मोठा भाग ज्यातून रक्त आणि पुन्हा जरूर पडेपर्यंत गोठवून ठेवता येतो.
स्टेज तीन: कर्करोग मूत्रपिंडाच्या आजुबाजूच्या भागात पसरलेला असतो, परंतु, शस्त्रक्रियेने तो काढून टाकता येत नाही. कदाचित कर्करोग मूत्रपिंडाच्या महत्वाच्या रक्त वाहिन्यात वा अन्य अवयवात किंवा संपूर्ण उदरपोकळीत पसरलेला असतो, त्यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रियेने काढून टाकणे अवघड असते. काही वेळा कर्करोग संपूर्ण शरीरभर पसरतो. जिथे शरीरातील संसर्ग प्रतिबंध पेशी ची निर्मिती व साठवण होते.
स्टेज चार: मूत्रपिंडापासून बर्‍याच दूर असलेल्या अवयवांपर्यंत कर्करोग पसरतो. उदा. फुफ्फुसे, यकृते, हाडे, आणी मेंदू
स्टेज पाच: कर्करोगाच्या पेशी दोन्ही मूत्रपिंडात आढळतात.

पुनरूद्‌भव
पुन्हा: पुन्हा होणारा रोग म्हणजे एकदा उपचार केल्यावर पुन: उद्‌भवलेला कर्करोग. जेथे सुरवात झाली तेथे किंवा शरीरातील नवीन भागात तो येतो.

Wilms Tumor मध्ये सूक्ष्मदर्शकाखाली कर्करोगाची पेशी कशी दिसते (histology) हे सुध्दा महत्वाचे आहे. कर्करोगाच्या पेशी अनुकूल (history) किंवा प्रतिकूल (histology) स्वरूपाच्या असू शकतात. (ज्या मध्ये diffuse anaplastic and cell sarcoma of the kindey चा समावेश असतो.

उपचार
wilms tumaour च्या सर्व रूग्णांवर उपचार उपलब्ध आहेत. तीन प्रकारच्या उपचार पध्दती वापरात आहेत.

शस्त्रक्रिया - (शस्त्रक्रिया करून कर्करोगाचे बाहेर काढणे) Chemotherapy (औषधांच्या वापराने कर्करोगाच्या पेशी मारणे) Wilms tumour वर शस्त्रक्रिया ही सामान्य उपचार पध्दती आहे. खालील पैकी एकाचा उपयोग करून तुमचे डॉक्टर कर्करोग काढू शकतात. partial nephrectomy मध्ये कर्करोगाची गाठ तिच्या भोवतालच्या मूत्रपिंडाचा भाग काढला जातो. ही शस्त्रक्रिया विशिष्ट परिस्थितीमध्येच केली जाते जसे दुसरे मूत्रपिंड निकामी झाले असेल किंवा काढलेले असेल तर simple nephrectomy मध्ये पूर्ण मूत्रपिंड काढले जाते दुसरे मूत्रपिंड रक्तशुध्दिकरणाचे काम करू शकते.

Radical nephrectomy मध्ये मूत्रपिंड व त्याच्या आजुबाजूच्या उती काढल्या जातात. त्या क्षेत्रातल्या काही lymps nodes सुध्दा काढल्या जातात. Chemotherapy मध्ये औषधांच्या सहाय्याने कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात. Chemotherapy गोळ्यांच्या स्वरूपात घेता येते किंवा औषध सुईच्या सहाय्याने रक्तवाहिन्या किंवा स्नायूत देता येते.

Chemotherapy ला शास्त्रशुध्द चिकित्सा म्हणतात. कारण औषध रक्तात प्रवेश करते सर्व शरीरातून फिरते व शरीरातील कुठल्याही ठिकाणाच्या कर्करोगाच्या पेशी मारू शकते. शस्त्रक्रियेनंतर जेव्हा कर्करोगांच्या पेशी नेत्रपटल दिसण्याजोग्या असतात, तेव्हा दिलेल्या Chemotherapy ला adjuvant therapy म्हणतात.

कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी जेव्हा उच्च शक्तींची Chemotherapy वापरतात हे उच्च शक्तीचे औषध अस्थीमधील रक्त निर्माण करणार्‍या उतींचा (the bone marrow) नाश करतात, जेव्हा उच्च शक्तीची Chemotherapy ची आवश्यकता असते. तेव्हा उपचारापूर्वी bone marrow काढून घेऊन पुन्हा जरूर पडेपर्यंत गोठवून ठेवता येतो.