Print
Hits: 21325

कर्करोग होण्याची काही लक्षणे व कारणे असतात.
कर्करोगाचे मुख्य धोक्याचे घटक असे आहेत : तंबाखू, मद्यपान, चुकीचा आहार, लैंगिक आणि पुनरूत्पादन संस्थाविषयक चुकीचे वर्तन, संसर्ग, कौटुंबिक इतिहास, व्यवसाय, वातावरण - पर्यावरण व प्रदूषण.

कर्करोगाची शक्यता दर्शविणारे सात लक्षणे:

  1. शरीरावरील चामखीळ किंवा तीळ यांचा आकार, रंग आणि व्याप्ती बदलणे.
  2. बरा न होणारा फोड.
  3. सातत्याचा खोकला, घसा खवखवणे किंवा घशातील पुरळ/फोड.
  4. स्तनात किंवा शरीरातील इतर भागात आलेल्या गाठी किंवा गाठ.
  5. असाधारण रक्तस्त्राव किंवा इतर शारीरिक द्रव्यांचे अतिरिक्त स्तवन.
  6. जुनाट झालेला अपचनाचा त्रास किंवा गिळण्याचा त्रास.
  7. शौच्याच्या किंवा लघवीच्या सवयीतील बदल कर्करोगा व्यतिरिक्त इतर अनेक आजारातही वर सांगितलेली लक्षणे दिसू शकतात. पण ही लक्षणे रेंगाळत न ठेवता ह्या लक्षणांची तपासणी लवकरात लवकर करणे गरजेचे असते.