मुलाला/बालकाला झालेला कर्करोग बरा होवू शकतो का?
अनेकदा. कर्करोग - कॅन्सर या शब्दापेक्षा भीतीदायक अशा फारच थोड्या गोष्टी आहेत. पण बर्याच प्रकारच्या कर्करोगात उपचारांना चांगला प्रतिसाद मिळतो. सर्वसाधारणपणे, मुलांमधील कर्करोग बरा होण्याचे प्रमाण ६०% आहे. पण हे साधारण प्रमाण विशिष्ट मुलाच्या बाबतीत खरे ठरलेच असे नव्हे.
प्रत्येक मुलाच्या संदर्भात, कर्करोग बरा होणे हे त्याला कोणत्या प्रकारचे कर्करोग झाला आहे. निदान होण्याच्या वेळी तो शरीरात किती पसरला आहे किंवा त्याची वाढ किती झाली आहे आणि अशाच इतर गोष्टींवरती अवलंबून असते. मुलं सुध्दा प्रौढांप्रमाणे स्वतंत्र ‘व्यक्ती’ असल्याने, उपचारांना प्रतिसाद देण्याची प्रत्येक मुलाची पध्दती वेगळी असते. मुलाचे कुटुंबीय आणी डॉक्टर बराच वेळ नेमके कोणते उपचार द्यावयाचे, कोणते पर्याय उपलब्ध आहेत त्याचे परिणाम काय होतील यातील चर्चेतच घालवितात.
बालकांमधिल कर्करोगाचे प्रकार कोणते?
ऍक्युट लिम्फोसायटीक (लिम्फोब्लास्टिक) ल्युकेमिया: रसाचे नि:सारण होण्यात अडथळा आल्यामुळे पेशींमधील मोकळ्या जागेत लिम्फ जास्त प्रमाणात तुंबल्यामुळे होणारा अस्थिमगज व रक्त निर्माण करणार्या इंद्रियांचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे. कर्करोग झालेल्या मुलांमध्ये आढळणार्या कर्करोग प्रकारात दुसर्या क्रमांकावर आहे. मुलांमधील मेंदूच्या कर्करोगात प्रामुख्याने मोठ्या मेंदूचा वा ब्रेन स्टेमचा कर्करोग असतो.
चेतासंस्थेशी संबंधित गाठी (न्युरोब्लास्टोमी): मुलांमध्ये आढळणारा, कवटीबाहेरील चेतासंस्थेशी संबंधित आवाळू असणारा हा कर्करोगाचा प्रकार आहे. हा साधारणत: जन्मापासून एक वर्षापर्यंतच्या अवधीत निदान होणारा असतो.
विल्मंस ट्यूमर: एका किंवा दोन्ही मूत्रपिंडाना होणारा हा कर्करोग आहे. सामान्यत: दोन ते तीन वर्षाच्या मुलांना सहसा आढळणारा हा प्रकार आहे.
डोळ्यांचा कर्करोग (रेटिनोब्लास्टिमा): अगदी क्वचित आढळणारा प्रकार आहे. मुलांच्या कर्करोग प्रकारात हा ५% पर्यंत आढळतो.
स्नायूंचा कर्करोग (हॅल्डोमायोसारकोमा): मुलांमध्ये आढळणारा, नरम पेशी जालांचे उपद्रवी अर्बुद प्रकारचा कर्करोग आहे. आवाळुची सुरूवात भ्रुणावस्थेतील पेशींपासून होते आणि मग थराथराने असलेल्या ऐच्छिक स्नायूंच्या पेशीजालात त्याची वाढ होते.
हाडांचा कर्करोग (ऑस्टिरोसारकोमा), मुलांमध्ये आणि यौवनात आढळून येणारा हाडांचा कर्करोग आहे.
ऐविंग्ज सारकोमा: हा कमी आढळणारा हाडाचा प्राथमिक प्रकार आहे. सामान्यत: मुलांमध्ये व कुमारवयात दिसून येतो.
मुलांना योग्य प्रकारे पोषण मिळते आहे हे कसे ओळखावे?
सर्वच मुलांना योग्य पोषण मिळणे, अत्यावश्यक असते. पण विशिषत: कर्करोगाने पिडीत मुलांच्या बाबतीत ही फारच महत्वाची गोष्ट आहे. कारण थेट आजारामुळे किंवा आजारावरील उपचारांमुळे, मुलाची भूक आहार पचविण्याची क्षमता आणि पदार्थाची सहिष्णुता यावरच परिणाम झालेला असतो.
शालेय आणि खेळातील उपक्रमात चांगल्या प्रकारे भाग घेण्यासाठी उपचारांना सहिष्णुता दाखविण्यासाठी वाढीसाठी आणि भरभराट होण्यासाठी चांगला आहार घेणे, म्हणजे वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्यावश्यक पोषणद्रव्यांनी युक्त अ़सा आहार घेणे, अशा पोषकद्रव्यांत प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, पाणी, क्षार आणि जीवनसत्वे.
माझ्या मुलांच्या आहारातून उष्मांक वाढेल आणि प्रथिने अधिक घेतली जातील, यासाठी, मी काय करावे?
एकदाच भरपूर जेवणाऐवजी, छोट्या प्रमणात जास्त वेळा आहार घेणे चांगले मूल जेव्हा भुकेले असेल तेव्हा त्या वेळेचा अधिकाधिक फायदा करून घ्यावा.मुलाला चांगली भूक लागलेली असेल तेव्हाच त्याला थोडेच पण प्रथिनांनी समृध्द असे खाणे द्यावे. हालचाल भरपूर झाली तर भूक वाढते. मुलांनी भरपूर खावे म्हणून त्यांना प्रवृत्त करावे. पण आहारावरून ‘घरात’ युध्दभूमी व्हायला नको.
मुले आणि कर्करोग
- Details
- Hits: 7313
0
कर्करोग
हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?
