Print
Hits: 10150

निदानाच्या प्रक्रियेची सुरूवात संपूर्णपणे खोलवर जाऊन केलेली शारीरिक तपासणी, आणि पेशंटची वैद्यकीय इतिहास घेऊन होते. डॉक्टर सुरवातीला हाताने हलकेसे दाबून शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे निरीक्षण करतील. त्या भागाची स्पर्शाने जाणीव घेतील. अशा तपासणीमध्ये, डॉक्टर विशिष्ट इंद्रियाची सामान्य स्थितीशी तुलना करता जाणवत असलेली वाढ, तेथील पेशीजालाची वीण यांच्यातील बदल निश्‍चित करतात.

जर डॉक्टरांना शारीरिक तपासणीत असाधारण बाब आढळली, किंवा पेशंटमध्ये कर्करोगाची स्पष्ट लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टर त्या पुढच्या निदानात्मक तपासण्या करून घ्यायला सांगतात. कर्करोग निदानाची सर्वात निश्‍चित पध्दत म्हणजे बायोप्सी. बायोप्सी करताना, छोट्या शस्त्रक्रियेन, पेशीजालाचा भाग, सूक्ष्मदर्शी तपासणीसाठी बाहेर काढता जातो. कर्करोगाच्या निश्‍चितीबरोबर, बायोप्सीचा उपयोग कर्करोगाचा प्रकार निश्‍चित करण्यासाठी होतो. बायोप्सीमुळे, कर्करोगाची सध्याची स्थिती, कर्करोगाची आक्रमक वृत्ती आणि विस्तार/प्रसार, याचीही माहिती होते.बायोप्सीमुळे अत्यंत तपशीलवार विश्लेषण मिळत असल्यामुळे, त्याला सोन्याची टेस्ट्‌ म्हणले जाते.

उपचार
कर्करोगावरील उपचारांचे उद्देश असे म्हणतात. प्रथमत: अर्बुद आणि शक्य होईल. तेवढा पसरलेला भाग काढून टाकणे, आणि मग अर्बुदाच्या पुनर्दुभावाला आणि प्रसाराला प्रतिबंध करणे. कर्करोगावर उपचार करताना, उपचारांमुळे निर्माण होणार्‍या दुय्यम त्रासांपेक्षा मूळ आजारावर उपचार करण्याबाबत प्राधान्य देणे गरजेचे आहे. जर कर्करोग अतिशय आक्रमक असेल आणि बरा होणे अवघड असेल तर, प्रथम लक्षणांपासून सुटकारा मिळावा आणी अधिकाधिक काळ कर्करोग नियंत्रणात राहावा म्हणून उपचार दिले जातात.

शस्त्रक्रिया
दृश्य असलेले अर्बुद काढून टाकणे ही नेहमी वापरली जाणारी चिकित्सा आहे. जेव्हा कर्करोग शरीराच्या एकाच भागात असतो आणि अर्बुद लहान असते, तेव्हा शस्त्रक्रिया ही सर्वात प्रभावी उपचार पध्दती आहे. शस्त्रक्रियेचा उपयोग विविध कारणांसाठी उद्दिष्टांसाठी होऊ शकतो.

शस्त्रक्रिया-उपचार
कर्करोग बरा व्हावा म्हणून शस्त्रक्रियेने अर्बुद काढून टाकणे हा एक उपचार आहे. सामान्यत: कर्करोग एकाच जागी असेल किंवा विशिष्ट विभक्त भागात असेल तर शस्त्रक्रिया केली जाते. अशा शस्त्रक्रियेचे वेळी अर्बुदाबरोबरच, सभोवतालचे पेशीजालही काढून टाकले जाते. त्यामुळे शरीरात कर्करोगाच्या पेशी शिल्लक नसल्याची खात्री होते. सामान्यत: कर्करोगाचा प्रसार लसिका ग्रंथीपासून होत असल्याने, आजूबाजूच्या लसिका ग्रंथीही तपासाव्या लागतात, किंवा काढून टाकाव्या लागतात.

अस्थिमगज रोपण: अस्थिमगज (बोनमॅरो) हे हाडांच्या पोकळीतील एक पेशीजाल आहे. त्यात रक्त निर्माण करणार्‍या पेशी असतात. अस्थिमगज निरोगी असते, तेव्हा ते सातत्याने रक्ताची भरपाई करीत असते आणी ही क्रिया जिवंत राहण्यासाठी अतिशय आवश्यक क्रिया आहे.

परंतु काही वेळा, रसायन चिकित्सेमुळे अथवा किरणोत्सर्गी उपचारांमुळे,कर्करोगाच्या पेशी बरोबरच, अस्थिमगजाचाही नाश होतो. अशा वेळी, अस्थिमगजाचे रोपण केल्याने दु:ष्परिणाम टळतात. अस्थिमगज रोपण स्वत:चे करता येते किंवा दुसर्‍या व्यक्तीचे शरीरातील अस्थिमगज आणि रक्त निर्माण करणार्‍या पेशीचे करता येते. असे रोपण हा उपचार नव्हे पण उपरोत्तर दुष्परिणामातून सुटका होणे.संप्ररेक उपचार
जे कर्करोगाचे प्रकार संप्रेरकांशी संबंधित आहेत त्यांच्याबाबतीत ही उपचार पध्दती अगदी स्टँडर्ड पध्दती आहे. काही हे जे कर्करोगाचे प्रकार आहेत ते संप्रेरकांवर अवलंबून तरी आहेत किंवा त्यांची वाढ संप्ररकांमुळे होते. त्यात, गर्भाशय, स्तन आणी प्रोस्टेटच्या कर्करोगाचा समावेश होतो. या उपचार पध्दतीत संप्रेरकांचे निर्मिती थांबवणे किंवा त्यांची कार्यक्षमता कमी करणे समाविष्ट आहे. परिणामत: कर्करोगाची वाढ थांबते त्याचे आयुष्य अनेक महिन्यांनी वर्षानी सुध्दा वाढू शकते.

पर्यायी उपचार
कर्करोग झालेल्यांसाठी प्रचंड प्रमाणात पर्यायी उपचार उपलब्ध आहेत. हे उपचार रसायन चिकित्सा, किरणोत्सर्गी उपचार, शस्त्रक्रिया यांचे बरोबरीने देता येतात किंवा स्वतंत्रपणे देता येतात. पर्यायी उपचार हा गुंतागुंतीचा मानला असल्यामुळे तज्ज्ञ व्यक्तीकडूनच घ्यावेत.

ऍक्युपक्चर उपचारांमुळे कर्करोगातील वेदना कमी होतात असं वैद्यकियरित्या सिध्द झालेले नाही तरी अनेक पेशंटना ते सुरक्षित आणि गुणकारी,फायदेशीर वाटतात. शारीरिक उपचार, जसे मसाज, रिफ्लेक्सोलाजी, यामुळे स्नायूंना शैथिल्या येऊन आराम मिळतो. व मळमळ वांती अशा दुष्परिणांमाचे तीव्रताकमी होते. होमिओपाथी आणी चिनी वनस्पतीजन्य औषधांमुळे, रसायनचिकित्सा आणि किरणोत्सर्गी उपचारांचे दुष्परिणाम कमी झाल्याचे अनुभवास आले आहे. म्हणून अनेक डॉक्टर्स या उपचारांची शिफारस करतात.

काही अन्नपदार्थ आणि भाज्या, फळे आणि धान्यांमध्ये काही प्रकारच्या कर्करोगांपासून बचाव करण्याची क्षमता आहे असे मानले जाते.परंतु, स्वतंत्रपणे नेमका कोणता घटक कर्करोग विरोधी घटक आहे हे प्रयोगशाळेतील अभ्यासातून निश्‍चित करणे अवघड जाते. प्रयोगशाळेत, आजपर्यंत, ए, सी आणि ई ही जीवनसत्वे, सोथिओसायनेट डायथिओनिस ही, फ्लॉवर, ब्रोकोली व कोबीत आढळणारी संयुगे, गाजरात असणारे बीटा - कॅरोटीन हे संयुग, कर्करोगापासून बचाव करते असे सिध्द झाले आहे. फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये असणार्‍या तंतुमय पदार्थांनी समृध्द झालेला आहार घेण्यामुळे आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी झाल्याचे दिसून येते. नियमित व्यायाम आणिमाफक चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे वजनावर नियंत्रण राहते आणि एन्डोमेट्रीअल, स्तनांचा कर्करोग आणि आतड्याचा कर्करोग यांचा धोका कमी होतो.

आयुष्यमानाचा आडाखा
लाईफ टाईम रिस्क - आयुष्यभराचा धोका ह्या संज्ञेचा वापर, कर्करोगातील संशोधक, पेशंटला कर्करोग होण्याची शक्यता किती आणि/किंवा कर्करोग झाल्यावर त्याचे आर्युमान किती असेल, या विषयी बोलतात, तेव्हा वापरतात.

पेशंटच्या, आर्युमानाचा आराखडा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. विशेषत: कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे. कर्करोग कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या परिस्थितीत त्याचे स्थलांतर झालेले आहे, कर्करोगाची आक्रामकता किती आहे, या घटकांवर आर्युमानाचा आडाखा अवलंबून असतो. या शिवाय, पेशंटचे वय, सर्वसाधारण तब्येतीची अवस्था आणि दिलेल्या उपचारांची परिणामकता हे ही महत्वाचे घटक आहेत.

पुढील कार्यवाहीची निश्‍चिती करण्यासाठी, आजारांचे पर्यावसान जोखण्यासाठी आणि आजारातून बरे होण्याची शक्यता ठरविण्यासाठी नेहमीच डॉक्टर स्टॅटीस्टीक्स - संख्याशास्त्राचा वापर करतात. पाच वर्षाचे जीवन चाचणी हे सर्वांधिक वापरले जाणारे साधन आहे. हे परीणाम म्हणजे, ज्यांना कर्करोग झालेला नाही अशा व्यक्तींची, ज्यांना कर्करोगाचे सुरवातीच्या स्थितीत निदान झाले आहे. अशा व्यक्तीच्या आर्युमानाशी कारण कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात. व्यक्ती तितक्या प्रकृती

प्रतिबंधात्मक उपाय
अमेरिकेतील महत्वाचे विद्यापीठातील आहारतज्ञ आणि रोगशास्त्र तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, जर पुढे दिलेले सोपे उपाय अमलात आणले तर माणूस कर्करोग होण्याचा धोका कमी करू शकतो.