निदानाच्या प्रक्रियेची सुरूवात संपूर्णपणे खोलवर जाऊन केलेली शारीरिक तपासणी, आणि पेशंटची वैद्यकीय इतिहास घेऊन होते. डॉक्टर सुरवातीला हाताने हलकेसे दाबून शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे निरीक्षण करतील. त्या भागाची स्पर्शाने जाणीव घेतील. अशा तपासणीमध्ये, डॉक्टर विशिष्ट इंद्रियाची सामान्य स्थितीशी तुलना करता जाणवत असलेली वाढ, तेथील पेशीजालाची वीण यांच्यातील बदल निश्चित करतात.
जर डॉक्टरांना शारीरिक तपासणीत असाधारण बाब आढळली, किंवा पेशंटमध्ये कर्करोगाची स्पष्ट लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टर त्या पुढच्या निदानात्मक तपासण्या करून घ्यायला सांगतात. कर्करोग निदानाची सर्वात निश्चित पध्दत म्हणजे बायोप्सी. बायोप्सी करताना, छोट्या शस्त्रक्रियेन, पेशीजालाचा भाग, सूक्ष्मदर्शी तपासणीसाठी बाहेर काढता जातो. कर्करोगाच्या निश्चितीबरोबर, बायोप्सीचा उपयोग कर्करोगाचा प्रकार निश्चित करण्यासाठी होतो. बायोप्सीमुळे, कर्करोगाची सध्याची स्थिती, कर्करोगाची आक्रमक वृत्ती आणि विस्तार/प्रसार, याचीही माहिती होते.बायोप्सीमुळे अत्यंत तपशीलवार विश्लेषण मिळत असल्यामुळे, त्याला सोन्याची टेस्ट् म्हणले जाते.
उपचार
कर्करोगावरील उपचारांचे उद्देश असे म्हणतात. प्रथमत: अर्बुद आणि शक्य होईल. तेवढा पसरलेला भाग काढून टाकणे, आणि मग अर्बुदाच्या पुनर्दुभावाला आणि प्रसाराला प्रतिबंध करणे. कर्करोगावर उपचार करताना, उपचारांमुळे निर्माण होणार्या दुय्यम त्रासांपेक्षा मूळ आजारावर उपचार करण्याबाबत प्राधान्य देणे गरजेचे आहे. जर कर्करोग अतिशय आक्रमक असेल आणि बरा होणे अवघड असेल तर, प्रथम लक्षणांपासून सुटकारा मिळावा आणी अधिकाधिक काळ कर्करोग नियंत्रणात राहावा म्हणून उपचार दिले जातात.
शस्त्रक्रिया
दृश्य असलेले अर्बुद काढून टाकणे ही नेहमी वापरली जाणारी चिकित्सा आहे. जेव्हा कर्करोग शरीराच्या एकाच भागात असतो आणि अर्बुद लहान असते, तेव्हा शस्त्रक्रिया ही सर्वात प्रभावी उपचार पध्दती आहे. शस्त्रक्रियेचा उपयोग विविध कारणांसाठी उद्दिष्टांसाठी होऊ शकतो.
शस्त्रक्रिया-उपचार
कर्करोग बरा व्हावा म्हणून शस्त्रक्रियेने अर्बुद काढून टाकणे हा एक उपचार आहे. सामान्यत: कर्करोग एकाच जागी असेल किंवा विशिष्ट विभक्त भागात असेल तर शस्त्रक्रिया केली जाते. अशा शस्त्रक्रियेचे वेळी अर्बुदाबरोबरच, सभोवतालचे पेशीजालही काढून टाकले जाते. त्यामुळे शरीरात कर्करोगाच्या पेशी शिल्लक नसल्याची खात्री होते. सामान्यत: कर्करोगाचा प्रसार लसिका ग्रंथीपासून होत असल्याने, आजूबाजूच्या लसिका ग्रंथीही तपासाव्या लागतात, किंवा काढून टाकाव्या लागतात.
अस्थिमगज रोपण: अस्थिमगज (बोनमॅरो) हे हाडांच्या पोकळीतील एक पेशीजाल आहे. त्यात रक्त निर्माण करणार्या पेशी असतात. अस्थिमगज निरोगी असते, तेव्हा ते सातत्याने रक्ताची भरपाई करीत असते आणी ही क्रिया जिवंत राहण्यासाठी अतिशय आवश्यक क्रिया आहे.
परंतु काही वेळा, रसायन चिकित्सेमुळे अथवा किरणोत्सर्गी उपचारांमुळे,कर्करोगाच्या पेशी बरोबरच, अस्थिमगजाचाही नाश होतो. अशा वेळी, अस्थिमगजाचे रोपण केल्याने दु:ष्परिणाम टळतात. अस्थिमगज रोपण स्वत:चे करता येते किंवा दुसर्या व्यक्तीचे शरीरातील अस्थिमगज आणि रक्त निर्माण करणार्या पेशीचे करता येते. असे रोपण हा उपचार नव्हे पण उपरोत्तर दुष्परिणामातून सुटका होणे.
निदान
- Details
- Hits: 10213
3
कर्करोग
हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?
