Print
Hits: 10296

ए । बी । सी । डी । इ । एफ । जी । एच । आय । जे । के । एल । एम । एन । ओ । पी । क्यु । आर । एस । टी । यु । व्ही । डब्ल्यू । एक्स । वाय । झेड

 

ऍक्वायर्ड इम्युनो डेफिसिअन्सि सिंड्रोम
(एड्‌स) हा एक विषाणूंच्या बाधेमुळे होणारा आजार आहे. ह्या आजारात शरीरातील जंतूशी मुकाबला करण्याची क्षमता संपते. त्यामुळे दता आजारांचा संपर्क होण्यास शरीर अधिक संवेदना क्षम होते.

ऍक्युट
आजाराच्या लक्षणांचे किंवा आजाराचे अचानक उद्‌भवणे

ऍडनोमा
निरूपद्रवी आवाळू. रसग्रंथीच्या पेशीजलांनी बनलेले निरूपद्रवी आवाळू. उदा. पोषणग्रंथीनी झालेले आवाळू, हे अतिरिक्त प्रमाणात संप्रेरकांची निर्मिती करते.

ऍडरिनल ग्लॅन्डस
मूत्रपिंडाजवळील अधिवृकु ग्रंथी :मूत्रपिंडाजवळील या दोन ग्रंथी संप्रेरकांची निर्मिती/नियमन करतात

ए. एफ. पी
आवाळू निश्‍चित करता

ऍलोपेशिआ
सबंध शरीरावरील केस जाणे तसेच डोक्यावरील केस जाणे, चाई

ऍनेमिया
रक्तक्षय, पांडुरोग: रक्तातील लाल पेशी कमी होण्याची स्थिती, थकवा, श्वास कमी पडणे, आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात.

ऍनोरेक्सिआ
अग्निमांद्य/क्षुधानाश भूक न लागणे

अँटीबॉडी
प्रतिपिंड - जंतूपासून निर्माण होणार्‍या विषाचा परिणाम नष्ट करणारे एक विशिष्ट स्वरूपाचे प्रथिन

अँटीफन्गल एजंट
फंगल बाधा होवू नये म्हणून द्यावयाचे औषध अँटीजेन नैसर्गिक रित्या शरीरात जंतूचे विषाचे परिणाम नष्ट करणारे प्रथिने निर्माण करण्यास कारणीभूत ठरणारे औषध

अँटीनिओफ्लास्टेक एजंट
कर्करोगाच्या पेशींना मारणारे, त्यांची प्रगती थांबविणारे वा शरीरात पसरणे थांबवणारे औषध

एहिदमिया
हृदयक्रियेतील लय बिघडणे

ऍस्पिरेशन
शरीरातील विशिष्ट भागातील द्रव अथवा पेशी खेचून बाहेर काढण्याची प्रक्रिया

ऑटोश्म्युनिटी
आत्मप्रतिरक्षण अशी एक अवस्था ज्यात शरीरातील प्रतिरक्षण व्यवस्था, आपल्याच पेशीजालांविरूध्द लढते.

ऑक्झिला
कारव ऑक्झिलरी नोडस्‌ किंवा ग्लँडस नावे पण ओळखल्या जातात. सर वाहिन्याच्या मार्गात या ग्रंथी जागोजाग असतात. त्यांच्यामधून रक्तरस जातो व रक्तातील त्याज्य पदार्थ जातात. अशा काखेतील ग्रंथी.
बेरियम एनेमा
आतड्याच्या दक्षिण भागातील क्ष किरण तपासणी सुलभ व्हावी म्हणून (बेरियम सल्फेट) दुधाळ द्रव्य गुदद्वाराद्वारे देणे.

बेरियम स्वालो
बेरियम सल्फेट या दुधाळ द्रावणाचे, आतड्यातील उत्तर भागातील क्ष किरण तपासणीसाठी केलेल सेवन

बेनिईन ग्रोथ
आवाळूची निरूपद्रवी वाढ कर्करोगाची नसलेली, आणिशरीराच्या एका भागातून दुसर्‍या भागात न पसरणारी सूज अथवा आवाळूची वाढ

बायोप्सी
निदान सोपे व्हावे म्हणून सूक्ष्मदर्श्क निदान सोपे व्हावे म्हणून सूक्ष्मदर्शक

ब्लड सेल्स
रक्तपेशीस अस्थिमगजात तयार होणार्‍या सूक्ष्मतर रचना, त्यात लाल रक्तपेशी, पांढर्‍या पेशी आणि बिबाणुंचा समावेश असतो

ब्लड काउंट
पेशीबळ रक्ताचे नमुन्यातील लाल. पांढर्‍या आणी बिंबाणू पेशींचे संख्याबळ

बोन मॅरो
अस्थिमगज हाडांच्या पोकळीत असलेला पदार्थ सर्व रक्तपेशींची निर्मिती अस्थिमगजात होते.

बोन मॅरो बायोप्सी अँड ऍस्पिरेशन
हाडांमधून सुई घालून अस्थिमगज पेशी तपासणीसाठी काढण्याची क्रिया

बोन मॅरो सप्रेशन
अस्थिमगजमांद्य अस्थिमगजातील रक्तपेशींची निर्मिती मंदावणे.

बोन मॅरो ट्रान्सफ्लँट
अस्थिमगज रोपण मोठ्या प्रमाणात रसायनचिकित्सा आणि किरणोत्सर्गी चिकित्सा उपचार ज्या पेशंटना दिले जातात त्यांना अस्थिमगजाचे मंद गतीने अंत:क्षेपण करण्याची प्रक्रिया या करता, पेशंट आपल्या स्वत:चेच गोठविलेले अस्थिमगज वापरू शकतो.

बोन मॅरो ट्रान्सफलाँट
दात्याचे अस्थिमगज पेशंटला देण्याची प्रक्रिया

ऑटो लोगस
पूर्वी काढून गोठवून ठेवलेल्या पेशंटच्या स्वत:च्या अस्थिमगजाचे अंत:क्षेपण

सायनेजेनिक
एका जुळ्या मुलाचे अस्थिमगजाचे दुसर्‍या मुलास अंत:क्षेपण

बोन स्कॅन
किरणोत्सर्गाने कार्यरत होणार्‍या रंगद्रव्याचा वापर करून तयारी केलेली प्रतिमा त्या प्रतिमेचे सहाय्याने जखम, आजार आणि पूर्वस्थितीची प्रगती समजते. ही अत्यंत महत्वाची आणि अमूल्य चाचणी आहे. त्यामुळे कर्करोग हाडांमध्ये पसरला असल्याचे, कर्करोग विरोधी उपचार यशस्वी झाल्याचे आणि बाधित हाडे पूर्वस्थितीत आल्याचे समजते.

ब्रेस्ट सेल्फ-एक्सामिनेशनठ
स्तनांची स्व तपासणी स्वत:च्या हाताने, स्वत:च्या स्तनांची तपासणी

ब्रान्कोस्कोपी
ब्रान्कोस्कोप वापरून केलेली, श्वासवाहिन्यांची तपासणी अत्यंत लवचिक, प्रकाशित नळी, तोंडाद्वारे फुफ्फुसांची आणी श्वासनलिकांची तपासणी केली जाते.
कॅन्सर
कर्करोग नियंत्रणाबाहेर वाढणार्‍या, पेशीजालाच्या घातुक वाढीचे आणि शरीरभर पसरणार्‍या अर्बुदाचे वर्णन करणार्‍या आजाराच्या गटाला वापरण्यात येणारा सर्वसाधारण शब्द

कॅन्सर इन सिच्य
कर्करोगाची अशा अवस्था ज्यात, जेथून सुरूवात झाली आहे. तेथेच कर्करोग सध्या आहे.

कँडिडायसिस
कँडिडा बुरशीमुळे होणारा संसर्ग

कारासिनोजिन
कर्कजन कर्करोग उत्पन्न करणारा पदार्थ: उदा. सिगरेट मध्ये आढळणारे निकोटीन हे कर्कजन आहे. त्यापासून फुफ्फुसांचा कर्करोग होतो.

कार्सिनोमा
आच्छादक पेशींची घातुक वाढ कर्करोगाचा एक प्रकार या प्रकारची सुरूवात त्वचेत अथवा शरीराच्या कोणत्याही भागावरील आच्छादनापासून होते.

ऍडनोकार्सिनोमा
आच्छादक पेशींचे निरूपद्रवी वाढ

बेसल सेल कार्सिनोमा
मूलभूत आच्छादक पेशींची घातुक वाढ त्वचेच्या कर्करोगाच्या सर्वात जास्त आढळणारा प्रकार

बाँकोजोनिक कार्सिनोमा
श्वासनलिका/वा फुफ्फुसांचे आवरणाचा कर्करोग या प्रकारची सुरूवात फुफ्फुसात अथवा वायुवाहिन्यात होते.

एन्डोमेट्रीकल कार्सिनोमा
गर्भाशतील अंत:त्वचे चा कर्करोग

सर्व्हायकल कार्सिनोमा: ग्रीवेचा कर्करोग:
गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग

स्क्वॅमस सेल कार्सिनोमा
शंख अस्थिपेशींची कर्करोग: तोंड गर्भाशय अथवा फुफ्फुसे अशा भागांच्या बाह्य त्वचेपासून सुरूवात होणारा कर्करोग

कार्डीओमगली
सी. ए. टी. स्कॅन (सी टी स्कॅन) संगणकाच्या मदतीने आणि क्ष किरणांनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांची तपासणी

सी ई ए (कार्सिनिएम्ब्रॉयोनिक अँटीजेन)
रक्तातील गाठी निश्‍चित करणे

सेल्युलाईटीस:
संयोजक पेशीजलांचा दाह: त्वचेच्या विशिष्ट भागाचा (अधिस्तराचा दाह)

सेंटल व्हेनस कॅथेटर
छातीतून किंवा उदरातून, शस्त्रक्रियेचे साह्याने एक नळी शिरेच्या आत घातली जाते. या उपकरणामुळे रक्ताचे नमुने घेणे, औषध देणे, रक्तघटक देणे, द्रव पदार्थ देणे शक्य होते.

सव्हार्याकल नोडस्‌
ग्रीवेतील रसग्रंथी

केमोथेरपी:
कर्करोगासाठी वापरण्यात येणारी रसायनचिकित्सा (उपचार) पध्दती

ऍडज्युव्हन्ट केमोथेरपी
किरणोत्सर्गाने अथवा शस्त्रक्रियेने, काढता येईल असा आवाळूचा भाग काढून टाकल्यानंतर, शरीरातील राहिलेल्या कर्करोगाचे पेशींकरता केलेली रसायन चिकित्सा.

क्रॉनिक
जुनाट-बराच काळ राहिलेला

कोलॉनोस्कोपी
मोठ्या आतड्याची तपासणी प्रकाशित, लवचिक नळीद्वारे मोठे आतडे/गुदद्वाराची तपासणी

कोलोनी स्टीम्युलेटींग फॅक्टर (............)
अस्थिमगजात अधिक रक्तपेशींची निर्मिती व्हावी म्हणून द्यावयाचे इंजेक्शन

कोलॅस्टोमी
उदरपोकळीची पुढची भिंत आणि मोठे आतडे यांचे मध्ये शस्त्रक्रियेने, तात्पुरती किंवा कायमची वाट करणे, त्यामुळे मल नि:सारण सुलभ होते.

कॉल्पोस्कोफी
योनीमार्ग आणि गर्भाशयाची ग्रीवा यांची काल्पोस्कोप उपकरणाने केलेली पाहणी.

कॉनजेस्टिव्ह हार्ट फिल्यूअर
रक्त साकळल्याने हृदय बंद पडणे (रक्ताधिक्य) फुफ्फुसात किंवा शरीराच्या टोकाच्या भागात विशिषत: पायात रक्त साचणे. हृदयाचा पंप कार्यक्षमतेने काम करीत नसल्याने असे घडते.

सिस्ट
आवरण पेशींचा थर असलेली, आणिआत द्रव/अर्धघन पदार्थ असलेली पोकळी किंवा पिशवी.

सिस्टायटीस
मूत्रमार्गाचा क्षोभ
ड्रग रेसिसटन्स
औषधास प्रतिरोध विशिष्ट औषधाच्या, परिणामांना प्रतिरोध करण्याची पेशींची क्षमता

डिस्फोजिया
गिळण्यामध्ये अडचण

डिस्पॅनिया
श्वसनास त्रास किंवा श्वास न पुरणे

डिस युरिआ
मूत्रकृच्छु लघवी करताना अडचण येणे किंवा वेदना होणे
एडेमा
शरीरातील कोणत्याही भागार द्रव पदार्थ साकळणे

एफ्यूजन
अभिस्पंदन रक्त किंवा इतर द्रव पदार्थ, आजूबाजूच्या पेशीजालात किंवा पोकळ्यात झिरपणे

एलेक्ट्रोकाड्रीओग्राम (इकेजी/ईसीजी)
हृदयातील विद्युत हालचालींची तपासणी

एन्डोस्कोपी
पोकळींची वा पोकळ इंद्रियांची तपासणी उदा. अन्ननलिका किंवा उदर

एरिथिमा
त्वक्रक्तिमा त्वचेच्या वरवर दिसणारी लाली. रक्तिमा.

एरिथ्रोसाईट
पूर्ण वाढलेली लाल रक्त पेशी ही पेशी प्राणवायू पेशींपर्यंत नेण्याचे व कर्बवायू बाहेर नेण्याचे काम करते.

एसिफाजिटीस
अन्ननलिकेचा दाह

इस्ट्रोजन
बीजाशयात निर्माण होणारे महिलांचे शरीरातील संप्रेरक

इस्ट्रोजेन रेसेप्टर ऍस्से इस्ट्रोजेन हार्मोनजन
स्तनांच्या कर्करोगाची निदान परिक्षा एक्सिजन शस्त्रक्रियेने काढून टाकणे.

एक्स्ट्राव्हॅसेशन
शरीरातील द्रवांचे, नित्याचे मार्गाचे बाहेर जावून किंवा झिरपून द्रव सभोवतालच्या पेशीजालात जमणे.
फाईन नीडल ऍस्पिरेट
स्थानिक भूल देऊन, शंकास्पद पेशीजालांना सुईने तपासणीसाठी बाहेर खेचून काढण्याची प्रक्रिया.

फिस्ट्यूला
एका इंद्रियाची पोकळी, दुसर्‍या इंद्रियाच्या पोकळीला जोडणारा असाधारण मार्ग

फ्रोझन सेक्शन
विकृती विज्ञान तंत्रज्ञाने, वापरावयाचे हे एक तंत्र आहे. यात पेशी बाहेर काढून गोठविली जाते. व त्याची सूक्ष्मदर्शी तपासणी केली जाते.
ग्रॅन्युलोसाईट
कणकोशिका जंतूना मारणार्‍या पांढर्‍या पेशी

ग्वाईक टेस्ट
मलोत्सर्गातील न दिसणारे रक्त तपासण्याची पध्दत
हेमटोक्रिट: (एच. सी. टी.)
रक्तामधील लाल रक्तपेशींची टक्केवारी. हेमटोक्रिटची कमी टक्केवारी म्हणजे, रक्तक्षय, पांडुरोग असल्याचे दर्शविते.

हेमिटॉलॉजिस्ट
रक्त आणी अस्थिमगज विषयक तज्ज्ञ डॉक्टर

हेमेटॉलॉजी
रक्त विज्ञान

हेमाट्युरीया
मूत्रामधील रक्त

हेमोक्कल्ट (ग्वाईक) टेस्ट्‌
मलोत्सर्जनातील व दिसणारे रक्त तपासण्याची पध्दत

हर्पिझ सिंप्लेक्स
पुरळ विषाणुमुळे तयार होणारे तोंडाभोवतालचे पुरळ. हे योनिमार्गाभोवतीही होते. व पुन्हा. पुन्हा उद्‌भवते त्यास कोल्ड सोअर नावाने ओळखले जाते.

हर्पिझ झोस्टर
(शिंगल्स) नागीण याची त्वचेतून जाणार्‍या मज्जातंतूच्या वाटेने होत जाते. त्यामुळे कपाळ, चेहेरा व नाक या भोवती तीव्र वेदना होतात.

हार्मोन्स
संप्रेरके एका इंद्रियात तयार होणारा, व रक्ताबरोबर दुसर्‍या इंद्रियात जाऊन त्याचे कार्य उत्तेजित करणारा पदार्थ, या संप्रेरकामुळे वाढ, चयापचय आणि पुनरूत्पादन कार्याचे नियंत्रण होते.

हॉस्पिस्‌
प्राणघातक आजाराच्या अंतिम टप्प्यात, पेशंटला व त्याच्या कुटुंबियांना विशेष आधार देण्याची संकल्पना अशी मदत, हॉस्पिटलमध्ये वा घरी तज्ज्ञ आधार देण्याची संकल्पना अशी मदत, हॉस्पिटलमध्ये वा घरी तज्ज्ञ व्यावसायिकांकडून दिली जाते.

ह्यूमन इम्यिनो डेफिशिअन्सी व्हायरस (एच. आय. व्ही.)
एड्‌स घडवून आणणारा विषाणू

ह्यूमन ल्युकोसाईट अँटीजेन टेस्ट (एच. एल. ए.)
दात्याचे अस्थिमगज अथवा रक्त, पेशंटला रोपण करण्यापूर्वी वा देण्यापूर्वी करावया ची विशिष्ट तपासणी

हायपरलिमेन्शन
प्रथिनांनी परिपूर्ण अशा द्रावणाचे शीरेतून अंत:स्त्रवण