मुलांच्या चांगल्या वर्तणुकीची दखल घ्या, कौतुक करून, स्तुती करून किंवा छोटीशी भेटवस्तू देऊन त्या पध्दतीच्या वर्तणुकीला उत्तेजन द्या. अशेच वागणूक त्यांच्याकडून पुढच्या आयुष्यात घडावी यासाठी प्रोत्साहन द्या.
- इतर किरकोळ, घरगुती, कामामधील एक काम असे कौतुक करतेवेळी वागू नका. उलट त्याच्याजवळ जाऊन, योग्य ती शारीरिक जवळील दाखवा. तुम्हाला त्याच्याबद्दल बरंच काही वाटतं, हे त्याला जाणवू द्या. बक्षिसाचा उत्तम परिणाम साधण्यासाठी ते बक्षिस त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीशी सुसंवाद राखाणारं असू द्या.
- ठराविक चुकीला, ठराविक शिक्षा व ठराविक योग्य वर्तनाबद्दल ठराविक बक्षिस अशी तुमची वागणूक सदैव सुसंगत ठेवा. शिक्षा किंवा बक्षिसी त्या, त्या वागणुकीनंतर तात्काळ अमलात आणा. मध्ये काही तासाचाही अवधी घालवू नका.
- एखादं कृत्य योग्य किंवा अयोग्य याबद्दलचे योग्य स्पष्टीकरण मुलाला द्या. पणते मूल सात वर्षाच्यावरील असेल तेव्हाच!
- तुमचं मूल जसं आहे तसंच प्रेमाना ते स्वीकारा. त्यांना जवळ घ्या. कुरवाळा, ‘तू मला खूप आवडतोस’ असे शब्दांनी व्यक्त करा. हे मी त्याला सांगायला कशाला पाहिजे? त्याला ते आपणहून माहीत असायला हवं, अस गृहित धरू नका. तुमची त्याच्या बद्दलची आपुलकी शब्दातून व कृतीतूनच व्यक्त करा. अन्यथा, तुमच्या मुलात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते.
- आपल्या मुलाची बौध्दिक, मानसिक व शारीरिक कुवत ऒळखा व त्याला सुसंगत असा ध्येय आराखडा काढा आणि तो त्याला ठरवून द्या. कुवती पलीकडील ध्येय त्याला प्राप्त करायला. सांगला तर ते करताना त्याची दमछाक होईल. स्वतंत्र व्यक्ती म्हणून होणारा त्याचा विकास खुंटेल. या उलट मुलाच्या कुवतीपेक्षा कमी अपेक्षा धरू नका.. त्यामुळे यशप्राप्ती व आत्मसन्मान यात ती कमी पडतील.
हे करू नका
- मारहाण किंवा क्रूर शिक्षा शक्य तो टाळा. त्याऎवजी मुलांच्या वागण्यांतल्या चुका त्याला समजावून सांगा.
- प्रत्येक घटनेचे कारणमीमांसा त्याला समजावून देत बसू नका. अन्यथा पालक म्हणून तुम्हाला असलेला योग्य अधिकार गमावून बसाल. त्याची चूक असतानासुध्दा परक्यासमोर रागावून त्यांची मानहानी करू नका. यदाकदाचित तुमचा रागाचा पारा चढलाच आणि तो योग्य कारणासाठी असेल तर मूल तुम्हाला समजावून घेऊ शकेल. थोडक्यात सांगायचं तर, समजावणं, रागावणं, मारणं, या क्रियाआपल्याकडून जितक्या कमी वेळा होतील तितक्या बया किंवा काही मर्यादेतच जाहिलेल्या बया.
मुलांच्या गौरवर्तणुकीची तीव्रता आजमावून, त्यांचं वय, चूक करण्याचे खेप हे सारे बघून विचार करून मग त्याच्या पार्श्वभागवर चापट मारणे किंवा समजावणे एवढ्याचाच अवलंब करा. - तुमच्या मुलाची त्याच्या भावडांबरोबर किंवा शेजारच्या मुलांबरोबर तुलना करू नका. अन्यथा त्याच्या मनात मत्सराची, द्वेषाचे भावना व दुसऱ्या मुलांबद्दल तिटकाराहे निर्माण होईल.
- मुलांना अतिसुरक्षित वातावरणात ठेवू नका. उदा. सदैव त्यांच्या मागं माग राहणं. किरकोळ धोक्यापासून सुध्दा त्यांना दूर ठेवणं, सामान्य निर्णय सुध्दा त्यांना घेवू न देणे.
- तुमच्या मुलांवर अतिरिक्त बंधनं लादू नका. बंधनाचा व आदर्शाचा अतिरेक केल्यास ही मुला जीवनात स्वत:ची वाढ स्वत: शोधण्याचं स्वातंत्र्य गमावून बसतात.
अतिरेकी शिस्त व बंधनामुळे मर्यादशील सामाजिक वागणूक व चांगलं वळणं यांचा त्यांना कदाचित लाभ होईलही, पण त्यामुळे भीती, परावलंबित्व, मवाळपणा, मंदावलेली बोध्दिक क्षमता या बाबतीत मात्र प्रश्न निर्माण होतील. कधी कधी वाढत्या वयाची ही मुलं बंडही पुकारतील व बालक - पालक संबंधात अडचणी निर्माण करतील.